You are currently viewing मोक्षदा एकादशी- गीता जयंती- मौनी एकादशी: २५ डिसेंबर २०२०

मुहूर्त एकादशी चा

  • एकादशी तिथि प्रारम्भ: २४ डिसेंबर २०२० रात्री ११:१७ पासून
  • एकादशी तिथि समाप्त: २५ डिसेंबर २०२०: पहाटे १:५४ पर्यंत (शनिवार उजाडता)
  • एकादशी पारण (उपवास सोडणे): सकाळी ८:३० ते सकाळी ९:२१ पर्यंत.

मोक्षदा एकादशी चे महत्व

मार्गशीर्ष महिन्यातील हि एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून मानली जाते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ह्याचे महत्व पटवून देताना असे सांगितले आहे कि ज्या व्यक्तींना मोक्ष हवा आहे अर्थात ज्यांना जन्मोजन्मांतर च्या फेऱ्यातून मुक्ती हवी आहे त्यांनी ह्या एकादशी चे व्रत जरूर करावे. ह्या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी करतात.

मोक्षदा एकादशी ची कथा

पुराणांतून ह्या एकादशी ची कहाणी अशी आहे कि वैखानस नावाचा राजा ला स्वप्नात आपले पिता हे नरक यातना भोगताना दिसले आणि त्यांनी त्यातून त्यांची सुटका कर असे सांगितले.
ह्याने व्याकुळ होऊन वैखानस राजा पर्वत ऋषींकडे गेला आणि ह्याचे समाधान विचारले.

तेव्हा त्यांनी राजा ला सांगितले कि तुझे पिता हे पूर्वजन्मी एका स्त्रीच्या प्रेमात एव्हढे लीन झाले कि त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला त्रास झाला. ह्या तिच्यावर झालेल्या अन्यायाने तुझ्या पित्याला आज नरक यातना भोगाव्या लागत आहेत.

त्यांनी ह्याचे समाधान म्हणून राजाला मोक्षदा एकादशी चे व्रत समजावून सांगितले आणि त्याला मिळणारे ह्याचे पुण्य हे पित्याला देण्याचा आग्रह केला. तसेच राजाने हे व्रत सुरु केले आणि त्याचे पारण करून त्याचे फळ हे आपल्या पित्याला दिले. ह्या क्रियेने राजा चे पिता नरक लोकातून स्वर्ग लोकात प्रस्थान झाले.

गीता जयंती महत्व

ह्या एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णे अर्जुनाला गीतेचा पाठ दिला. गीतेचे १८ पाठ समजाविताना गीतेच्या ११ व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला संपूर्ण ब्रह्माण्ड दाखविले. आणि आपले विराट स्वरूपाचे दर्शन सुद्धा दिले. तेव्हा पासून ह्या दिवशी गीता जयंती उत्सव मानण्याची परंपरा आहे.

ह्या दिवशी व्रत करणाऱ्यानी गीता वाचण्यास सुरु करावी किंवा गीतेतील ११ वा अध्याय वाचून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यावेत.

ह्या दिवशी गीतेचे पुस्तक नसेल तर विकत आणावे आणि त्याला पिवळ्या वस्त्रावर ठेऊन त्याचे पूजन धूप दीप पुष्प घालून करावी. आणि नंतर वाचनास सुरुवात करावी.

मौनी एकादशी

ह्या एकादशी चे व्रत जैन धर्मात पूर्ण दिवस मौन धारण करून करतात. मौन ग्यारस (मगसर माह) मगसिर सुदी ग्यारास ह्या दिवशी जैन उपाश्रय, जैन स्थान इथे विशेष धर्म आराधना होते. अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी कर्म क्षय करावे कारण ह्या दीवशी पुण्य कर्म केल्याने त्याचे फळ १५० गुणाने मिळते आणि पाप कर्म केल्याने सुद्धा त्याचे फळ १५० गुणाने वाढते.

म्हणून जास्तीत जास्त धर्म कर्म ला ह्या दिवशी या समाजात विशेष समजून मौन धारण करण्याची परंपरा आली असावी कारण कोणतेही वाईट कर्म आपल्या हातून होऊ नये असा समज असावा.

ह्या दिवशी कृष्ण जप केल्याने सुद्धा एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते.

एकादशी चे व्रत कसे करावे ? काय करावे अथवा काय करू नये ह्या साठी खालील लिंक वर क्लिक करून अधिक जाणून घ्या.

https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi-16th-july-2020/

महत्व एकादशी चे वाचून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://shreedattagurujyotish.com/ekadashi/

एकादशी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती मिळावा.

https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-wednesday-11-november-2020/

धन्यवाद…..!

Leave a Reply