You are currently viewing घर घेताय? घेऊन झाले? काय सांगते नूमरॉलॉजि?

घर घेताय? घेऊन झाले? काय सांगते नूमरॉलॉजि?

घर घेताय? घर किंवा जागा घेऊन झाली आहे ? तर आपल्या जन्मतारखेत अंक २,५ आणि अंक ८ चा विचार झालाच पाहिजे.

२/५/८ हे अंक प्रॉपर्टीज प्लॅन म्हणून मानले जातात. अशा कोणत्याही प्रॉपर्टी ज्या व्यक्ती आपल्या नावाने समाजाला दाखवत असतो कि हे त्याच्या नावाचे आहे.

अशा विषयात फक्त घर, जागा जमीन जुमला एव्हढेच नसते तर आपला नवरा आपली आपली पत्नी आपली मुले सुद्धा ह्यात येतात. आपले बँक बलॅन्स, आपल्या ठेवी, आपल्या घरातील सर्व वस्तू , जे जे आपण आपल्या नावाने आणतो त्या सर्व गोष्टी ह्या आपल्या प्रॉपर्टीज म्हणून इथे येऊ शकतील.

विषय असा येतो कि जर 2/5/8 आपल्या जन्मतारखेत नसतील तर किंवा ह्यातील कोणतेही एक किंवा दोन नंबर जरी नसतील तर किंवा वरील तिन्ही नंबर पैकी आपला मूलांक किंवा भाग्यांक सुद्धा येत नसेल तर वरील सर्व प्रोपेटीज चे विषय हे व्यक्तीला सॉफ्ट मिळणार नाहीत.

कसे कसे येत नाहीत ह्याचा विचार करू

समजा व्यक्तीची जन्मतारीख ४/३/१९७१ असेल तर आधी ह्यात २/५/८ चा संबद्ध येतच नाही. आणि ह्याचा मूलांक ४ आणि भाग्यांक (सर्व बेरीज करून ४+३+१+९+७+१=२५ येते पुन्हा २+५= ७ एक अंकी संख्या) भाग्यांक ७ येत आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकाराने २/५/८ चा संबंध येत नाही.

२/५/८ तिन्ही अंक नसतील तर?

प्रॉपर्टी च्या बाबतीत सर्व विषय हे कठीण होऊन बसतील. ह्यात त्याच्या जोडीदाराच्या जन्म तारखेत किंवा मुलांच्या जन्मतारखेत जरी हे नंबर आलेत तर थोडा विषय पुढे सरकेल. पण कठीण जाईल जेव्हा प्रोपेटीज कोणत्याही जमा करेल किंवा जमा झाल्यावर तरी त्रास जाणवेल.

हेही वाचा :- बाळाचे नाव ठेवताय ? नक्की वाचा

फक्त २ नंबर असेल आणि ५/८ नसेल?

जर व्यक्तीच्या जन्मतारखेत फक्त २ असेल तर असा व्यक्ती कोणतीही प्रॉपर्टी जमा करताना त्याला घरातील आईचा किंवा इतर व्यक्तीचा किंवा त्याच्या सर्कल चा सपोर्ट मिळतो.

८ नंबर हा आपल्या मेहनतीने आपल्या कमाईच्या पैशातून जमा केलेली प्रॉपर्टी दाखवतो आणि जर हा नंबर नसेल तर मात्र एखाद्याला प्रॉपर्टी जमा करताना वयाची ४२ पर्यंत त्रास होतो. किंवा वयाच्या ३६ पर्यंत त्याची प्रॉपर्टीज होत नाही आणि जरी ४२ च्या आधी त्याच्या स्वखर्चाने प्रॉपर्टी जमा झाली तरी त्यात किटकिट काहीनाकाही प्रॉब्लेम्स हे वयाच्या ४२ पर्यंत असतील नक्की.

म्हणून अशा व्यक्तींना सल्ला असा देण्यात येतो कि कोणत्याही प्रॉपर्टी जमा करताना आधी २ चा सपोर्ट घ्या नंतर वयाच्या ३६ नंतर स्वतःची प्रॉपर्टी घ्या स्वतःच्या पैशाने. किंवा असेही करता येते कि जर वयाच्या ४२ पर्यंत आनंदच मिळणार नसेल तर त्या प्रोपेटी मध्ये राहायलाच जावू नये. रेंट वर द्यावी आणि आपण ४२ पर्यंत दुसरीकडे राहावे.

