You are currently viewing पुत्रदा एकादशी : २४ जानेवारी 2021

पुत्रदा एकादशी आणि माझे मत

नावा वरून हि एकादशी पुत्र प्राप्ती करून देणारी असली तरी आत्ताच्या बेटी बचाव युगात हे व्रत पुत्र प्राप्ती साठी अजिबात नाही हे जाणून घ्या.

बऱ्याच जणांच्या मुखातून किंवा बऱ्याच गूगल साईड वर पुत्र प्राप्ती साठी हे व्रत आहे असे दिले असले तरी श्री दत्तगुरु ज्योतिष ह्यास अजिबात मान्य करीत नाही. जो विष्णू पालन कर्ता आहे तो एका जीवाला अजिबात मारण्याची परवानगी देत नाही. (जी माणसे पुत्री आहे म्हणून ऍबॉर्शन करून घेतात) उलट पाप आहे हे. म्हणून मागेच संक्रांति चा उपाय दिला होता मी पोस्ट मध्ये.

आणि पुत्र होणार ह्यासाठी ७/८ मुलींना जन्म घालत राहावे आणि पुत्र प्रति करून घ्यावी ह्याची सुद्धा मला सामाजिक खंत आहे. माझ्या मते हे व्रत सर्वानी करावे ज्यांना संतती पासून काही कष्ट असतील संतान होत नसेल (फक्त मुलगा नव्हे) मुले तुमच्या पासून विदेशात असतील किंवा त्यांचे करिअर लांब असेल तुमच्या मुलांना मुले होत नसतील त्यांना कोणतेही कष्ट असेल अशा सर्वानी पुत्रदा एकादशी करून फळ मिळवू शकता

काय करावे पुत्रदा एकादशी ला

पुत्रदा एकादशी चे व्रत करताना घरातील कृष्णाला पंचामृताने अंघोळ घाला ते तीर्थ मुलांना पाजा.
एकादशी ला ॐ क्लीं कृष्णाय नमः चा जास्तीत जास्त जप करा. पिवळ्या वस्तु कृष्णाला अर्पण करा फुले फळे वगैरे आणि संतान प्राप्ती ची प्रार्थना करा. ज्यांना संतान होत नाही त्यांनी शक्य असल्यास दोघांनी १०८ वेळा संतान गोपाळ मंत्र म्हणा:-
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं देवकीसुत गोविन्द वासुदेव जगत्पते
देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः ।

आपल्या घरात एक कृष्णाचा असा फोटो लावा ज्यात तो रांगत येत आहे असे दिसले पाहिजे. हा फोटो जर बेडरूम तुमचा वेगळा असेल अशा पती पत्नी ने जरूर लावावा त्यात तो फोटो पूर्वेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या दिवाळावर लावा.

बाकी सर्वानी ह्या व्रतात विष्णू सहस्त्र नाम,गीतेचा ११ वा अध्याय,जरूर करावा.

ह्या दिवशी कृष्ण जप केल्याने एकादशी चे पूर्ण फळ मिळते.

एकादशी चे व्रत कसे करावे? काय करावे अथवा काय करू नये ह्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि अधिक जाणून घ्या.
https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi-16th-july-2020/

महत्व एकादशी चे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/ekadashi/

एकादशी टिप्स साठी खालील लिंक वर क्लिक करून अधिक माहिती मिळावा.
https://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-wednesday-11-november-2020/

पुत्रदा एकादशी मुहूर्त

  • एकादशी तिथी प्रारंभ : २३ जानेवारी रात्री ८:५७ पासून
  • एकादशी तिथी समाप्ती : २४ जानेवारी रात्री १०:५७
  • एकादशी पारण (उपवास सोडणे) : २५ जानेवारी सकाळी ७:१४ ते ९:२९ पर्यंत.

पुत्रदा एकादशी ची कहाणी

धार्मिक कथेनुसार भद्रावती राज्यात सुकेतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या पत्नी चे नाव शैव्या होते. ह्या पतिपत्नीकडे सर्व काही होते फक्त त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे राजा फार दुखी होता आणि त्याला मनात आत्महत्येचा विचार सुद्धा आला. पण हे पाप असल्यामुळे त्याला त्याची भीती वाटून त्याने तो विचार सोडून दिला आणि त्याने जंगलात वास्तव्यास जाण्याचा विचार केला आणि तो जंगलाच्या वाटेवर निघाला.

जंगलात गेल्यावर तिथे त्याला एका तलावाजवळ ऋषीमुनींचे आश्रम दिसते आणि तो त्या आश्रमात तिथे गेल्यावर आणि त्यांना आपली चिंता सांगितल्यावर मुनींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने ह्या व्रताचे दशमी पासून पालन केले आणि त्याचे पारण केले. ह्या एका व्रताने त्यास पुत्र रत्नाचा लाभ झाला. आणि तो आपल्या पत्नीसहित पुढे आनंदाने आयुष्य जगू लागला.

धन्यवाद…..!

Leave a Reply