You are currently viewing राहू मंगळ युती : एक अंगारक दोष

राहू मंगळ युती एक अंगारक दोष

वरील कुंडली इमेज मध्ये राहू मंगळ सर्व स्थानी लिहिले आहेत आपल्या पत्रिकेत कोणत्याही एका स्थानी हि युती असेल तर इथे दिलेली फळे आपल्याला मिळत असतील तर नक्की पहा.

काय होते ह्या युतीने?

राहू हा वायू तत्वाचा आहे आणि मंगळ अग्नी तत्वाचा आहे. राहू अग्नितत्वाच्या ग्रहा बरोबर आल्यास अग्नी चे तेज वाढू शकते आणि व्यक्तीत अंगारक दोषाची फळे तीव्र मिळू शकतात.

राहू आणि मंगळ ह्या दोन ग्रहांना एकमेकांचे शत्रू मानण्यात आले आहे. मंगळ हा सेनापती आहे समोरून वार करणारा हा ग्रह राहू सारख्या छुप्या वार करणाऱ्या ग्रहाचा शत्रू म्हणून ह्यांच्यात शत्रुत्व असावे असे माझे मत आहे.

पण हे दोन्ही वार करणारे आणि ज्या स्थानात असतील तेथील लढाई हे उग्र करणारे ग्रह एकाच स्थानात असतील तर ते ज्या स्थानात असतील त्या स्थानातील फळे व्यक्तीला एकतर अति उग्र होऊन घ्यावी लागतात किंवा त्या स्थानातील फळे हि व्यक्तीला मिळत नाहीत. जर मिळाली तर त्या स्थानाचे सुख त्या व्यक्तीला मिळताना सुद्धा कठीण होते.

ह्या युतीची इतर फळे

 • व्यक्तीच्या अंगी असामाजिक प्रवृत्ती वाढू शकते.
 • अति उष्णता अंगात होऊन व्यक्ती तापट होऊ शकतो. आणि भांडखोर प्रवृत्ती होऊ शकते. अशा वेळी व्यक्ती आपल्या भावनेच्या पेक्षा कृतीला जास्त प्राधान्य देतो आणि खूप नवे नवे चॅलेंज घेतो.
 • ह्या युतीमध्ये आयुष्यात एक तरी जवळचे रिलेशन तुटण्याचे पाहण्यात आले आहे.
 • ह्यात व्यक्ती निर्णय घेताना अति घाई करू शकतो.
 • ह्या युतीत साहसीपणा आहे. चांगल्यासाठी होईल कि वाईटासाठी हे त्या पत्रिकेच्या इतर ग्रहांवर अवलंबून असेल.
 • हि युती साधारण व्यक्तीला मधल्या स्थितीत ठेवत नाही एकतर एकदम खाली किंवा एकदम टॉप ला व्यक्ती असतो.
 • ह्या युतीची फळे हि अचानक समोर येतात व्यक्तीच्या चांगली किंवा वाईट दोन्ही.

प्रत्येक स्थानातील युतीची फळे

 • प्रथम स्थानी — जर हि युती इथे असेल तर आरोग्य चांगले असेल तर व्यक्ती अति साहसी असतो. तापट पणा जास्त.
 • द्वितीय स्थानी — कुटुंब स्थानातील हि युती व्यक्तीला कुटुंबा साठी जबाबदाऱ्या पडतात किंवा तो कुटुंबापासून लांब राहतो. व्यसन असू शकते.
 • तृतीय स्थानी — भावंडाना घातक किंवा स्वतः पराक्रमी, भाग्योदया साठी वेगवेगळ्या शहरांत भटकंती.मार्केटिंग मध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्ती ह्यात पाहण्यात आल्या.
 • चतुर्थ स्थानी — जन्म स्थळी , मातृ सुखात त्रास होताना पहिले गेले आहेत, घरातील वातावरण अशांत. प्रॉपर्टी साठी वाद. पर्सनल सुख कमी.
 • पंचम स्थानी — संतान सुखाची धडपड, मुलींच्या पत्रिकेत कन्सिव्ह ला त्रास, मिळविलेल्या ज्ञानासाठी भटकंती.
 • षष्ठ स्थानी — कर्ज, शत्रू , जॉब ह्यात जास्त संघर्ष किंवा आरोग्याची धावपळ, जीवन स्पर्धात्मक होते.
 • सप्तम स्थान — वैवाहिक सुखाची वेगळीच जबाबदारी किंवा अलगाव. व्यापाराना हि युती अति साहसी पणाची ठरते.
 • अष्टम स्थान — अचानक घटना घडण्याचे प्रमाण जास्त, कुटुंबातील व्यक्तीला त्रास. अपघात ऑपेरेशन.
 • नवम स्थान — भाग्योदयासाठी देश विदेश पाहण्याचे योग मात्र लक लगेच साथ देताना कठीण. परंपरा, धर्म मोडण्याचे प्रकार जास्त.
 • दशम स्थान — कर्म स्थानात हि युती व्यक्तीला खूप साहसी बनविते. सतत कर्मासाठी व्यक्ती धडपडत असतो. करिअर मध्ये उच्च स्थरावर कार्य करतो.
 • लाभ स्थान — जीवनातील ज्या ज्या इच्छा पूर्ण होतात तिथे तिथे लगेच गोधळ किंवा धावपळ होते. प्रॉफिट मध्ये चढ -उतार सतत.
 • द्वादश स्थान — विदेशात व्यक्ती उत्तम पराक्रम करतो. खूप खर्चिक पणा असतो, जमापुंजी करण्याची प्रवृत्ती होत नाही किंवा ती करता येत नाही.

