You are currently viewing लोशू ग्रीड मध्ये अंक आणि ग्रह

लोशू ग्रीड मध्ये अंक आणि ग्रह- खाली दाखविलेल्या लोशू ग्रीड मध्ये प्रत्येक अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतोच.(Relation Planet And Number In Loshu Grid)

Relation Planet And Number In Loshu Grid
लोशू ग्रीड मध्ये अंक आणि ग्रह

प्रथम आपल्या जन्म तारखेचे अंक ह्यात भरून घ्या मुलांक आणि भाग्यांक चे नंबर सुद्धा लिहा त्यात. नंतर जे जे नंबर आपल्या लोशू ग्रीड मध्ये नसतील त्या ग्रहांचे जे जे गुणधर्म असतील ते मिळविताना आपल्याला आपल्या जीवनात त्रास दिसेल आणि हीच कमाल असते कि लगेच आपल्याला कळते कि कोणत्या ग्रहांची आपल्याला साथ मिळणार नाही मग काही त्या अंकांचा आपल्या जीवनात उपयोग करून त्याचे फायदे आपण त्या अंकाने सुद्धा मिळवू शकतो.

उदाहरण —

जर व्यक्तीची जन्म तारीख ६-२-१९८४ असेल तर त्याचा मुलांक नंबर ६ आणि भाग्यांक ३ असेल (टोटल ३० आहे म्हणून)

आता लोशू ग्रीड मध्ये हे सर्व नंबर लिहून पाहू.

Relation Planet And Number In Loshu Grid example

इथे ६-२-१९८४ हे सर्व नंबर त्या त्या ठिकाणी लिहिले पण ६ नंबर पुन्हा लिहिला नाही जसा ३ लिहिला जन्म तारखेत नसताना कारण
नियम असा आहे कि जर मुलांक सिंगल डिजिट असेल म्हणजे १,२,३,४,५,६,७,८,९,१०,२०,३० तर लोशु ग्रीड मध्ये पुन्हा तेच नंबर घेत नाहीत.

हेही वाचा :- जाणून घ्या काय आहे लोशू ग्रीड

आपला विषय इथे असा आहे कि जर ह्या व्यक्तीच्या लोशु ग्रीड मध्ये २ ठिकाणी फुल्ल्या आहेत म्हणजे त्याच्या जन्म तारखेत ५ आणि ७ नंबर नाहीत. ह्याचा अर्थ बुध आणि केतू चे कोणतेही चांगले परिणाम मिळविताना इथे त्या व्यक्तीला त्रास होईल.

पुढील काही पोस्ट मध्ये मिसिंग नंबर मध्ये हे आपल्या लक्षात येईलच.

धन्यवाद…..!

Leave a Reply