You are currently viewing सूर्यग्रहण सोमवार दिनांक १४ डिसेंबर २०२०

खगोलीय व्याख्या

एका वाक्यात जर याचे खगोलीय विश्लेषण करायचे असेल तर सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या मध्ये चंद्र येतो आणि सूर्य हा काही काळासाठी पूर्णपणे किंवा आंशिक झाकला जातो म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी हे एका रेषेत येतात. त्या प्रोसेस ला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण केव्हा सुरु होईल ?

दिनांक १४ डिसेंबर ला सूर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०३ ला सुरु होईल आणि रात्री १२:२३ पर्यंत असेल. हा कालावधी साधारण ५ तास २० मिनिटांचा असेल.

भारतातून सूर्य ग्रहण दिसणार नाही

हे सूर्यग्रहण संध्याकाळी पडल्याने भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ह्या ग्रहणात असणारे सुतक नियम पाळू नयेत. तसेच देवालये बंद होण्याचे नियम सुद्धा लागणार नाहीत. नेहमी प्रमाणे पूजा विधी, पाठ ह्याला मान्यता असेल.

कोणत्या राशी नक्षत्रात लागत आहे हे ग्रहण

ग्रहण वेळेत सूर्य आणि चंद्र हे वृश्चिक राशीत आणि जेष्ठा नक्षत्रात असतील. ह्याबरोबर वृश्चिक राशीत बुध शुक्र आणि केतू सुद्धा एकत्रित असतील.

माझ्या मते हे ग्रहण भारतातून दिसणारे नसले तरी आणि त्याचे काहीही सुतक नसले आणि हि एक खगोलीय घटना असली तरी वृश्चिक राशीं च्या व्यक्तींनी निदान पुढील १५ दिवस तरी सावधान राहावे.

कोणतेही मोठे निर्णय घेताना, छोटे मोठे प्रवास करताना सतर्कता बाळगावी. प्रवास करण्या अगोदर घरातून निघताना रामरक्षा किंवा हनुमंताचे स्मरण, पाठ , एखादे स्तोत्र, चालीसा करून निघावे. किंवा हे जमत नसेल तर वाटेत एखादे हनुमंताचे देऊळ असेल तर दर्शन करून पुढे जावे. निदान हे पुढील १५ दिवस तरी कडक पाळावे.

कोणत्या प्रांतात सूर्यग्रहण दिसेल ?

दक्षिणी अफ्रीका, दक्षिण अमेरिका चा काही भाग, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि हिंद महासागर आणि अंटार्कटिका ह्या प्रदेशांतून सूर्य ग्रहण दिसेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply