श्री दत्तगुरु ज्योतिष तर्फे आजपासून एक नवीन प्रयोग करण्यात येणार आहे. ज्योतिष शास्त्रात हजारो योग आपल्या आधीच्या ऋषीमुनींनी, ज्योतिष अभ्यासकांनी वेगवेगळ्या ग्रंथातून लिहून ठेवले आहेत.
त्यातले असे योग मी कुंडली मांडून दाखवेन की आपल्याला आपली कुंडली पाहिल्या बरोबर लगेच समजून येईल की ही कुंडली ही आपल्या कुंडलीशी तंतोतंत जुळत आहे आणि ह्या घटना माझ्या बरोबर झाल्या आहेत किंवा होण्याची चिन्हे आहेत.
आपण काय कराल
आपल्याला एकच काम करायचं आहे की आपल्या जवळ असलेली पत्रिका आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायची आहे. जी मी आधी दिली आहे.
हे समजून काय होईल
मी टाकलेली कोणतीही पत्रिका जर आपल्या पत्रिकेप्रमाणे असेल तर आपल्याला पुढे काय करावे ह्याचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न असेलच. जरी ते मार्गदर्शन आपल्याला जमले नाही तरी आपण सावधान नक्की असाल त्या विषयावर.
फक्त एव्हढेच की आपण ज्योतिष पाहून चिंता करण्यापेक्षा चिंतन करा हाच एक महत्वाचा उपाय असेल त्या समस्येवर.
एक जरूर येथे नमूद करेन.
की ज्याने ज्योतिष शास्त्राचा 0 (शून्य) अभ्यास केला असेल त्याला सुद्धा नुसते पत्रिका इमेज पाहून कळेल की आपल्या पत्रकेत जीवनातल्या कोणत्या गोष्टी सहज मिळतील आणि आपला संघर्ष कुठे जास्त होईल.
तर तयार व्हा आपल्या पत्रिकेतील हजारो योग समजून घेण्यासाठी.
धन्यवाद…..!
Best information 👍 best