गुरु परिवर्तन २०२०: मिथुन राशी किंवा मिथुन लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली मिथुन राशी आणि मिथुन लग्नाची आहे. जर आपण मिथुन राशीचे आहात किंवा मिथुन लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या सातव्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत सप्तम स्थान सोडून अष्टम भाग्य स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या अष्टम स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. गुरु जेव्हा गोचरीने अष्टमात येतो तेव्हा ज्ञानाचा कारक गुरु हा आपल्याला नवीन नवीन रिसर्च मध्ये ज्ञान लावायला नक्की भाग पाडेल आणि त्यात तुम्हाला शनी जरूर मदत सुद्धा करेल. ह्याचा लाभ नक्की ह्या वर्षी घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. असा पिरियड पुन्हा १२ वर्षाने येतो.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमच्या पत्नीचे वैवाहिक सुखाचे पाहिले जाते. जेव्हा पत्नी स्थानाचा मालक पुढील स्थानात येतो तेव्हा तो पत्नीच्या धन स्थानाचा सुद्धा असतो. म्हणून ह्या वर्षी तुम्हाला पत्नी कडून धनलाभ होणार किंवा एखादा सपोर्ट मिळणार एव्हढे नक्की. काही जणांना पत्नीच्या आरोग्यापासून त्रास दिसतो जर आधी काही आजार असतील तर पण त्यावर सुद्धा तुम्ही मात कराल. काळजी नको.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत कर्म स्थानी आहे आणि तिचा मालक हा रिसर्च च्या ठिकाणी गुरु आल्यामुळे तुम्ही आपल्या कर्म स्थानी नवीन नवीन कल्पना लावून अग्रेसर होऊ शकता.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या कुटुंब स्थानावर आणि धन स्थानावर येत आहे जीथे ४ लिहिले आहे तेथे ह्यांची ७ वि दृष्टी येत आहे म्हणून ह्या वर्षी कुटुंबातील प्रॉपर्टीज चे जे जे काम अडथळे आधीचे असतील तर त्यात तुम्ही त्यावर काहीतरी ऍक्टिव्ह व्हाल आणि निर्णय घ्याल. हे धन स्थान असल्यामुळे धनाची चिंता ह्यावर्षी नसेल पैसे कुठूनही मॅनेज करू शकाल.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी बाराव्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून नवीन गुंतवणूक करू शकता त्यात एखाद्या नवीन कर्मासाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

विद्यार्थी असाल तर आपले शिक्षण हे कुटूंबापासून लांब जाऊन घेतल्याने बरेच हित दिसेल.
ज्यांना देशाबाहेर जाऊन शिकायचे असेल तर त्यांना हा कालावधी उत्तम आहे.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे जिथून तुमच्या प्रॉपर्टीज वाहन सुख आणि घराचे सुख घर खरेदी पाहिले जाते ह्यात जास्त तुम्ही आता ऍक्टिव्हेट व्हाल. ह्यात आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन राशीच्या लग्नाच्या सर्वांचे विवाह ठरण्याचे प्रकार आणि विवाह होण्याचे योगात काही अडथळे येतील कारण हा गुरु आपल्या पत्रिकेला आठवा गुरु लागेल पण तो नीच राशीत शनी बरोबर असताना नवीन काही करून तुम्ही त्यावर मात करून पुढे जाऊ शकता. पुढील वर्षी २१/११/२०२१ नंतर गुरु तुमच्या भाग्यात जाणार आहे. तेव्हा माझा असा सल्ला असेल कि तुम्ही ह्या वर्षी तयारी करून ठेवा आणि पुढील वर्षी पॉसिबल असेल तर विवाह करून घ्या.

वैवाहिक सुख

वैवाहिक जीवनतले काही विषय मिथुन राशीला चिंतेचे असू शकतात पण त्यात शनी ची साथ चांगली लाभल्याने त्यावर मात कराल.

