You are currently viewing शाळीग्राम- एक साधा काळा पण चमत्कारिक दगड

शाळीग्राम

एक साधा काळा पण चमत्कारिक दगड. ह्या काळ्या सारख्या दिसणाऱ्या दगडाचे महत्व जाणून घ्या. जशी शिवाची लिंग रुपी आराधना केली जाते शिवपिंडीची तशीच विष्णू च्या प्रतिमेचे पूजन पेक्षा शाळीग्राम च्या पूजनाचे खास महत्व आहे.

ज्या घरात शाळीग्राम ची पूजा अर्चा होते त्या घरात विष्णू चा वरदहस्त असतो आणि लक्ष्मी ची कृपा सुद्धा प्राप्त असते. जन्मो जन्मी ची पापे एका शाळीग्राम च्या पूजनाने नष्ट होतात आणि जो जगाचा पालनकर्ता आहे त्याचा आशीर्वाद मिळतो आणि ह्या जन्मात तो त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो म्हणजे तो सुद्धा संसाराचा पालनकर्ता बनतो.

शाळीग्राम स्थापन आणि पूजन

दिनांक 26 नोव्हेंबर ला जी एकादशी आहे त्या दिवशी शाळीग्राम ची स्थापना देवघरात करू शकता. एका पिवळ्या छोट्या आसन वर स्थापना करा ह्या दिवशी. रोज पंचामृताने अभिषेक आणि चंदनाचा टिळा लावून एक तुळशीचे पान अर्पण करून विष्णू चे स्मरण करून पूजा अर्चा करू शकता.

जर पंचामृताने रोज स्नान घालता आले नाही तरी एकादशी ला हा विधी जरूर करावा. वर्षातून एकदा तुळशी विवाहाच्या प्रारंभापासून समाप्ती पर्यंत हे उचलून तुळशीच्या खाली ठेवणे पिवळ्या आसनावर आणि पिवळ्या वस्त्राने सुशोभित करून घेणे आणि तुळशीला सुद्धा गुलाबी वस्त्राने सुशोभित करून त्या दोन्ही वस्त्राला १ किंवा ३ गाठी लावून घेणे आणि तेथे तुपाचा दिवा लावणे म्हणजे तुळस आणि शाळीग्राम चे पूजन करून विवाह पद्धतीने त्यांना एकत्र आणणे. एक आवळा आणि ऊस सुद्धा थोडा ठेऊन प्रार्थना करणे आपल्या सुखी संसाराची प्रार्थना करणे. असे जो कोणी करेल त्याच्या संसारात वर्षभर येणाऱ्या अडी अडचणी दूर होतात आणि सर्व सुखसमाधाने तो संसार करतो.

शाळीग्राम चे प्रकार

तसे शालिग्राम चे ३३ प्रकार आकार असतात
गोल आणि लांबट आकार- गोल आकार हे भगवान विष्णू चे बाळकृष्ण अवतार मानतात. लांबट आकार हे भगवन विषाणूचे मत्स्य रुपी आकार मानतात.

आणि काही शालिग्राम वर चक्रे सुद्धा मिळतात ह्याला भगवान विष्णू चे सर्व अवतार मानून पूजन करण्याची पद्धती आहे.


शाळीग्राम हा नेपाळ च्या गंडक नदी मध्ये फक्त मिळतो असे माझ्या वाचनात आले आहे .
पण मुंबई नाशिक सारख्या बाजारात रुपये ५० ते २०० पर्यंत उपलभ आहे. तुमच्या विभागातील पूजेच्या दुकानात सुद्धा ह्याची चौकशी करू शकता.

तर तुम्ही सुद्धा लक्ष्मी प्राप्ती साठी / सुखी संसारासाठी / आणि विवाह होण्यासाठी वरील कार्यक्रम आज पासून तुलसी विवाह समाप्ती पर्यंत करू शकता. जर शाळीग्राम मिळाला नाही तर तुलसी विवाह असे पर्यंत प्रथम द्वादशी पासून तुळशीचा कार्यक्रम करून त्याला आपल्या देवघरात स्थापित करू शकता.

गुलाबी आणि पिवळे वस्त्र हे दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे ती गाठ वर्षभर सोडू नये. ह्याने पती पत्नी चे प्रेम वाढत जाईल घरात शांतता राहील. कुणाचे लग्न होत नसेल तर त्याने रोज त्या गाठीला स्पर्श करून लक्ष्मी विष्णू कडे आपल्या लग्नाची प्रार्थना करावी वर्षभरात लग्न होण्यास मदत होईल.

श्री दत्तगुरु ज्योतिष
देवेंद्र कुणकेरकर
९८२१८१७७६८

जर हि माहिती तुम्हाला माहित असेल नसेल तरी हि पोस्ट आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये जरूर पाठवा —ज्यांचे लग्न झाले नसेल आणि जे संसारात आहेत अशा सर्वाना हि पोस्ट वाचून लाभ मिळतील.

धन्यवाद……!

Leave a Reply