You are currently viewing कुंडली चा राजा राणी चा दरबार

कुंडली चा राजा राणी चा दरबार

कुंडली दरबार

४ नंबर कर्क पासून हे चक्र मागून सुरु होते आणि ५ नंबर सिंह राशी चे चक्र हे पुढून सुरु होते.

४ नंबर ची कर्क राशी च्या मागे बुधाची राशी आहे ३ नंबर ज्याचे नाव मिथुन राशी – पहिला मुलगा
५ नंबर च्या पुढील राशी सुद्धा बुधाची येते ६ नंबर ज्याचे नाव कन्या राशी – दुसरा मुलगा

आता ह्या दोन्ही मुलांनी एक एक पत्नी केली त्या दोन्ही राशी शुक्राच्या आहेत.

३ नंबर बुधाच्या मागील राशी शुक्राची २ नंबर पत्नीची राशी
६ नंबर च्या पुढील राशी सुद्धा शुक्राची ७ नंबर पत्नीची राशी

ह्या दोन्ही मुलांनी एक एक पत्नी ठेवल्यानंतर त्या दोन्ही मुलांना एक एक सेनापती त्यांच्या रक्षणासाठी ठेवला म्हणून —

२ नंबरच्या च्या मागील राशी १ नंबर मंगळ मेष राशी आहे सेनापतीची राशी आहे.
७ नंबरच्या पुढील राशी ८ नंबर ची वृश्चिक राशी सुद्धा मंगळाची आहे जी सेनापती ची आहे.

आता त्या सेनापतीला त्या दोन्ही मुलांनी एक एक गुरु दिला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून —

१ नंबरच्या मागील राशी १२ नंबर ची गुरु ची मीन राशी जी गुरु ची राशी आहे
८ नंबर च्या पुढील राशी सुद्धा गुरु ची येते ती ९ नंबर धनु राशी आहे.

आता त्या राजा राणी ने त्या गुरु बरोबर एक एक न्यायाधीश दिला न्यायनिवाडा करण्यासाठी म्हणून —

१२ नंबर च्या मागील राशी हि शनी ची राशी येते जी ११ नंबर ची कुंभ राशी आहे — शनी न्यायाधीश आहे
९ नंबर च्या पुढील राशी १० नंबर सुद्धा शनी ची येते जी मकर राशी आहे — हि सुद्धा न्यायाची राशी आहे.

असे हे चक्र राजा राणी(सिंह/कर्क) — दोन्ही मुले (मिथुन/कन्या)– त्यांच्या दोन्ही पत्नी (वृषभ/तुला) — त्यांचे दोन्ही गुरु (धनु मीन) त्यांचे दोन्ही न्यायाधीश (मकर कुंभ).

कुंडलीचे हे चक्र समजण्यासाठी अगदी सोपे आहे जे माझ्या गुरुं कडून मला मिळाले त्यांचे खूप खूप आभार.

धन्यवाद…..!

नवनवीन माहिती साठी श्री दत्तगुरु ज्योतिष या Telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Telegram बटणावर क्लिक करा.

Leave a Reply