You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नाची आहे. जर आपण वृश्चिक राशीचे आहात किंवा वृश्चिक लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या दुसरया स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत दुसरे स्थान सोडून तिसऱ्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी च्या बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील. मागील वर्षी गुरूच्या तिसऱ्या घरात असण्याने जे जे त्रास झाले होते त्यावर आता तुम्ही मात करू शकता.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या तिसऱ्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. तिसऱ्या स्थानावरून तुमचे पराक्रम, शेजारी, लहान प्रवास, भावंड पहिले जातात.

दिनांक २०/११/२०२० च्या आधी जर आपल्या बद्दल वरील विषय असतील तर ह्यापुढे त्याबद्दल वरील विषयांत आपण मजबूत असाल.

ह्या बद्दलचे ज्या ज्या समस्या आपल्याला ह्या आधी झाल्या असतील त्यात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग उत्तम प्रकारे करून त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. पण त्यात काही तरी नवीन केलेच पाहिजे जे तुम्ही आत्तापर्यंत केलेले नसेल असे.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे कुटुंब, धन पाहिले जाते ह्या वर्षी ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही नक्की छोटे प्रवास कराल आणि त्यात पराक्रम सुद्धा दाखवाल.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत पाचव्या स्थानी येत आहे त्या मीन राशीचा मालक जेव्हा गोचरीने तिसऱ्या स्थानी येतो तेव्हा पाचव्या स्थानातील धावपळ सुरु होते. त्यात संतती हा विषय मुख्य असू शकतो. विद्यार्थी दशेत असणाऱ्यांची काही विशेष धावपळ दिसेल. ह्यात काही त्रास जाणवतील सुद्धा.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या व्या भाग्य स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे कोणताही नवीन भाग्योदय होण्यासाठीचा हा प्रयत्न असेल ह्या वर्षी. त्यात अति मेहनत करावी लागेल. काही जणांना आपल्या आधीच्या कार्याबद्दल काही बदल करावेसे वाटतील. आणि तसे ते होतीलही.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी सातव्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून वैवाहिक विषय येथे असू शकतील. हि गुरु ची दृष्टी राहू वर आणि शुक्राच्या राशीवर आहे म्हणून पती पत्नी मधील रिलेशन येथे सेफ जरी राहिले तरी त्यात खळखळ होऊ शकेल.

जरा धीर संयमाने वयगायला हवे ह्या वर्षी. कारण गुरु हा नीच होऊन तिसऱ्या स्थानी गेला आहे. काही विषय हे पैशाबद्दल चिंतेचे असू शकतील. चांगले हे असेल कि पैसा मिळेल तो कसाही मॅनेज करण्यासाठी तुमची धावपळ कामी येईल.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे अकरावे लाभ स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे. त्यामुळे काही लाभासाठी तुम्ही नवीन नवीन युक्त्या जरूर लावाल ह्या वर्षी आणि त्यात सफल सुद्धा व्हाल. पण त्यासाठी सुद्धा आधी पैसे खर्च होतील.

गुरुचे उपाय

वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना असा सल्ला दिला जातो कि प्रत्येक गुरुवारी कोणत्याही गुरुचे ग्रंथ वाचन, पाठ स्तोत्र, मंत्र करत जा लाभ होतील. ह्या गोष्टी जमत नसतील तर आपणास प्रत्येक गुरुवारी पिवळे काहीही हि दान करत जा कुटुंबात शांती लाभेल. ज्याच्यासाठी हे वर्ष तसे चांगले नाही.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. ह्यात आपल्याला काही करिअरबद्दल कर्माबद्दल धावपळ होऊ शकते पण ती खूप पॉजिटीव्ह असेल.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. ह्यात गुरु च्या ७ व्या दृष्टीत जे जे लिहिले आहे त्यात तुम्ही ऍक्टिव्ह असाल. आपल्या भाग्योदयासाठी इथे पैसे खर्च कराल.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. ह्यात आधीच्या आजारांवर जास्त धावपळ होऊ शकते. शारीरिक पीडा ह्यावर लक्ष ठेवा.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात त्रास होण्याचा बराच संभव असेल. ह्यात बऱ्याच निगेटिव्हिटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ह्यात जास्त घाई करू नका.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण मकर मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. ह्या कालावधीत जॉब मधील एखादी ट्रान्सफर दिसेल, कामानिमित्त इतर ठिकाणी जाण्याचा योग, धावपळ दिसते, आरोग्यासाठी काही विषय असू शकतील.

सर्वात महत्वाचे वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नवाल्याना

गुरु च्या मकर राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

ह्यात वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीला आपल्या प्रॉपर्टीज बद्दल किंवा घराच्या एखाद्या सुखाबद्दल तुम्ही ऍक्टिव्हेट असाल. आपल्या पत्रिकेत जर गुरु वक्री असेल तर २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ हा काळ आपल्यासाठी फार उत्तम असेल. जे कराल ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर यश खेचून आणाल.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. YOGITA

    nice information

Leave a Reply