बुधवार आणि तुमचा पैसा

बुध हा बुद्धीचा दाता
बुध लक्ष्मी दाता
बुध कॅल्क्युलेशन चा दाता.

कुणाकडे किती पैसे कसे येत आहेत आणि त्याचे पैशाबद्दल चे व्यवहार कसे आहेत हे एकट्या बुधा वरून ओळखता येते. पत्रिकेत जर बुध स्ट्रॉंग असेल तर त्या व्यक्तीला पैशाबद्दल काहीच काळजी नसते.

पत्नी आणि मुलगी हि लक्ष्मी समान असल्यामुळे बुधवारी कधीही पत्नी ला माहेरी आणि मुलीला सासरी पाठवू नये.

बुधवारी कोणालाही पैसे उधार देऊ सुद्धा नयेत. (परत न घेणारे पैसे चालतील) . अगदीच जर असा व्यवहार करण्याची गरज लागली तर एका झाडाचे हिरवे पान स्वतःजवळ ठेवावे किंवा वेलची तोंडात ठेवावी.

बुधवारी बँकेत जमा पैसे जरूर करावेत. काही मोठे डिपॉझिट करणे रिकरिंग काढणे अशा गोष्टी जरूर कराव्यात. ह्याने पैसा सुरक्षित राहतो आणि वाढतो सुद्धा.

बुधवारी ५ वेलची हिरव्या कपड्यात बांधून स्वतःजवळ ठेवल्याने धनासंबंधित लाभ होतात.

बुधवारी नेहमी किन्नर ला जमेल तशी मदत करावी ह्याने धनासंबंधित फायदे दिसतील नक्की. किन्नर ने पुन्हा त्यांच्या हातून दिलेले पैसे हे आपल्या पर्स मध्ये ठेवल्याने पैशाला बरकत येते असा कित्येक जणांचा समज आहे. पण हे जरा जपूनच द्यावे घ्यावे. परिस्थिती पाहून कार्य करावे.

बुधवारी वेलची आणि खडीसाखर घरातून बाहेर जाताना खाऊन जाणे हे कोणत्याही धनासंबंधित किंवा जॉब संबंधित कार्यात शुभत्व निर्माण करते.

बुधवारी महालक्षमी समोर 2 हिरव्या वेलची तुपात भिजवून ठेवाव्यात पैशाची कामे होतात.

बुधवारी सर्वात सोपा मार्ग जर हळू हळू पैसा वाढवायचा असेल तर वायफळ बोलू नये. खूप कमी बोलावे. किंवा मौन व्रत पाळल्याने व्यक्तीकडे लक्ष्मी प्राप्ती होते. ज्यांचा व्यवसाय नोकरी हा बोलण्यासंबंधित आहे अशा व्यक्तींनी सकाळी घरातून बाहेर पडताना अंगठा आणि करंगळी ह्यात एक वेलची ठेऊन ‘बुं ‘ हा शब्द ७ वेळा म्हणून ती वेलची तोंडात टाकून थोडी चघळून बाहेर पडावे. ह्याने चांगले परिणाम होतील. वाचा फुकट जाणार नाही. आणि मुख्य म्हणजे तुमच्या शब्दांना चांगला प्रतिसाद मिळेल. बुधवारी इंटरव्युव्ह ला जाणाऱ्यांनी हे जरूर करावे लाभ होतील.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    It very best information 👍

Leave a Reply