You are currently viewing महाअष्टमी उपवास केव्हा ?

शुक्रवार दिनांक २३/१०/२०२० ला सकाळी ६ वाजून ५८ मिनिटाने सप्तमी तिथी समाप्त होत आहे आणि तेथूनच अष्टमी तिथी सुरुवात होत आहे.ती तिथी शनिवारी ७ वाजून १ मिनिटापर्यंत असेल. त्या दिवशी ६:३८ वाजता सूर्योदय होत आहे.

शनिवार दिनांक अष्टमी तिथी ६:५८ मिनिटापर्यंत आहे. महा अष्टमी उपवासाकरिता अष्टमी तिथी सूर्योदयापासून १ घटी (म्हणजे २४ मिनिटे) असणे अवश्यक आहे. त्यामुळे ज्या प्रदेशात ६:५८ मधून २४ मिनिटे वजा केली असता ६:३४ मिनिटांपूर्वी सूर्योदय होत आहे अशा सर्व प्रदेशात २४ आक्टोबर शनिवार रोजी अष्टमी चा उपवास करावा.

ज्या प्रदेशात ६:३४ नंतर सूर्योदय होत आहे अशा ठिकाणी अष्टमी तिथीची व्याप्ती १ घंटीपेक्षा कमी असल्याने अशा प्रदेशात २३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारीच उपवास करणे योग्य होईल.

२३ ऑक्टोबर रोजी सूर्योदय ६:३४ नंतर असल्याने खालील शहरवासियांनी शुक्रवारी उपवास धरावा.
मुंबई, ठाणे, कल्याण, अलिबाग, श्रीवर्धन, संपूर्णतः गुजरात, राजस्थानमधील उदयपूर, जोधपूर, बिकानेर, चंदिगढ सोडून संपूर्ण पंजाब.

२४ ऑक्टोबर रोजी सूर्योदय ६:३४ पूर्वी असल्याने खालील शहरवासियांनी शनिवारी उपवास धरावा.
(मुंबई, ठाणे) सोडून महाराष्ट्रातील संपूर्ण प्रदेश गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ मध्य प्रदेश राजस्थानातील जयपूर कोटा , चंदिगढसह संपूर्ण उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल.

थोडक्यात असे कि जर आपल्या प्रदेशात ६:३४ नंतर सूर्योदय असेल तर शुक्रवारी आणि ६:३४ च्या आधी सूर्योदय असेल तर शनिवारी महाअष्टमी चा उपवास धरावा.

हेही वाचा :- नवरात्रीत देवीचे ९ स्वरूप , वर्णन , मंत्र आणि नैवेद्य

ज्यांच्या घरी कालनिर्णय पंचांग असेल त्यांनी मागील बाजूस सविस्तर वाचावे.

त्या प्रमाणे अष्टमी हवन सुद्धा ज्यांनी शुक्रवारी उपवास केला असेल त्यांनी शनिवारी हवन करावा
आणि शनिवारी उपवास केला असेल त्यांनी रविवारी हवन करावा. हे माझे मत. तसेच अष्टमी होम हवन शनिवारी आणि नवमी हवन रविवारी सामान्यतः करता येईल.

शनिवारी अष्टमी हवन मुहूर्त त्या त्या प्रदेशातील सूर्योदयापासून ५:४३ पर्यंत आहे. रविवारी अष्टमी/नवमी हवन सकाळी ९ पर्यंत करून घ्यावा.

घरी हवन करण्याची पद्धती पुढील पोस्ट मध्ये वाचावी.

धन्यवाद…..!

Leave a Reply