You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: कर्क राशी किंवा कर्क लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली कर्क राशी आणि कर्क लग्नाची आहे. जर आपण कर्क राशीचे आहात किंवा कर्क लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या कर्क राशी किंवा कर्क लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या सहाव्या स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत सहावे स्थान सोडून सातव्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या सप्तम स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. गुरु जेव्हा गोचरीने सप्तमात येतो आणि तो जर नीच राशीत येत असेल तर वैवाहिक सुखातल्या विषयी तुम्ही आपल्या ज्ञानाचा उपयोग नक्की कराल.

जो आत्तापर्यंत केला नसेल मागील १०/१२ वर्षापर्यंत. जर वैवाहिक नसाल तर ह्या वर्षी विवाह होण्यास हरकत नाही त्यात तुम्ही आपल्या शक्कल जास्त लावून ऍक्टिव्हेट व्हाल. ज्यांना वैवाहिक सुखातले काही त्रास असतील त्याला न्याय देण्याचा हा पिरियड अजिबात सोडू नका.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे कॉम्पिटिशन, कर्ज, कोर्टकेसेस, हेल्थ, जॉब पाहतात तेथील गुरु हा मालक नीच होऊन पुढील राशीत जात मकर मध्ये येत आहे. ह्याचा अर्थ वरील विषय तुमचे ह्या वर्षी असतील ज्यात काही धावपळ मागच्या वर्षी झाली असेल त्यात तुम्ही आता ऍक्टिव्हेट व्हाल आणि ते प्रश्न सोडवाल.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत भाग्यात येत आहे जिथून तुमचे काही चेंजेस पहिले जाते भाग्य पहिले जाते ह्यात सुद्धा आपल्या भाग्याची लक ची साथ घेण्यास तत्पर असाल.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या लग्न स्थानावर येत आहे. काही गोष्टी मागे ज्या अडकल्या होत्या त्या तुम्ही ह्या वर्षी पूर्णपणे त्यात मेहनत करून पूर्ण कारणात आहात. आपल्या हेल्थ बद्दल काही इशू होण्याचा संभव असेल काही त्रास होतील त्यास ह्या वर्षी दुर्लक्ष करू नका.

ह्या वर्षी गुरु आणि शनी एकत्र तुमच्या पहिल्या स्थानाला पाहत आहेत तर ते स्वतःला तुम्ही न्याय देण्याचे काम नक्की कराल.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी अकराव्या लाभ स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून नवीन नवीन मार्ग लाभाचे उत्पन्न होतील. त्यात तिथे राहू असल्यामुळे काही प्रॉफिट तुम्हाला एकदम मिळेल पण त्यात गुरु ची दृष्टी असल्यामुळे तुम्ही त्या प्रॉफिट मध्ये सेफ असाल. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे गुरु बदलाचे वर्ष तुम्हाला खास असेल.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे जिथून तुमचा पराक्रम पहिला जातो.छोटे प्रवास आणि भाऊबहिणी पहिल्या जातात. ह्यावर गुरु ची नीच दृष्टी पडल्यामुळे वरील विषय तुमचे ह्या वर्षी असतील तर त्यात थोडी धावपळ होईल पण त्यात सुद्धा तुम्ही सेफ असाल. काही गोष्टी पराक्रमाच्या फायदेशीर ठरतील.

गुरुचे उपाय

कर्क राशी आणि कर्क लग्न वाल्याना गुरुचे उपाय म्हणजे प्रत्येक गुरुवारी गायीला दोन केळी देणे आणि उत्तर दिशेला मुख करून रोज केसर चा टिळा नाभीला आणि कपाळावर लावणे. ह्या उपायांनी तुमच्या कडे असलेल्या ज्ञानाने तुम्ही चंचल होणार नाही आणि गुरूच्या नीच प्रभावाची वाईट फळे मिळणार नाहीत. चांगली फळे जरूर मिळतील.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे कर्क राशी आणि कर्क लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. — ह्यात कुटुंब आणि पैसे हा विषय तुम्हाला थोडा त्रासदायक असेल. त्यात असे विषय असतील तर त्यात ६/१/२०२१ पर्यंत धीर धरा.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल — ह्यात तुम्ही स्वतःला उत्तम प्रेझेंट करू शकता. फक्त हेल्थ बद्दल काही त्रास असतील तर वरील पिरियड मध्ये जास्त काळजी घ्या. हाच पिरिअड असा असेल ज्या गोष्टी तुम्ही मागे बरीच वर्षे वाट पाहत होतात आणि सुटत नव्हत्या आणि आता त्याची वेळ अली असे पाहण्यास मिळेल.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल – ह्यात तुम्ही शिक्षण घेत असाल तर काही निर्णय होतील. सर्व्हिस किंवा व्यवसायात असाल तर आपले ज्ञान लावून काही नवीन करण्याचा प्रयन्त जरूर कराल.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल.— ह्यात कोठेही मोठा लाभ होत असेल तर सावधान जसे दिसते तसे नसेल. काही प्रॉफिट संबंधित सर्व अभ्यास करा आणि पुढे जा. हा काळ जास्त चांगला नाही. काही लाभ होत असतील तर त्यात फसवणूक होणार नाही ह्याची काळजी घ्या. ज्या इच्छा पूर्ण होत आहेत त्या का होत आहेत ह्याचा विचार करा. थोडा वेळ घ्या.नंतर निर्णय घ्या.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. — ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मधील ज्या ज्या घटना होतील त्यावर अधिक संशोधन करण्याचा हा कालावधी असेल. थोडा त्रास होईल पण निभावू शकाल. आणि २१/११/२०२१ नंतर गुरु अष्टमात जाणार आहे तेव्हा २१/११/२०२१ च्या आधी वरील जेव्हढे जेव्हढे विषय हे हाताळता येत असतील त्यात अग्रेसर राहून पूर्ण करून घ्या.

सर्वात महत्वाचे कर्क राशी आणि कर्क लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

४) कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल. ह्यात कर्क लग्न आणि कर्क राशीला आपल्या प्रोफेशन , संतती ह्याबद्दल काही त्रास होण्याचा संभव असेल तर त्यातले निर्णय वरील कालावधीत जास्त ऍक्टिव्ह करू नका.

  • ५/४/२०२१ ते २०/६/२०२१ गुरु तुमच्या अष्टम स्थानी जाईल त्यात तुम्ही फटाफट निर्णय घेत असाल तर सावधान कारण नंतर तेथे गुरु वक्री होत आहे २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत ह्यात त्या निर्णयाचा त्रास होऊ शकतो खास संतान आणि करिअर संबंधित असेल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply