You are currently viewing ज्योतिष – परिचय (Introduction)

नमस्कार,

मी देवेंद्र ज. कुणकेरकर प्रथमच श्री दत्तगुरु ज्योतिष च्या माध्यमातून आपणा सर्वांना माझा परिचय करून देत आहे. गेल्या 16 वर्षात ज्योतिष शास्त्राचा दांडगा अनुभव घेत घेत इथपर्यंत येताना वेब च्या माध्यमातून नवीन पिढीला काही ज्योतिष मार्गदर्शन करण्याचा मोह मला सुद्धा रोखता आलेला नाही.

वेब वर ज्योतिष लेखात प्रत्येक वेळी काही नवीन देण्याचा प्रयत्न करताना आनंद होईल मला. आणि ते मिळविताना आपल्याला सुद्धा त्याचा खूप उपयोग होईलच ह्यात शंका नाही.

ह्याचा परिचय खालील काही प्रशांतून तुम्हाला मिळेलच जे जे मी मागे १६ वर्षात शोधण्याचा प्रयत्न केला आहे.आणि त्याची सर्व उत्तरे वेब च्या माध्यमातून मला जशी जशी सवड  मिळेल तसे क्लिअर करत जाईन. त्याचे उत्तर कदाचित आपल्याला माहीतही असेल पण नवीन उत्तर देण्याचा सतत प्रयत्न असेल माझा.

१ ) माझा पहिला प्रश्न जो मला कित्येक वर्षे आधी स्वतःला पडलेला कि हे शाश्त्र आहे तर पत्रिकेतील ग्रह व्यक्तीवर एव्हढ्या लांबून कसे परिणाम करतील. ?

२) एकाच वेळी एकाच शहरी एकाच तारखेला १००० जन्म घेणाऱ्या व्यक्तींना सारखे का अनुभव येत नाहीत पत्रिका तर सर्वांची सारखी असते ना मग ? 

३) भाग्यावर अवलंबून न राहणाऱ्या व्यक्ती , कधीच देवाला / पत्रिकेला / उपाय तोडग्याला आपल्या आयुष्यात स्थान न देणाऱ्या व्यक्ती ह्या अपवाद म्हणून जरी पाहायला मिळाल्या तरी त्या का प्रगतीपथावर आहेत स्वतःच्या प्रयत्नांनी.

४) ज्योतिष शाश्त्र फक्त हिंदू धर्माचेच आहे का ? आणि जर नसेल तर शनी ची साडेसाती हि एखाद्या वेगळ्या धर्मीय लोकांना कशी लागते ?

5) ज्योतिष शास्त्राचे उपाय हे खरोखर करावेच लागतात का कि एखाद्या व्यक्तीने त्याच्या पत्रिकेतील ग्रहांना जे जे आवडले ते ते त्याच्या आयुष्यात केलेले असेल म्हणून ती व्यक्ती आज टॉप ला आहे. खरोखर उपाय करावेत का ? आणि केव्हा ? कसे ? कोणते ?

आत्ताच्या सर्व देशातल्या मान्यवरांनी ज्योतिष उपाय करून त्यात त्या पदावर पोहचले आहेत का ?

६) आयुष्यात ज्योतिषी डॉक्टर वकील तिघेही पैसे घेणारे असतील तर आजार येण्या अगोदर डॉक्टर कडे आपण जात नाही कोर्टाची पायरी चढताना वकील हा लागतोच पण जन्मापासून पत्रिका काढून ठेऊन त्याचा का उपयोग करून घेत नाहीत. कुठेतरी हे शास्त्र कमी पडते आहे का?

७ ) पूर्वीच्या काळी राजदरबारी असणारे हे शास्त्र चालविणारे ज्योतिषी आता लोकसभेत राज्यसभेत विधानसभेत का नाहीत. ?(हा प्रश्न मूर्खपणाचा वाटला तरी ते पूर्ण होण्याचे स्वप्न प्रत्येक ज्योतिषाने पाहावे अशी इच्छा आहे ती इच्छा वेडी असली तरी चालेल मग)

आज पासून माझे सर्व ज्योतिषीय अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. ते देताना कुठेही जुन्या नियमांना बगल देण्याचा अथवा ते खोटे ठरविण्याचा अधिकार मला नाही तसे कमीत कमी होईल ह्याच मी काळजी घेईन.

मी ज्या ज्या गुरूंकडून त्यांच्या जवळ बसून शिकलो ,किंवा ज्यांचे वाचून ऐकून शिकलो त्या सर्व माझ्या गुरूंना मी वंदन करून त्यांचेच ताट मी आपल्यासमोर ठेवणार आहे माझ्या पद्धतीने सजवून त्याचा स्वीकार आपण कराल ह्यात तिळमात्र शंका नाही.

संकटकाळी प्रत्येक व्यक्ती हैराण होतोच पण अशाच व्यक्तीचा विजय होतो.

  • ज्याच्या पत्रिकेत भाग्य स्ट्रॉंग असते.
  • ज्याच्या पत्रिकेत DNA स्ट्रॉंग असतो.
  • ज्याच्या पत्रिकेत भोग संपलेले असतात त्या संकटाचे आणि नंतर तो प्रयत्न करतो आणि विजय मिळवितो. 

नाही तर मेहनत तर सर्वच करतात पंतप्रधान होण्याचे / कोणत्याही स्पर्धा परीक्षेत पहिला येण्याचे / खूप मेहनत करून बिझिनेस करण्याचे / संतती ला जन्म देण्याचे / संतती पासून सुख मिळविण्याचे / वैवाहिक सुख , कुटुंब सुख , प्रॉपर्टी सुख अणि इतर सूखे पण ज्यांना हे मिळते त्याच्या पत्रिकेत वरील मुद्दे क्लिअर असतील. असे माझे स्वतःचे मत आहे.

वरील सर्व विषय मी हळू हळू क्लिअर करणार आहेच आत्ता पुरता पुरे.

This Post Has 2 Comments

  1. Bhagesh pillai

    Devendraji is really a genuine and he has a very deep deep knowledge,I have not meet any astrologer like him before,he has cleared all my doubt’s of my life.
    What more to say just take appointment and your life will change.
    Thanks Devendraji

  2. उज्ज्वला देसाई

    देवेन्द्र गुरुजी एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन देतात,अगदी सोप्या पद्धती ने समजावून सांगतात,एकदम टू द पॉईंट की ते आपल्या ला पटतच ,धन्यवाद गुरुजी

Leave a Reply