You are currently viewing श्री दत्तगुरु आणि गुरु चरित्र पाठ

माझ्या मते श्री दत्त महाराजांना पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने जीवनात एकदा श्री गुरु चरित्राचा पाठ करावाच.

काय आहे गुरु चरित्र

ह्यात 52 अध्याय आहेत. श्री दत्त महाराजांचे महत्व आणि व्यक्तीने जीवन जगताना कोणते नियम पाळावेत काय करावे काय करू नये ह्याचा सार देण्यात आला आहे.

कसे वाचावे गुरु चरित्र

गुरु चरित्र पुस्तकात वाचण्याचे नियम दिलेले असतात. ह्यावर माझे मत मांडतो.

गुरु चरित्र वाचताना शास्त्रोक्त नियम जे दिलेले आहेत जर त्याचे पूर्ण पालन केले तर एक सामान्य व्यक्ती जो संसार सांभाळणारा, आपला जॉब कामधंदा पाहणारा ह्या नियमांच्या बाहेर फेकला जाऊ शकतो.

माझ्या मते कोणतीही भीती न बाळगता जेव्हढे नियम पाळता येतील तेव्हढे पाळावे. बाकीचे सोडून द्यावे. कारण इथे गुरु ला समजण्यासाठी आपण त्याचे चरित्र वाचून काढत आहोत ह्याचा संकल्प घ्यावा बस.

दुसरे असे की काही जणांना संस्कृत भाषेत वाचण्यास अडचणी येतात. तर ह्यावर मी म्हणेन की ज्याला ज्या भाषेत कळेल त्याने ते एकदा वाचून घ्यावे. आणि कित्येक वेळा वाचत रहावे जोपर्यंत ते समजत नाही.

वाचताना चे सामान्य नियम आणि लाभ

कोणतेही थोर महापुषांचे चरित्र वाचताना चित्त एकाग्र होण्यासाठी वातावरण शांतता लागते. त्याची तयारी करूनच बसावे.

 • वैज्ञानिक दृष्ट्या आणि शास्त्रोक्त दृष्टीने सुद्धा वाचताना पूर्व किंवा पूर्वउत्तर बसून वाचणे उत्तम.
 • गुरु चे वाचन करत आहोत म्हणून सात्विक हा विषय महत्वाचा ह्यासाठी वाचताना ह्याचे भान ठेवणे महत्वाचे. ह्यात शरीर स्वच्छ करून बसावे . सप्ताह म्हणजे 7 दिवसात वाचून काढणे किंवा पारायण म्हणजे रोज एक अध्याय वाचणे ह्यात 52 दिवस लागतात ह्या कालावधीत भोजन सात्विक असावे त्यात मादक पदार्थ सेवन करू नयेत. कांदा लसूण वर्ज्य करावेत. शारीरिक संबंध करू नयेत. असे केल्याने गुरु चे वाचन करताना त्रास होतो.
 • सप्ताह किंवा पारायण एक विशिष्ट कार्यसिद्धी होण्यासाठी संकल्प घेऊन केला असेल तर ते झाल्यावर ब्राह्मण किंवा गरिबाला दान करून घ्यावे त्यात अन्न दान वस्त्र दान उत्तम.
 • जर ब्राह्मण वंशात आपण असाल तर पूर्ण नियमांचे पालन करावे. त्याला काही पर्याय नाही.
 • महिलांना हे वाचन करण्यासाठी मनाई आहे असे सांगितले जाते ह्यावर माझ्या मते वाचण्यास हरकत नाही पण गरोदर पणात किंवा मासिक धर्मात वाचू नये ह्याला शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक आधार आहे. कारण तेव्हढी उर्जा सहन करण्याची ताकद ह्या दिवसात नसते कारण एक वेगळी शक्ती किंवा उर्जा निर्माण होत असते हे वाचताना.
 • सप्ताह करताना कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी सुरु करून 7 दिवसात वाचून घ्यावे. पारायण करताना शुक्ल पक्षात सुरु करावे.

अनुभव येण्यासाठी श्रींचे दर्शन होण्यासाठी श्रद्धा आणि काही नियमानुसार जर वाचन केले तर गुरूंचे साक्षात दर्शन झाल्याशिवाय राहत नाही त्यासाठी जमिनीवर घोंगडी किंवा शक्य असेल तर केळी च्या पानांवर झोपून उजवा कान वर असावा (उघडा असावा) असे झोपावे वाचन संपे पर्यंत अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मी घेतला आहे दर्शन होतेच. मात्र काही जणांना ह्याची घाबरून झोपेत उठून उभे राहण्याची सुद्धा प्रचिती येईल हा प्रयोग करताना.

 • बाहेरील बाधा करणी किंवा घरातील एखादा वास्तू दोष जाणवत असेल तर त्या घरात नक्की श्री गुरु चरित्राचे पारायण करावे. लाभ आपल्या समोर असतील.
 • ज्यांना संतती विषय सतावत असेल त्यांनी जरूर ह्याचा पाठ करावा मेडिकल सायन्स ला हरविण्याची ताकद ह्यात नक्की आहे.
 • ज्यांच्या घराण्यात पितृदोष आहे आणि पितरांकडून आशीर्वाद किंवा त्यांना गती न मिळाल्याने मागील काही पिढ्या त्रस्त आहेत अशा सर्वांनी ह्या चरित्राचा सहारा घेऊन नक्की अनुभव घ्यावा. आपोआप मागील कित्येक पिढ्या ह्या तृप्त होण्यास मदत होते.
 • अजून कितीतरी चमत्कार अनुभव वाचून थकाल. जास्त टेंशन घेऊ नका वाचायला घ्या. 3 वर्षातून एकदा तरी हे वाचावे अगदीच जमत नसेल तर. कितीतरी किचकट ज्योतिष उपाय करण्यापासून मुक्त व्हाल.
 • महत्वाचे- काही जणांना भीती ही सुद्धा असेल हे वाचताना की आपण मागील गेलेल्या आयुष्यात एव्हढं पाप केले आहे आता कसे वाचावे. ह्याचे उत्तर हे वाचता वाचता मिळेल. आणि जे आत्ता आत्ता तरुण वयात नुकतेच त्यांनी पदार्पण केले आहे त्यांनी लगेच वाचून घ्यावे. पुढे पच्छाताप नक्कीच नसेल आयुष्य जगताना.

धन्यवाद…..!

Leave a Reply