पण ह्यात सुद्धा रेंट देणारा काही ना काही त्रास देतोच. फायदा होत नाही असे दिसून आले. किंवा त्याने दिलेले पैसे हे आपल्या डेव्हलोपमेंट साठी उपयोगीच पडत नाही असे सुद्धा दिसले. ह्याचे कारण ५ अंकाचा सुद्धा सपोर्ट नाही.

फक्त ५ अंक असेल अणि २ अणि ८ नसेल तर …….

५ अंक असेल ह्याचा आनंद म्हणजे आपल्यात एक कला आहे जी प्रॉपर्टी घेतल्यावर त्याला बॅलन्स करण्यासाठी लागते. पण प्रोपेटी घेण्यासाठी २ अंक हा आपल्या जवळच्यांचा जो सपोर्ट असतो तो मिळत नाही. आणि ८ अंकासाठी जो कमीपणा आहे तो वरील प्रमाणेच आहे.

बरेच जण २ अंक नसताना आईवडिलांच्या घरात राहून तेच घर कमाईचे स्वतःसाठी नावावर करून घेतात किंवा ते आपोआप त्यांनाच मिळते. पण एक जाणून घ्या कि जेव्हा असे होईल तेव्हा त्याच घरात त्यांची प्रगती दिसली नाही. त्यामुळे सल्ला असा देण्यात येतो कि २ नसेल तर पहिली प्रॉपर्टी हि सर्कल च्या सपोर्ट ने मिळविण्याचा प्रयत्न करू नये.

फक्त ८ असेल आणि २ आणि ५ नसेल तर …..

जर आपल्याकडे फक्त ८ असेल तर जाणून घ्या कि पहिली प्रॉपर्टी हि स्वतःच्या मेहनतीच्याच पैशाने घ्यावी. ५ नसल्यामुळे बँकिंग सपोर्ट मिळताना थोडा कमी मिळतो.आणि २ नसल्यामुळे सर्कल चा सपोर्ट सुद्धा कठीण होऊन बसतो. पण अशा व्यक्तीने जिद्द केली तर त्याची पहिली प्रॉपर्टी हि वयाच्या ३६ च्या आसपास होतेच.

फक्त २ नसेल तर …

काळजी घ्या कि पहिली प्रॉपर्टीज हि घरातल्यांच्या मदतीने घेऊ नका. किंवा कोणत्याही गिफ्ट स्वरूपात प्रॉपर्टीज घेऊ नये.

फक्त ५ नसेल तर..

जेव्हा आपण प्रॉपर्टी घ्याल तेव्हा जर लोन ने घेत असाल तर बँकिंग सपोर्ट किती आहे ते चेक करा. लोन किती घ्यावे ह्याचा अभ्यास करा. नाहीतर बऱ्याच जणांना ५ नसताना पुढे एक लोन फेडण्यासाठी दुसरे लोन काढावे लागते किंवा असेल ते लोन फेडताना कठीण होते. ह्यापैकी कोणतीही गोष्ट घडत नसेल किंवा तुम्ही लोन सुद्धा घेतले नसाल तर मात्र तुम्ही ज्या प्रोपेटी घेता त्याची किंमत वाढत नाही किंवा रेंट वर देताना त्याचा त्रास होतो. किंवा दिल्यावर त्रास होतो. जर ५ नसेल तर लोन घेऊन किंवा रेंटल प्रॉपर्टी जमा करत असाल तर प्रॉपर्टी घेऊ नये.

फक्त ८ नसेल तर…

ह्यात आपल्याला असा सल्ला देण्यात येतो कि पहिली प्रॉपर्टी घेताना खूप उशिरा घ्यावी जेव्हा तुम्ही कमीत कमी लोन घ्याल किंवा कमीत कमी सर्कल चा सपोर्ट घ्याल.

आता बऱ्याच वेळी ९०% वक्ती हि त्याची प्रॉपर्टी किंवा एखादे घर, जमीन जुमला हे लग्नाच्या नंतरच घेत असतो. अशा वेळी जे नंबर आपल्याकडे नाहीत ते आपल्या जोडीदाराच्या जन्म तारखेत आहेत का ते चेक करा. २/५/८ हे तिन्ही नंबर जर दोंघांची जन्मतारीख मिळून होत असतील तर जास्त त्रास होणार नाही. समजा एकाकडे फक्त २ आहे आणि ५/८ नाही तर ते अंक जोडीदाराकडे असतील किंवा त्याचा फक्त भाग्यांक होत असेल तरी जास्त त्रास होत नाही.

नूमरॉलॉजि करताना जो जो अभ्यास मला मिळतो तो मी आपल्यासमोर मांडला आहे. ह्याची सत्यता तुम्ही सुद्धा पारखून घ्यावी हि विनंती.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768

Leave a Reply