You are currently viewing Kamika Ekadashi – कामिका एकादशी-16th July 2020

कामिका एकादशी – Kamika Ekadashi- 16th July 2020

वर्षभरातील २४ एकादशी चे एक एक वेगळे फळ आहे त्यात कामिका एकादशीचे ( Kamika Ekadashi- 16th July 2020 ) फळ पापभय मुक्त सांगितले आहे. जाणून बुजून किंवा न जाणतेपणाने जे जे लहानात लहान मोठ्यात मोठे पाप आपल्या हातून झालेले असते त्याचे जे भय सतत लागते त्यातून मुक्त होण्यासाठी हे व्रत केले जाते.

मुहूर्त कामिका एकादशीचा (Kamika Ekadashi)

कामिका एकादशीः १६ जुलै २०२०

एकादशी प्रारंभः १५ जुलै २०२० रोजी रात्रौ १० वाजून २० मिनिटे

एकादशी समाप्तीः १६ जुलै २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ४४ मिनिटे

व्रत सांगता वेळः १७ जुलै २०२० रोजी पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून १९ मिनिटांपर्यंत.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने कामिका एकादशीचे व्रत गुरुवार, १६ जुलै २०२० रोजी आचरावे.

एकादशी चे व्रत कसे करावे

हे व्रत दशमी पासून सुरु होते व्रत करणार्यांनी एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच व्रताचा संकल्प करावा. रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करावे. घरातील विष्णू प्रतिमेला किंवा कृष्णाला किंवा विठ्ठल प्रतिमेला नमस्कार करून मनोभावे पूजा करावी.

पूजेत  मूर्ती  असेल तर तिला पंचामृताने स्नान घालावे आणि ते पंचामृत घरातील सर्वाना विशेष करून लहान मुलांना जरूर द्यावे. त्यांच्या वागणुकीत बराच बदल होईल. नंतर धूप दीप नैवेद्य (ह्यात खडीसाखर + दही) दाखवावा. नंतर आपल्या नित्य कार्यक्रमास रुजू व्हावे.

खास तुळशीपत्र , पिवळी फुले , पिवळे एखादे वस्त्र पूजेसाठी वापरणे उत्तम. एक दोन कापूर वडी ने देवाची आरती करावी.

दुपारच्या वेळेला पितरांच्या नावे एखाद्या गरिबाला अन्न दान देता आले तर जरूर द्यावे. ह्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो .

संध्याकाळी किंवा दिवसभराच्या कामातून उसंत जशी मिळत असेल तेव्हा विष्णू सहस्त्र नाम जरूर एकदा वाचावे. हे जमत नसेल तर विष्णू ची १०८ नावे , किंवा ॐ क्लीं कृष्णाय नमः किंवा ॐ नमो भागवते वासुदेवाय चा १०८ वेळा (एक माळा) जप करावा. ह्याबरोबर श्री सूक्त सुद्धा वाचावे (३ मिनिटात होते हे) ह्यातले जमेल तेव्हढे जास्तीत जास्त करावे 

गीतेतील ११ वा अध्याय ह्या दिवशी वाचावाच त्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या वैकुंठ प्रवासातील अडचणी दूर होतात.

पिंपळाच्या झाडाची सेवा अवश्य करावी एकादशीला – रात्री एक दिवा तुपाचा शिवाकडे आणि एक दिवा पिंपळाकडे जरूर लावून यावा. वर्षभर २४ एकादशी केल्याने ह्यात पूर्ण गाडी रुळावर येते. कष्ट कमी होतात.

रात्री फराळ करावा (ह्यात तुमच्या रितीरिवाजाप्रमाणे समजावे फराळात काय काय चालेल ते आणि जे उपलब्ध  असेल ते घ्यावे) अन्न खाऊ नये कोणतेही. सर्वात उत्तम – फळे.

शक्यतो जमत असेल तर ह्या रात्री जागरण करावे. महालक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो. सुख धनसंपदा ऐश्वर्य येते.  

दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला एकादशी चे पारण (उपवास सोडणे) करताना जसे आपल्याकडे उपवास सोडण्याच्या पद्धती आहेत त्याचा अवलंब करावा- अगदीच घाई गडबड असेल तर एक लिंबू पाणी पिऊन सुद्धा ह्याची सांगता करू शकता.

व्रताचे नियम आदल्या दिवशी दशमी च्या रात्री  पासून पाळावेत ते असे 

काय करावे अथवा करू नये

  • मांस लसूण कांदा मसूर डाळ , भात जेवणात घेऊ नये 
  • रात्री पूर्ण ब्राह्मचार्याचे पालन करावे. भोग विकासापासून दूर राहावे. 
  • एकादशी च्या दिवशी सकाळी शक्य असल्यास निम जांभूळ किंवा आंब्याच्या पानाने चघळून दात साफ करावे. नसेल शक्यता तर काही हरकत नाही.
  • एकादशी च्या दिवशी कोणत्याही झाडाची रोपट्याची पाने तोडू नयेत , खास तुळस कुरतडू नये.
  • पूर्ण दिवस विष्णू कृष्ण ह्यांचा मानसिक जप करावा. 
  • खोटे बोलू नये , उग्र वागू नये , चहाड्या करू नये.
  • दिवसभर एकादशी एकादशी चा उच्चार इतरांशी बोलताना जरूर करावा.
  • कोणत्याही जीव मात्राची सेवा जरूर करावी ह्या दिवशी पण त्याला कोणतीही इजा होणार नाही त्याची हत्या होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. कारण विष्णू हा पालनकर्ता आहे आणि ह्या दिवशी एक कीड जरी आपल्याने मरत असेल त्याचे पाप पुढे सहन करावे लागते.
  • गायी ला चणा डाळ (भिजवून) नरम करून  त्यात गूळ घालून द्यावे ह्याने पत्रिकेतील गुरु ग्रह बलवान होतात. 

वरील सर्व नियम जर घरातील व्यक्तीना एकत्र करता येतील तर सर्वानी करावे नाहीतर एकादशी च्या दिवशी प्रत्येकाने जबाबदारीने ह्यातील काही ना काही जमेल तेव्हढे करावे.

ज्यांना उपवास करण्यास जमत नाही त्यांनी अजिबात काळजी करू नये. जास्तीत जास्त दिलेले नियम पाळून सुद्धा ह्याची सुंदर प्रचिती घेऊ शकता चांगल्या फळाची. 

ह्यात अजून महत्वाचे म्हणजे ह्या पोस्ट चा जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सुद्धा तुम्ही ह्याची चांगली फळे अनुभवू शकता. तेव्हढाच ह्यात तुमचा सुद्धा खारीचा वाटा.

ह्यात माझा कोणतीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही.

धन्यवाद

This Post Has 11 Comments

  1. Yadnesh Ramesh Dalvi

    🙏 Nice helpful guidance 🙏👌💐

  2. Pravin Sawant

    Khup sunder..Thanks very much…Jai Shree Krishna🙏🙏🙏

    1. Devendra Kunkerkar

      थँक्स

  3. Kalpana Sawant

    खूप उपयुक्त माहिती मिळाली 🙏 धन्यवाद😊
    ओम नमो भागवते वासुदेवाय ,🙏🙏

    1. Devendra Kunkerkar

      धन्यवाद .

  4. Jayashree Nalawade chiplun

    It very beautiful post,

    1. Devendra Kunkerkar

      थँक्स .

  5. Tejas Deelip Masurkar

    Very Informative and Helpfull 🙏 || Om Namo Bhagwate Vasudevaya Namaha || 🙏

    1. Devendra Kunkerkar

      थँक्स

  6. Devendra Kunkerkar

    धन्यवाद . सर

    1. Devendra Kunkerkar

      धन्यवाद

Leave a Reply