You are currently viewing राशी भाग्यवान योग I RASHI BHAGYAWAN YOG


राशी भाग्यवान योग– आपल्याकडे जर चंद्र कुंडली असेल तर ती पहा. सर्वांच्या चंद्र कुंडलीत पहिल्याच स्थानी चंद्र लिहिलेला असतो. त्या नंबर ची राशी हि तुमची स्वतःची राशी असेल. खालील दिलेले कोष्टक हे राशीच्या स्वामींच्या नावाचे आहे. त्यासमोर आपल्या राशीचा मालक लिहिला आहे.

राशी भाग्यवान योग हे लग्न कुंडलीत सुद्धा पाहता येते — आपला चंद्र कोणत्या आकड्याबरोबर लिहिला आहे ते पहा ती राशी आपली आहे. तिथून घडाळ्याच्या उलट दिशेनं मोजून जर तुमच्या राशीचा मालक ९ व्या स्थानी लिहिला असेल तरी वरील योग आपल्या पत्रिकेत असेल..

  • १ किंवा ८ लिहिले असेल तर तुम्ही मेष किंवा वृश्चिक राशीचे असाल. — मंगळ — कुंडली क्रमांक १ पहा
  • २ किंवा ७ लिहिले असेल तर तुम्ही वृषभ किंवा तुला राशीचे असाल — शुक्र — कुंडली क्रमांक २ पहा
  • ३ किंवा ६ लिहिले असेल तर तुम्ही मिथुन किंवा कन्या राशीचे असाल — बुध —-कुंडली क्रमांक ३ पहा.
  • ५ लिहिले असेल तर आपली सिंह राशी आहे — रवी — कुंडली क्रमांक ४ पहा
  • ९ किंवा १२ लिहिले असेल तर आपली धनु किंवा मीन राशी लिहिली आहे — गुरु — कुंडली क्रमांक ५ पहा
  • १० किंवा ११ लिहिले असेल तर आपली मकर किंवा कुंभ राशी असेल — शनी कुंडली क्रमांक ६ पहा

नोट — कर्क लग्नात हा योग होत नाही. कारण चंद्रापासून त्या राशीचा मालक ९ व्या स्थानी येताच नाही. पण माझ्या मते कर्क लग्नासाठी जर गुरु चंद्र कुंडलीत भाग्य स्थानी असेल तर ह्या योगाची फळे मिळतील असे मानण्यात हरकत नाही.

हेही वाचा :- पौर्णिमेचे चंद्र स्ट्रॉंग करण्याचे उपाय

राशी भाग्यवान योगाची फळे

हे समजल्यावर चंद्र राशी कुंडलीत चंद्रापासून घडाळ्याच्या उलट दिशेने मोजून जर ९ व्या स्थानात आपल्या राशीचा मालक लिहिला असेल तर आपली राशी हि आपल्याला अति भाग्यवान असेल. अशा व्यक्तींच्या जीवनात अपयश आले किंवा कितीही अडचणी आल्या तरी व्यक्ती त्या अडचणींतून सहज बाहेर पडतो. १००%. अशा व्यक्तींना भाग्याने सर्व गोष्टी मिळतात. अशा व्यक्तीला खूप काही स्वतःला प्रयत्न करावे लागत नाहीत. — पण अशा व्यक्तींना एक सल्ला जरूर दिला जातो कि स्वाभिमान बाळगून आयुष्य जगा नाहीतर आयते मिळते म्हणून त्याची सवय लावून घ्याल. आणि स्वतःला प्रेसेंट करण्यासाठी नंतर त्रास होईल.

खाली ज्या चंद्र कुंडल्या दाखविल्या आहेत जर अशीच कोणतीही एक चंद्र राशी कुंडली आपली असेल तर वरील सर्व चांगली फळे आपल्याला लागू पडतील आणि आपण भाग्यवान असाल.

धन्यवाद…..!

Leave a Reply