नोट — वर दिलेले सर्व परिणाम हे राहू आणि मंगळ ह्या दोन्ही ग्रहांच्या डिग्री वर किंवा ते ज्या स्थानी ज्या राशीत आहेत त्या स्थानावर इतर ग्रहांचे योग किंवा दृष्टीने कमी जास्त होऊ शकतात.

 • मेष सिंह आणि धनु ह्या अग्नी तत्वाच्या राशी आहेत
 • वृषभ कन्या मकर ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत
 • मिथुन तुला कुंभ ह्या राशी वायू तत्वाच्या राशी आहेत
 • कर्क वृश्चिक मीन जल तत्वाच्या राशी आहेत

उपाय अंगारक दोषाचे

 • अग्नी तत्वाच्या राशीत हि युती असेल तर तांब्याचा कडा आणि ॐ अं अंगरकाय नमः चा जप नित्य जपणे रोज सकाळीच गूळ आणि त्यावर पाणी पिणे, सफेद रंगाचा प्रयोग जास्त करणे.
 • पृथ्वी तत्वाच्या राशीत हि युती असेल तर रोज सकाळी हनुमान चालीसा चे तीन पाठ करणे, प्रत्येक मंगळवारी गोड पदार्थाचे दान गरिबाला करत राहणे. मंगळवारी मिठाचा प्रयोग कमी करणे अथवा न खाणे, लाल रंगापासून दूर राहणे.
 • वायू तत्वाच्या राशीत रोज सकाळी पाण्यात लाल फुल किंवा कुंकू घालून सूर्याला जल अर्पित करणे, आणि तेथे उभे राहून हनुमान चालीसा चे पाठ करणे, तांब्याचा सिक्का होल वाला घेऊन त्यात लाल धागा बांधून गळ्यात घालणे, मुलतानी मातीने केस चेहरा धूत राहणे.
 • जल तत्वाच्या राशीत हि युती असेल तर मंगळवारचा उपवास करणे हनुमानजींच्या देवळात जाणे तेथे बसून पाठ करणे, तांब्याची रिंग अनामिका बोटात घालणे आणि रेशमी लाल रुमाल स्वतःजवळ ठेवणे.

राहू मंगळ युतीत सावधानी

जर व्यक्तीच्या पत्रिकेत अशी युती असेल तर त्यांना असा सल्ला देण्यात येतो कि जिथे जिथे अग्नी, स्फोटक पदार्थ, इलेक्टिक शस्त्र ह्याच्या जवळ असाल तेव्हा तेव्हा अति सावधानता बाळगावी. खास जेव्हा जेव्हा राहू महादशा मध्ये मंगळ अंतर्दशा किंवा मंगळ महादशा मध्ये राहू अंतर्दशा सुरु असताना अति सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.

घटना इथेच घडण्याचे प्रमाण जास्त असते. काही वेळा शनी महादशा राहू अंतर्दशा मंगळ विदशा किंवा मंगळ अंतर्दशा आणि राहू विदशा ह्यात सुद्धा त्रास पहिला गेला आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply