गुरुवारच्या दिवशी गुरु ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे कोणत्याही गुरु ची उपासना पत्रिकेतील गुरु स्ट्रॉंग करण्यास मदत करतो.
आपल्या दिवसाची दिनचर्या कशी असेल? (सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत) हे एकाद्या गुरु ग्रहावरून पत्रिकेत पहिले जाते.
जर पत्रिकेत कोणत्याही मार्गे गुरु बिघडला असेल तर त्यात हि दिनचर्या धावपळीची असते. अशा वेळी जरी पत्रिका पाहिली नसेल तरी एक उपाय नेहमी करत राहावे त्या घरातील कोणत्याही व्यक्तीने.
गुरुवारी गोमूत्र आणि हळद एकत्र करावे आणि ते उंबरठ्या बाहेर दोन रेषा आडव्या ओढाव्यात. ह्याने त्या घरातील दिनचर्या सुरळीत होण्यास फार मदत होते.
ज्योतिषांकडून समजून घेण्याचा योग:-
- पत्रिकेत गुरु राहू एकत्र कोठेही आहे का ?
- गुरु वक्री आहे का ?
- गुरु ६/८/१२ मध्ये आहे का
- गुरु ची डिग्री ० ते ५ किंवा २७/२८/२९ आहे का
- गुरु राहू च्या नक्षत्री किंवा समोर आहे का?
वरील योगाचे चांगली फळे सुद्धा मिळतात पण हा विषय येथे नाही.
धन्यवाद…..!