You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : तुला राशी आणि तुला लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने तुला राशी आणि तुला लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या अष्टम स्थानी (पत्रिकेचे ८ वे स्थान) आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण दुसऱ्या स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

तुला राशी आणि तुला लग्न

राहू अष्टम स्थानी म्हणजे हे स्थान अपघाताचे , अचानक होण्याऱ्या घटनांचे , वारसा हक्काचे, गुप्त गोष्टींचे आहे. इथे राहू पासून वरील विषयात सतर्क राहा. राहू इथे आपल्याला धनलाभ करून देत आहे हे नक्की समजा.

पण हाच धनलाभ जर झाला तर कुटुंब विखरण्याची सुद्धा जास्त शक्यता नाकारता येत नाही. धनलाभ म्हणजे आपल्याला प्रमोशन होण्यासारखे आहे. जे जे परप्रांतातल्या व्यवहाराशी संलग्न आहेत त्यांना लाभ आहेत. पण ह्याच राहू मुळे प्रमोशन आले तर तब्येतीकडे काळजी घ्या हा सल्ला.
गुप्त रोग आधीपासूनच असतील तर त्यात खास जपायचे आहे पुढील १८ महिने.

वैवाहिक तरुण जोडप्याना सल्ला — जर तुम्ही ह्या १८ महिन्यात काही गुप्त गोष्टींत सहभागी होत असाल तर १२/४/२०२२ नंतर पुढे १८ महिने अशाना वैवाहिक सुखात त्रास खूप जाणवतील. कारण नंतर राहू मेष राशीत असेल तुमच्या वैवाहिक जीवनात दाखल देईल. तेव्हा आत्तापासून ह्या राहू विषयी सावधानता बाळगा. कारण इथला राहू तुम्हाला आता सध्या काही अशा गोष्टी लपवायला लावेल ज्या २०२२ ला उजेडात येतील.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी हि कुटुंब स्थानावर येत आहे जिथे केतू ८ नंबर च्या वृश्चिक राशीत आहे. हे धनाचे सुद्धा स्थान आहे. हे मुखाचे, वाणीचे सुद्धा स्थान आहे.

राहू ची येथील स्थानावर दृष्टी म्हणजे कुटुंबासाठी धावपळ दिसेल. काही जणांना दाताचे विकार ह्यांचा सामना करावा लागेल. काही जणांना कुटुंबापासून दूर जाण्याची चिन्हे दिसतील. तर खास ह्या पुढील १८ महिन्यांत वाणी चा दोष कुठेहि होणार नाही ह्याकडे लक्ष द्या. बोलण्याने काही कामे बिघडू शकतील.

राहू ची ९ वी दृष्टी

जिथे मकर राशी १० नंबर आहे तिथे राहू ची ९ वी दृष्टी येत आहे आणि हि राहू ची दृष्टी प्रॉपर्टीज ची काही कामे आपल्या हातून होतील. त्यात तुम्ही डेरिंग कराल. काही जणांना आईला काही आजार आधीचा असेल तर त्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे. घरातील काही गरजांसाठी तुम्ही ह्या १८ महिन्यात खूप मेहनत कराल. फळ सुद्धा मिळेल.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी हि ६ नंबर जिथे कन्या राशी आहे त्यावर येत आहे हे पत्रिकेचे व्यय स्थान आहे. ह्या पुढील १८ महिन्यांत जर आपल्याला काही लाभ होतील तर ते आधीच कुठेतरी बुक होतील. काही जणांना आरोग्यासाठी पैसा खर्च करावा लागेल.

तुला राशी आणि तुला लग्न ज्यांचे आहे आणि त्यांचे वय हे जर ६० वरील आहे तर आपल्याला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तरुणांना काहींना मूत्रपिंडाचे त्रास होऊ शकतील लक्ष द्यावे.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू पत्रिकेत ८ नंबर जिथे आहे त्या कुटुंब स्थानी आला आहे आणि तो अष्टम स्थानी पाहत आहे राहू सारखीच ७ व्या दृष्टीची फळे मिळतील. धन चांगले मिळेल.

केतूची ५ वी दृष्टी जिथे गुरु ची मीन राशी लिहिली आहे १२ नंबर तिथून सर्व सर्व्हिस पहिल्या जातात त्यामुळे जर कोणी ह्या १८ महिन्यात नवीन जॉब ला लागणार असेल आणि तुमची तुला लग्न आणि तुला राशी ची पत्रिका असेल तर अशाना लांब च्या ठिकाणी जॉब मिळण्याची शक्यता फार आहे.

आणि जर असे झाले नाही तर तुमच्या कडे असलेले स्किल उपयोगी येणार नाही जर तुम्हाला नवीन जॉब हा जवळ मिळाला तर. किंवा जॉब सर्च करताना त्रास सुद्धा होऊ शकतो.

रोग स्थानावर आलेली हि केतूची ५ वी दृष्टी अचानक काही रिपोर्ट येऊ शकतात आरोग्याचे ज्यात धावपळ दिसते. कर्ज सुद्धा ह्या दृष्टीने काही जणांना अनुभवास येईल जुने कर्ज असेल तर ते वाढू शकते.

केतू ची ९ वी दृष्टी हि कर्म स्थानावर येत आहे जिथे ४ चंद्राची कर्क राशी आहे. काही जणांना ह्या वेळी घरातील काही परिस्थिती हाताळाव्या लागतील आणि त्यामुळे जॉब किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतील. खास आईच्या तब्यतीची काळजी घ्यावी जर वय जास्त असेल तर.

काही जणांना केतू करिअर बद्दल अचानक काही निर्णय घ्यावे लागतील असे दिसते. हे निर्णय चुकण्याची दाट शक्यता असेल जर आपल्या पत्रिकेत दशम स्थान मजबूत नसेल तर.

उपाय

तुला राशी आणि तुला लग्न च्या व्यक्तींना राहू केतू च्या भ्रमणात काही उपाय देतो.

  • प्रत्येक शुक्रवारी देवी कवच वाचणे. किंवा देवी उपासना- दर्शन घ्यावे.
  • रोज मुंग्यांना एक चमचा पीठ आणि साखर घालणे.
  • हे 2 उपाय सतत पुढील 18 महिने तरी करावेत.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व तुला राशीच्या आणि तुला लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply