You are currently viewing रुचक योग- पंचमहापुरुष योग I RUCHAK YOG

कसा बनतो रुचक योग?

पंचमहापुरुष योगातील एक योग जो मंगळामुळे होतो. ह्या योगात लग्न कुंडलीच्या केंद्र स्थानात मंगळ उच्च राशीत किंवा स्वराशीत लिहिला असेल तर रुचक योग होतो.

 • केंद्र स्थाने –(प्रथम चतुर्थ सप्तम दशम )
 • मंगळ ची उच्च राशी — मकर १० नंबर
 • च्या स्वराशी — मेष आणि वृश्चिक १ आणि ८ नंबर.

रुचक योगाची फळे

मंगळाला ज्योतिष mशास्त्रात सेनापती चे पद आहे. आणि जर पत्रिकेत केंद्र स्थानी स्वराशीचा मंगळ किंवा उच्च राशीचा मंगळ एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत दिसत असेल तर अशा व्यक्तीला रुचक योगाची फार चांगली फळे जी मंगळापासून मिळतील ती फार सुंदर असतील.

असा व्यक्ती निडर, साहसी, बलवान, मजबूत इच्छाशक्ती असणारा, आणि पराक्रमी असतो. एखाद्या मैदानी खेळात तो प्राविण्य सुद्धा मिळवू शकतो. सेना पोलीस नेव्ही अशा क्षेत्रात असे लोक पाहण्यात येतात. कधी कधी असे हि पाहण्यात येते कि दुसऱ्यांच्या प्रगतीत अशा व्यक्तींचा मोठा वाटा असतो. पण त्यात स्वतःचे नुकसान करूनच असेल. हाच योग जर स्त्रियांच्या पत्रिकेत असेल तर ते पुरुषी बाणा असलेल्या व्यक्तिमत्वाच्या असू शकतात. एक धमक असते अशा स्त्रियांमंध्ये.

पण हा योग होत जरी असला तरी मंगळ हा उत्तम स्थिती असावा म्हणजे त्याच्या डिग्रीज आणि त्याच्यावर येणाऱ्या ग्रहांची स्थिती तसेच तो कोणत्या ग्रहाबरोबर युतीत आहे ते पाहून निर्णय घ्यावा लागतो आणि हे जर मंगळाकडे निगेटिव्ह दिसले तर मात्र असा योग असून सुद्धा फायदा होत नाही उलट नुकसान होण्याचे चिन्ह जास्त.

नोट — द्विस्वभाव लग्नात हा योग होत नाही — मिथुन कन्या धनु आणि मीन लग्न हे द्विस्वभाव लग्ने आहेत.(३/६/९/१२)

स्थानगत फळे रुचक योगाची

 • मेष लग्न — मेष लग्न १ नंबर चे असेल आणि तिथेच प्रथम स्थानी हा मंगळ लिहिला असेल तर प्रथम स्थान हे आपल्या व्यक्तिमत्वाचे असते आणि त्यामुळे अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व फार खुलून दिसते. आयुष्यात त्याने स्वतःला चांगले प्रेसेंट केलेले दिसते. त्याच्या जवळ ऊर्जा फार असते तो निडर असतो कोणत्याही कामात तो प्राविण्य मिळवतो. एकदम पॉसिटीव्ह असतात अशा व्यक्ती. ह्यांना पाहून समोरचा व्यक्ती स्वतः दाबतो किंवा ह्याच्या व्यक्तिमत्वासमोर त्याचे काही चालत नाही. मंगळ हा अग्नितत्वाच्या मेष राशीत इथे येतो त्यामुळे व्यक्ती रागीट असू शकतील त्याने कोणतेही काम करताना घाई करणाऱ्या व्यक्ती सुद्धा पाहण्यात आल्या ज्याने त्यांचे काही नुकसान सुद्धा झाले.—- कुंडली क्रमांक १.
 • मेष लग्न — ह्याच मेष लग्नात जर १० नंबर कर्म स्थानात मकर राशीत जर मंगळ लिहिला असेल तर असा मंगळ पत्रिकेत उच्च राशीत असल्यामुळे इथे रुचक योग निर्माण करतो. अशा व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्री नावाजलेल्या असतात. लोकांसमोर त्याची ओळख जी असेल ती त्यांच्या कर्तृत्वाने असेल. पण पर्सनल लाईफ वैवाहिक जीवनात ह्या व्यक्ती जास्त खुश नसतात. पण पैसे करिअर आणि आरोग्य ह्यात ह्या व्यक्ती लकी असतात. — कुंडली क्रमांक १.
 • वृषभ लग्न — २ नंबर च्या वृषभ लग्नात जर मंगळ वैवाहिक सुखात जिथे ८ नंबर वृश्चिक राशी आहे तिथे लिहिला असेल तर रुचक योग होतो. हा मंगळ मारकेश असेल मारक स्थानात बसल्यामुळे. त्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात फार उलथापालथ होण्याची शक्यता असते जेव्हा गुरु ची स्थिती उत्तम नसेल तर. इथे मांगलिक दोष सुद्धा होतो पण तो स्वराशीचा असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पत्नी किंवा पती अशा व्यक्तींना ऑर्डरफुल मिळते. निर्णय नेहमी पार्टनर घेतो.– कुंडली क्रमांक २.
 • कर्क लग्न — ४ नंबर च्या कर्क लग्नात १ नंबर हि मेष राशी कर्म स्थानात येते. इथे जर मंगळ असेल तर रुचक योग होतो. नियमाप्रमाणे कर्क लग्नाला मंगळ राजयोग कारक ग्रह असतो. त्यामुळे हा रुचक योग करिअर मध्ये व्यक्तीला उत्तम फळे देतो. आपल्या कर्तबगारीवर व्यक्ती प्रगती करतो. वयाच्या २३ पासूनच त्याची हि प्रगती सुरु होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत राहू चा प्रभाव ह्या मंगळावर नसावा किंवा मंगळ राहूच्या नक्षत्री नसावा. — कुंडली क्रमांक ३
 • कर्क लग्न — ह्याच ४ नंबर च्या कर्क लग्नात १० नंबर मकर राशीत मंगळ असेल तर हा रुचक योग होतो. हे एक वैवाहिक सुखाचे स्थान आहे. पैसा करिअर व्यक्तीला उत्तम असेल पण वैवाहिक सुखाच्या बाबतीत थोडे इशू इथे पाहण्यात आले. कुंडली क्रमांक ३.
 • सिंह लग्न — ५ नंबर च्या सिंह लग्नात ८ नंबर वृश्चिक राशीत जर मंगळ असेल तर रुचक योग होतो. हे पत्रिकेचे मातृ स्थान ,प्रोपेटी चे स्थान आहे. मंगळ इथे अग्नीतत्व राशीचा ग्रह जर जल राशीत येत असेल तर व्यक्तिगत जीवनात थोडा त्रास पाहण्यात येतो. प्रॉपर्टी चे सुख मिळाले तरी घरातील वातावरण उत्तम नसते. काही वेळा रिअल इस्टेट मध्ये ह्या व्यक्ती प्रगती करताना दिसतात. –कुंडली क्रमांक ४.
 • तुला लग्न — ७ नंबरच्या तुला लग्नात १ नंबर मेष राशीत जर मंगळ असेल तर रुचक योग होतो. हे पत्रिकेचे वैवाहिक स्थान असते. इथे स्वराशीचा मंगळ आपल्या ८ व्या दृष्टीने धन स्थानी ८ नंबर च्या वृश्चिक राशी वर पाहतो आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात पैसा उत्तम उभा करता येतो. — कुंडली क्रमांक ५.
 • तुला लग्न — ७ नंबरच्या तुला लग्नात १० नंबर मकर राशीत जर मंगळ लिहिला असेल तर रुचक योग होतो. इथे मंगळ उच्च राशीत असल्यामुळे आणि ७ व्या स्थानाचा आणि कुटुंब स्थानाचा १ आणि ८ चा मालक सुख स्थानात आहे आणि तो उच्च राशीत प्रोपेटीज चे सुख उत्तम असते पैसा मिळतो. मात्र जोडीदाराचा रुबाब जास्त असेल तर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. — कुंडली क्रमांक ५.
 • वृश्चिक लग्न — ८ नंबर च्या वृश्चिक लग्नात जर मंगळ लिहिला असेल तर रुचक योग होतो. इथे हा मंगळ सहाव्या स्थानाचा १ नंबर चा मालक होऊन पहिल्या स्थानात बसतो. म्हणून अशा व्यक्तीला जीवनात सतत स्पर्धा असतात. प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन करावे लागतेच. एका वेळेत लगेच सक्सेस मिळत नाही. — कुंडली क्रमांक ६.
 • मकर लग्न — १० नंबर च्या मकर लग्नात मकर राशीत १० नंबर मध्ये मंगळ असेल तर रुचक योग होतो. लग्न स्थानातील हा मंगळ भूमी चे सुख, करिअर पैसा मिळतो फक्त आरोग्य सांभाळावे लागते. आरोग्यह्यासाठी धावपळ होण्याचे योग येतात. कुंडली क्रमांक ७.
 • मकर लग्न — १० नंबरच्या मकर लग्नात १ नंबर मध्ये मंगळ असेल तर रुचक योग होतो. इथून मंगळ आपल्याच वृश्चिक ८ नंबर च्या राशीवर ८ व्या दृष्टीने पाहतो म्हणून प्रोपेटी चे चांगले योग असतात. पैसा मिळतो. फक्त हा मंगळ शनीच्या युतीत दृष्टीत नसावा. — कुंडली क्रमांक ७.
 • कुंभ लग्न — ११ नंबर च्या कुंभ लग्नात ८ नंबरच्या वृश्चिक राशीत जर मंगळ असेल तर रुचक योग होतो. इथे मंगळ दिगबली होतो. व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने प्रगती पथावर असतो. ह्या मंगळाची एक राशी जी मेष आहे ती तिसऱ्या स्थानात बसल्यामुळे असा व्यक्ती बऱ्याच जणांच्या संपर्कात राहून आपले करिअर करू शकतो असा सल्ला देण्यात येतो. जर त्याने एखाद्या ठिकाणी बरीच वर्षे एकाच जॉब केला तर त्याची प्रगती होताना दिसणार नाही. — कुंडली क्रमांक ८.

नोट — वरील स्थिती ची सर्व फळे मंगळ च्या महादशा आणि अंतर्दशेत जास्त मिळतात. जर मंगळ पत्रिकेत सूर्य किंवा चंद्र शी युती होत असेल तर व्यक्तीला त्याची फळे कमी मिळतात.
हा योग पाहण्यासाठी लग्न च्या स्वामी ची ताकद सुद्धा किती आहे हे पाहावे लागते.

तर असा रुचक योग आपल्या पत्रिकेत असेल तर जरूर एखाद्या निष्णात ज्योतिषांकडून त्याचे फळ जाणून घ्या. खास करून मंगळ ची महादशा अंतर्दशा सुरु असेल तर.

धन्यवाद…..!

Leave a Reply