You are currently viewing चंद्र राहू युती प्रतियुती एक ग्रहण दोष

चंद्र राहू युती प्रतियुती एक ग्रहण दोष

वर दिलेल्या लग्न कुंडलीत प्रत्येक स्थानात चंद्र राहू लिहिले आहेत. आपल्या पत्रिकेत हे कोणत्याही एका स्थानात चंद्र राहू लिहिले असतील किंवा चंद्रापासून जर सातव्या स्थानात राहू लिहिला असेल तर खालील माहिती हि आपल्यासाठी असेल.

चंद्र राहू हि युती ज्या स्थानात असेल त्या स्थानातून व्यक्तीला चिंता निर्माण होईल आणि ज्या स्थानात चंद्राची कर्क राशी असेल त्या स्थानातील धावपळ व्यक्तीच्या आयुष्यात जास्त कष्टदायक असेल.

ह्यासाठी एक उदाहरण देतो समजा आपली लग्न कुंडली १० नंबर मकर लग्नाची असेल तर ७ व्या स्थानी विवाह स्थान येते ते ४ नंबर कर्क राशीचे ह्या स्थानाचा मालक चंद्र जर राहू बरोबर बसला असेल तर वैवाहिक सुखात त्रास होईल. कष्ट जास्त पडेल.

अशाच पद्धतीने प्रत्येक स्थानाचे फळ मिळते. ज्या स्थानात चंद्राची राशी असेल ४ नंबर.

 • ह्या युतीने व्यक्तीच्या जीवनात मानसिक त्रास पहिले गेले आहेत
 • ह्या युतीने व्यक्तीच्या आईच्या जीवनात देखील जास्त कष्ट दिसले आहेत जर असे नसेल तरी आरोग्याच्या तक्रारी फार दिसल्या आहेत.
 • ह्या युतीने मुलींच्या पत्रिकेत मासिक धर्माला काही इशू पहिले गेले आहेत.
 • ह्या युतीने आईबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात.
 • ह्यात जर चंद्र केंद्राचा स्वामी असेल तर माता पिता पती पत्नी ह्यातले एक सुख कमी होऊ शकते.
 • प्रथम स्थानात — अति धावपळ होते.
 • द्वितीय स्थानात — धनासंबंधित कष्ट होतात, कुटुंबात अस्थिरता
 • तृतीय स्थानात — पराक्रमात व्यत्यय
 • चतुर्थ स्थानात — प्रापर्टीज साठी आणि मातृसुख ह्यात त्रास होतो , वास्तुदोष, घरात अशांती
 • पंचम स्थान — शिक्षणासाठी , प्रेमात सफल होण्यासाठी, आणि मुलींच्या पत्रिकेत कन्सिव्ह होण्यासाठी त्रास
 • षष्ठ स्थानी — सर्विस बद्दल त्रास
 • सप्तम स्थानी – वैवाहिक त्रास
 • अष्टम स्थानी — पैसा चांगला, मात्र आईच्या जीवनातील त्रास
 • नवम स्थानी — भाग्योदय होताना कठीण
 • दशम स्थानी — करिअर ला अस्थिरता.
 • लाभ स्थनी — धनलाभ होतात, पण मेष वृश्चिक सिंह लग्नाला त्रास
 • द्वादश स्थान — मानसिक त्रास, गुंतवणुकीत त्रास, जेल यात्रा.

चंद्र आणि राहू च्या डिग्रीत ४/५ डिग्री चा फरक हि अंशात्मक युती असते. ह्यात जास्त उग्र फळे मिळतील.

चंद्राची डिग्री राहू पेक्षा जर १५ डिग्री पेक्षा जास्त असेल तर चंद्र बळ जास्त असल्याने ह्यातील फळे फार कमी असतील. पण राहू ची डिग्री चंद्रापेक्षा १५ डिग्री पेक्षा जास्त असेल इथे फार उग्र मानावे.
जेव्हा राहू ची डिग्री ५ डिग्री पेक्षा कमी किंवा 28/29 डिग्री असेल तर ह्यात जास्त परिणाम दिसत नाही.

चंद्र राहू चांगले परिणाम

ह्यात जर चंद्राची स्थिती उत्तम असेल तर मनात काहीही कुठेही धाडसी प्रवृत्ती वाढते. आणि व्यक्ती आपल्या टार्गेट वर खूप कष्ट करून पुढे जातो. समाजात ह्या व्यक्ती पुढे जाण्याच्या जिद्दी वर काम करत असतात.

उपाय

चंद्र राहू च्या डिग्री पाहून हे ठरविले जाते कि पत्रिकेला कोणत्या ग्रहाला स्ट्रॉंग करावे त्याचे वय काय आहे त्याचे वर्तमान स्थान जन्मस्थानापासून किती दूर आहे. ह्या बाबींचा विचार करून उपाय द्यावे लागतात.

उदाहरण — जर चंद्र राहू पेक्षा कमी डिग्री चा असेल आणि विध्यार्थी दशेत व्यक्ती असेल तर चंद्राला स्ट्रॉंग करण्याचे उपाय करावेत असे माझे मत आहे
जर राहू स्टँग नसेल तर करिअर मध्ये राहू चे उपाय करून बॅलन्स करावे लागते

माझे मत राहू शिवाय पत्रिकेत मजाच नसते फक्त तो इथे चंद्राबरोबर आहे म्हणून तो ज्या स्थानात असेल त्या स्थानातून व्यक्तीला दूर ठेऊन उपाय करावे लागणार नाहीत असे माझे मत आहे. त्यामुळे ह्याचे निदान एक ज्योतिषीच करू शकेल.

ह्या युतीत घाबरण्याचे कारण केव्हा बनेल जेव्हा वरील सिम्टम्स आपल्याला दिसत असतील तेव्हा नाहीतर काळजी नको.

माझ्या मते मिथुन आणि कन्या लग्नाला हि युती उत्तम सुखसुविधा देते बाकीचे काही किरकोळ त्रास असले तरी

ह्या युतीवर माझे मत जे आपल्याला पटणार नाही

ह्या युतीत त्या घराण्यात किंवा ज्याच्या पत्रिकेत हि युती आहे त्याच्या मागील जन्मी त्या व्यक्तीकडून एखाद्या स्त्रीला त्रास किंवा तिचा अपमान झालेला असतो आणि त्याचे फळ म्हणून हि युती असताना त्याचा हा जन्म होतो.

धन्यवाद…..!

This Post Has 3 Comments

 1. Akshay

  कन्या लग्न. पंचम स्थानी चंद्र (४ डिग्री) आणि राहू (१० डिग्री) युती शुभ फळ देतील की अशुभ?

 2. Bharatikiran

  Chhan ekdam patnari mahiti dili aahe sir tumhi

 3. अतुल

  यावर जे आपले मत आहे ते पटणार नाही असे आपण लीहले आहे, पण जर ते खरे असेल तर त्यावर उपाय काय?

Leave a Reply