लोशू ग्रीड मधील अंकांवरून ८ दिशा- खाली दिलेल्या इमेज मध्ये लोशू ग्रीड चे सर्व अंक दाखविले आहेत. आणीत त्या त्या अंकांप्रमाणें त्या त्या दिशा दाखविल्या आहेत. (DIRECTION OF LOSHU GRID)
जर आपल्या जन्म तारखेचे अंक ह्या लोशू ग्रीड मध्ये मूलांक आणि भाग्यांक मिळून लिहिले आणि त्यात जे नंबर्स नाहीत त्या दिशेचा दोष आपल्या जीवनात असू शकतो. किंवा त्या दिशेचे जे जे गुणधर्म आहेत ते मिळविताना त्रास होतो.
उदाहरण
एखाद्या व्यक्तीची जन्म दिनांक १२-३-१९७२ आहे तर खालील प्रमाणे त्याचा लोशू ग्रीड असेल.
वरील जन्म तारखेत १२ वरून मूलांक हा ३ आहे आणि सर्व जन्म तारखेची बेरीज हि २६ येते म्हणून भाग्यांक ८ आहे
जर सर्व नंबर लिहून झाल्यावर ५ आणि ६ नंबर नाही ह्यात तेथे फ़ुल्ली दाखविली आहे.
म्हणून वर दाखविलेल्या इमेज मधील ५ नंबर चे ब्रह्म sthan आणि ६ नंबर ची नॉर्थ वेस्ट ची दिशा ( उत्तर पश्चिम) हि बाधित आहे असे समजते .
हेही वाचा :- जाणून घ्या काय आहे लोशू ग्रीड
इथे काही जण भारतीय वास्तू प्रमाणे सुद्धा विचार करतील कि ६ जिथे आहे तो शुक्राचा अंक असल्यामुळे हि दिशा अग्नी कोपऱ्यात येते.
तरी सुद्धा अग्नी कोपऱ्यातील वास्तू चेक करायला हरकत नाही. तेथे सुद्धा दोष असू शकतो.
हे एकदा कळले कि आपण लगेच त्या वास्तू दोषावर काही उपाय करू शकतो.
धन्यवाद…..!