You are currently viewing काय आहे आपला लकी नंबर? LUCKY NUMBERS FORMULA

काय आहे आपला लकी नंबर?-

अंकांचा-रोल

वरील इमेज मध्ये एकदम सोप्या पद्धतीने नुमरॉलॉजि मध्ये जर आपल्याला लकी नंबर्स जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेली ट्रिक आपल्याला मदत करू शकेल .(LUCKY NUMBERS FORMULA)

१) आपला मूलांक लिहा (कोणत्याही महिन्याच्या तारखेला झालेल्या जन्मदिनांकाची बेरीज)
२) आपला भाग्यांक लिहा ( आपल्या जन्मतारखेच्या संपूर्ण अंकांची बेरीज)
३) मूलांक आणि भाग्यांक चे मित्र अंक लिहून घ्या
४) ह्यात जे कॉमन नंबर्स आहेत ते शोधा

जे कॉमन नंबर्स आहेत तेच आपले लकी नंबर्स आहेत पूर्ण आयुष्यभरासाठी

हेही वाचा :- अंकांचे शत्रू, मित्र आणि विश्लेषण

खाली दिलेल्या उदाहरणाने हे आपणास सहज समजेल

समजा आपला मूलांक २ आहे आणि भाग्यांक ४ आहे तर २ चे मित्र अंक हे १/५/३/२ आणि ४ चे मित्र अंक ७/१/५/६/४/८
म्हणजे ह्यातील १ आणि ५ हे कॉमन नंबर्स आपल्या पूर्ण आयुष्यभरासाठी लकी नंबर्स असतील.

कसा करावा लकी नंबर्स चा उपयोग

जिथे जिथे आपण नंबर्स चा उपयोग करतो उदारणार्थ आपले वाहन, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, घर क्रमांक वगैरे ह्यात आपण आपल्या लकी नंबर्स चा मुद्दामून उपयोग करून त्याचा आशीर्वाद घेऊ शकतो.

काही प्रमाणात आपला जोडीदार, व्यवसायिक पार्टनर, आपला ऑफिस मधील, बॉस, मित्र, आपल्या हाताखालील काम करणारे आपले सहकारी, घरातील इतर मंडळी ह्या सर्वांचे मूलांक आणि भाग्यांकावरून ती व्यक्ती आपल्या बरोबरोबर किती सॉफ्ट असेल हे सुद्धा आपल्याला समजण्यासाठी ह्याचा सुंदर उपयोग करून घेता येतो. आणि जर त्यात काहीच बदल करता येत नसेल तर आपण काही त्यात ऍडजेस्टमेंट करून पुढे दिवस ढकलू शकतो. किंवा स्वतःला बदलून घेऊ शकतो एव्हढेच. किंवा एखाद्या नुमरॉलॉजिस्ट ची मदत सुद्धा घेऊ शकतो ते अंक बॅलन्स करण्यासाठी.

धन्यवाद…..!

Leave a Reply