You are currently viewing चंद्र ग्रहण २६ मे २०२१ I LUNAR ECLIPSE ON 26 May 2021

२०२१ चे पहिले खग्रास चंद्र ग्रहण म्हणून ह्याकडे पहिले जात आहे. भारतातून काही प्रातांत हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल.

सूर्य आणि चंद्र ह्यामध्ये एका सरळ रेषेत पृथ्वी येते आणि चंद्रावर सूर्याची किरणे पोहचत नसल्यामुळे चंद्र दिसेनासा होतो तेव्हा चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात आणि हि घटना पूर्णिमेलाच होते.

चंद्र ग्रहण २०२१ च्या वेळा – TIME TABLE CHANDRA GRAHAN 2021

  • भारतीय वेळेनुसार १५:१५ मिनिट पासून आणि सायंकाळी १८:२३ पर्यंत हे ग्रहण असेल
  • ग्रहणाचा मध्य १६:४९ असेल ह्या वेळीच भारताच्या काही प्रांतातून ग्रहण दिसेल.

ग्रहण दिसणारे प्रदेश

आशिया खंडातील पूर्वेकडील प्रदेश, ईशान्य भारत, चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, श्रीलंका, अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, कॅनडा या प्रदेशांत ग्रहण दिसणार आहे.

भारतातील ग्रहण दिसणारी काही प्रमुख शहरे

ओरिसातील पुरी, भुवनेश्वर, कटक, बालासोर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, जलपायगुडी, सिलिगुडी, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, आसाम, मिझोरम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर, इत्यादी प्रदेशात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पळू नयेत.

ग्रहणाचे देशावर परिणाम

ह्यावेळी चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात आहे. वृश्चिक राशी जलतत्त्व राशी आहे म्ह्णून पाण्यापासून भरपूर नुकसान ह्या चंद्र ग्रहणावर होण्याचे दिसेल. समुद्र किनारी प्रदेशात नैसर्गिक आपत्तीची स्थिती निर्माण होईल.

पश्चिम बंगाल ओडिसा वादळ वारा पाऊस ह्यांचा वाईट परिणाम दिसून येईल, ईशान्य भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये ग्रहणानंतर एका महिन्यात भूकंपाचे काही झटके जाणवू शकतात.

अरुणाचल प्रदेशाच्या ईशान्य सीमेवर युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रहणानंतर तीन महिने भारताला शेजारील देश पाकिस्तान, चीनच्या हालचालींवर लक्ष द्यावं लागेल आणि सतर्क राहावे लागेल.

कोरोना महामारी पुढील १५ दिवस उच्चांक गाठेल मृत्यूचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असेल. नंतर स्थितीत चांगला बदल होईल अशी अशा धरण्यास काही हरकत नसेल. येत्या १५ दिवसात केंद्रात मोठे निर्णय घेतले जातील. भारताच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा रिझर्व्ह बँक मोठे निर्णय घेईल.

मेष, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ ह्या राशीच्या व्यक्तींनी ग्रहण काळात पुढील १५ दिवस विशेष काळजी घेणे.

ज्यांना चंद्राची महादशा असेल त्यांनी सुद्धा विशेष काळजी घ्यावी.

ग्रहण काळात आपण मंत्र जाप करायचा असेल तर चंद्राचा मंत्र करणे उत्तम..

ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः

ॐ सों सोमाय: नमः

धन्यवाद…..!

Leave a Reply