गुरुचे उपाय

मिथुन राशी आणि मिथुन लग्न वाल्याना गुरुचे उपाय म्हणजे रोज १०८ वेळा महामृत्युंजय जप करणे अथवा कोणतीही शिव उपासना रोज करणे त्यात शिवाला जल रोज अर्पण केल्याने अष्टमात असणारी शनी गुरु युती जास्त त्रासदायक होणार नाही. पती पत्नींपैकी कोणीतरी हा उपाय वर्षभर नक्की करावा.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे मिथुन राशी आणि मिथुन लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. — ह्यात तुमचा पराक्रम दिसेल त्यासाठी तुम्ही इकडे तिकडे धावपळीत असाल काही पीडा सुद्धा ह्यात सहन कराव्या लागतील खास हेल्थ बद्दल आधीचे त्रास असतील तर सांभाळा.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल — ह्यात धन कुटुंब असे विषय समोर येतील त्यात तुमच्या कडील पैसा खर्च होऊ शकतो.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल – ह्यात तुम्ही ज्यांना ज्यांना आपली सर्व्हिस देत असाल जॉब किंवा व्यापारांमध्ये त्यात लाभ होतील. त्यातील तुमच्या इच्छा पूर्ण होतील मात्र ह्यात काही आजारांशी सामना करावा लागेल तर तब्येतीकडे दुर्लक्ष नको. ह्यात काही कर्जाच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा दिसतील.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.— ह्यात कोणती मोठी गुंतवणूक करू नका थांबा आणि विचार करून करा कारण खूप मोठा फायदा होईल असे दिसत असेल तर सावधान.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. — ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मधील ज्या ज्या घटना होतील त्यावर तुम्ही मात करून पुढे जाल. आणि २१/११/२०२१ नंतर तुम्हाला त्यात लाभ आहेत एव्हढे नक्की जर मार्च ते मे मध्ये हैराण होऊन त्याला नोव्हेंबर पर्यंत खेचले असेल तर. तेव्हा जरा कळ सोसण्यात हरकत नाही गुरु चे पुढील भ्रमण हे तुमच्या भाग्य स्थानी असेल.

सर्वात महत्वाचे मिथुन राशी आणि मिथुन लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

ह्याचा अर्थ ५/५/२०२१ ते २०/६/२०२१ पर्यंत ज्यांच्या पत्रिकेत गुरु वक्री नाही त्यांना हा काळ चांगला आहे आणि २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत ज्यांच्या पत्रिकेत गुरु वक्री आहे त्यांना जे कराल ते मिळेल.

विवाह करायचा असेल मिथुन राशी आणि मिथुन लग्न वाल्याना तर वरील दोन्ही काळ हे उत्तम आहेत ५/५/२०२१ ते २०/६/२०२१ मधील विवाह हे सामाजिक पद्धतीत केलेले दिसतील मात्र २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ मधील ह्याच लग्न आणि राशी वाल्यांचे विवाह हे असामाजिक पण करून केलेले विवाह दिसतील ह्यात प्रेमी युगुलांना विवाह करण्यास जोर येईल.

कारण भाग्यात ह्यावेळी गुरु वक्री असेल आणि तो आपल्या भाग्याची काहीतरी उलट तयारी करेल नक्की. पण कराल तर सांभाळून पुढील काळात आपल्या पत्रिका चेक करून घ्या खास विवाह सुखासाठी.

खास नोट– माझ्या अभ्यासात आलेली एक गोष्ट

मिथुन राशी आणि मिथुन लग्नाला गुरु हा अकारक ग्रह आहे ह्याचा अर्थ तो आला काय आणि गेला काय काही फरक पडत नाही. त्यामुळे वरील सर्व विवेचन जे जे चांगले असेल ते ते घ्यावे वाईट सोडून द्यावे तुमच्या राशीला आणि लग्न वाल्याना राहू आणि शनी ची गोचरी जास्त प्रभावी ठरते. म्हणून राहू बदल च्या पोस्ट नक्की वाचा. मागे २४ सप्टेंबर पासून दिल्या आहेत त्या.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply