You are currently viewing तूळ राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

तूळ राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.

तूळ राशी आणि तूळ लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.

जर आपली राशी तूळ असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न तूळ असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.

वर दिलेली कुंडली इमेज हि तूळ राशी किंवा तूळ लग्नाची आहे. जर आपली तूळ राशी नसली तरी जर तूळ लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.

नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.

नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी टाकत होता. आणि ते स्थान १२ वे स्थान होते (जिथे जिथे ६ नंबर ची कन्या राशी असेल आपल्या पत्रिकेत) शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत तूळ राशी आणि तूळ लग्नाला १२(व्यय स्थान) हे स्थान लॉसेस चे, परदेश गमन चे, गुंतवणुकीचे आहे, तसेच हॉस्पिटल यात्रा चे सुद्धा आहे, डावा डोळा आणि मोक्ष ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. शक्य झाले तर कॉमेंट करा.

आता पुढे …….ह्याचे परिणाम काय होईल ते पाहू

दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या तूळ राशी कुंडलीत किंवा तूळ लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या ६ व्या (षष्ठ) स्थानी येत आहे ह्या स्थानावरून सर्व नोकरी – आजार – स्पर्धा – कर्ज – शत्रू – कोर्ट कचेरी विषय – चिंता हे विषय पहिले जातात पण ६ व्या स्थानातून भ्रमण करणे हे राहुला आवडत असते त्याचे तो चांगलेच परिणाम व्यक्तीला देत असतो. म्हणून तूळ राशी किंवा लग्नाच्या व्यक्तींना हे राहूचे भ्रमण चांगले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे जर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील तर त्या क्रॅक करण्यासाठी उत्तम कालावधी समजावा. नोकरीतील मोठे बदल आता होण्याची शक्यता असेल. कोर्ट कचेरीच्या कामात गती येईल, आधीचे काही रोग पीडा देणारे असतील तर त्यावर आता मात करण्याची हीच वेळ असेल. काळ उत्तम असेल. फक्त मूळ पत्रिकेत आपला राहू जन्माच्या वेळी उत्तम स्थितीत असावा लागेल. तरच हे जास्त पॉसिबल दिसेल.

राहूची १० व्या स्थानावर ५ वी दृष्टी

राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो दहाव्या (कर्म) स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. ह्या स्थानावरून पत्रिकेत करिअर, आपले प्रोफेशन आणि आपले सर्व कर्मे , पद,प्रतिष्ठा, राजयोग पाहिले जातात. ह्या स्थावर राहूची दृष्टी शुभता निर्माण करेल. करिअर मधील मोठे बदल करण्यास उत्सुक असाल, पद प्रतिष्टेसाठी अग्रेसिव्ह व्हाल.

राहु ची बाराव्या स्थानवार ७ वी दृस्टि

कुंडली इमेज मध्ये पहा राहु ६ व्या स्थानातून बाराव्या स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे हे कुंडलीचे सर्वात शेवटचे स्थान आहे. हे स्थान लॉसेस चे, परदेश गमन चे, गुंतवणुकीचे आहे, तसेच हॉस्पिटल यात्रा चे सुद्धा आहे, डावा डोळा आणि मोक्ष ह्यातील एक तरी विषय आपल्याकडे राहू ऍक्टिव्हेट करेल. काही गुंतवणूक करताना थोडी सावधानता बाळगावी. आधीची कोणतीही गुंतवणूक कट करूनच नवीन गुंतवणूक करावी लागेल एकदम नवीन गुंतवणूक लॉसेस देश शकेल जी पहिल्यांदाच कराल. ह्याचे एकमेव कारण ह्याच स्थानातून केतू सुद्धा भ्रमण करताना दिसेल. परदेश गमन आणि हॉस्पिटल यात्रा होताना पैसा बराच खर्च होण्याची शक्यता असेल. काही गोष्टी आधीच्या रेगुलर सुटू शकतील.

राहू ची २ऱ्या स्थानावर ९ वी दृष्टी

कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील तिसऱ्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. तूळ राशी किंवा तूळ लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो.जिथे ८ नंबर लिहिले आहे ह्याच स्थानावर शनी ची कुंभ राशीतून १० वी दृष्टी सुद्धा येत आहे त्यामुळे अति सावधान. जे जे विषय खाली देत आहे त्या विषयी अति चांगली किंवा वाईट धावपळ होण्याचे नाकारता येत नाही. पैसा, वाणी, कुटुंब –मागील काही कालावधीत पैशाने जी जी कामे अजून पेंडिंग होती ती आता होऊ शकतील. पैसे कमविण्यासाठी आता जास्तीत जास्त अग्रेसिव्ह राहाल. त्यासाठी कुटुंबाला फार कमी वेळ देता येईल कारण राहू साठी हे तुमचे कुटुंब स्थान सुद्धा आहे जे त्याला आवडत नाही. म्हणून कुटुंबातील मोठे विषय आपल्या समोर ह्याच कालावधीत येतील. त्यामुळे वाणी सुद्धा पैसे आणि कुटुंब ह्यासाठी चालेल. तेव्हा सांभाळून राहावे कारण इथे वाणी ला दोष लागू शकतो म्हणजेच बोलताना जरा जपून. ह्यासाठी जास्तीत जास्त कुटुंबात मन न रमवता पैसा कमाविण्यासाठी वेळ दिलेला बरा हा सल्ला समजा. ज्यांच्याकडे काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांचे कुटूंबात लक्ष कमी लागेल किंवा ते करण्यासाठी त्यांना लांब गेलेले बरे. ज्यांच्या जन्मपत्रिकेत जन्माचा राहू जास्त चांगला नाही आणि जर तो कुटुंब स्थानाशी जरासुद्धा कनेक्ट असेल (दृष्टीने किंवा तिथेच असेल तर) ह्या कालावधीत पैसा मिळणारच आहे पण तो कुटुंबासाठी खर्च होऊ शकेल ह्याची काळजी घ्या. जर राहू चांगला असेल जन्माच्या वेळी तर असे काही होत नाही तुम्ही मिळविलेल्या पैशाचा राहू आनंद देईल.

वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण तूळ राशीचे आहात किंवा तूळ लग्नाचे असाल तर राहू इथे आपणास ६ व्या स्थानातून चांगलेच फळ देणार आहे पण जर राहू किंवा शनी आपल्या मूळ जन्म पत्रिकेत चांगले आहेत का पाहावे लागेल पण जर चांगले नसले तर मात्र खालील उपाय करावे जेव्हा काही दुष्परिणाम समोर येतील तेव्हा उपाय सुरु करू शकता. त्यासाठी तूळ राशी आणि लग्न व्यालांनी कोणत्याही देवी साधनेचा सपोर्ट घ्यावा जसे देवी कवच, अर्गला स्तोत्र , किंवा दुर्गा कवच वाचावे. आणि शनिवारी शनी मंदिरात जात राहावे. शनी चे स्तोत्र अशा वेळी आपणास मदत करेल नक्की.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply