You are currently viewing कशी ओळखावी मांगलिक पत्रिका?

कशी ओळखावी मांगलिक पत्रिका?

मांगलिक लग्न कुंडली

वरील लग्न कुंडलीत जिथे जिथे मंगळ दाखविला आहे त्या स्थानिच पत्रिकेत जर कोणत्याही एका स्थानी इथे मंगळ असेल तर आपण मांगलिक आहात.

काय लक्षणे मिळतील?

आपण जर मांगलिक असाल तर वेवेवेगळ्या स्थानातील मंगळ हा वेगवेगळे अनुभव व्यक्तीला मिळतील ते सर्व इथे न देता कॉमन फळे काय असतात ते देतो.

आपल्यात ऊर्जा फार असेल , कोणत्याही गोष्टीना लगेच ऍक्टिव्हेट करण्याची उत्सुकता फार असेल, हे जर चांगल्या निर्णयासाठी असेल तर उत्तम पण वाईट निर्णयासाठी असेल तर वाईट. पण निर्णय झटपट घ्यावेसे वाटतील हे नक्की.

बरेच मांगलिक लोक हायपर असू शकतात, रक्त हे सळसळते असते त्यांचे, त्यामुळे समोरील व्यक्तींना किती सहन करतील ह्याची शास्वती देण्यात येत नाही. म्हणून कोणतेही रिलेशन जपण्यास ह्यांना त्रास होतो. ऑर्डरफूल असल्यामुळे आपल्याला कुणाची ऑर्डर फॉलो करण्यास त्रास होऊ शकतो. ह्या मंगळाची ऊर्जा जी असते ती कुठेतरी खर्च करण्याची फार गरज असते.

मंगळ हा सेनापती आहे. मंगळ हा सोल्जर चे काम करतो म्हणून जर एखादी व्यक्ती मांगलिक असेल तर त्याने त्याची ऊर्जा हि बाहेर कुठे तरी खर्च केलीच पाहिजे असे माझे मत असते म्हणजे त्याच्या करिअर च्या वाटा ह्या फाईट करण्याच्या असतील किंवा फार मोठ्या जबाबदारीच्या असतील तर हा मंगळ आपल्यासाठी चांगल्या ऊर्जेचे तिथे काम करेल मग ती उरलेली ऊर्जा शांत होऊन आपण आपले चांगले रिलेशन जपू शकता. कारण मागील काही वर्षाच्या अभ्यासाने मला हेच दिसले आहे कि ह्यांना रिलेशन जपण्याचा खूप त्रास होतो.

हे विधान केव्हा दिसणार नाही किंवा खोटे ठरेल?

जेव्हा मंगळाबरोबर गुरु असेल किंवा मंगळापासून च्या ७ व्या स्थानी गुरु लिहिला असेल किंवा गुरु पासून मंगळ हा ५ व्या किंवा ९ व्या स्थानी असेल किंवा मंगळ ० ते ५ डिग्री किंवा २६ ते २९.५९ डिग्री तेव्हा थोडा ह्यात कमी पणा येऊ शकतो.

मांगलिक आणि विवाह विषय

जर व्यक्ती मांगलिक असेल तर माझ्या मतानुसार मांगलिक व्यक्तींना माझा नेहमी सल्ला असतो कि आपण आपला विवाह आपण ज्या समाजात राहता त्या समाजात होणारे व्यक्तींचे विवाह हे एव्हरेज ज्या वयात होतात तर त्यापेक्षा तुम्हाला निदान २/४ वर्षे नंतर आपला विवाह करायला पाहिजे.

आणि अगदीच जर तुम्हाला सामाजिक सर्कल मध्ये विवाह करावाच लागला तर करिअर झाल्याशिवाय विवाह करू नये. हा दुसरा सल्ला घ्या. (मुलगा आणि मुलगी हा नियम सर्वाना सारखा असेल)

उदाहरण: जर आपल्या समाजात सर्वांचे विवाह हे साधारण वयाच्या २८ पर्यंत होत असतील तर तुम्ही ३०/३२ पर्यंत थांबा. किंवा ते विवाह २४ पर्यंत होत असतील तर तुम्ही २८ पर्यंत थांबा. कारण अजूनही काही समाजात विवाह हे मुलींचे १८ आणि मुलांचे २२ वय झाल्याबरोबर करण्यात येतात अशा वेळी त्यांनी २/४ वर्षे थांबून विवाह करावा. आणि त्याबरोबर करिअर सुद्धा करून विवाह हा उत्तम .

हे का करावे? ह्याला काय अर्थ आहे?

माझे मत असे आहे ह्यावर जर ज्योतिष शास्त्रात मंगळ हा सोल्जर असेल तर एखादा सोल्जर त्याची लढाई हि २२ पासून सुरुवात करतो म्हणजे २२ पर्यंत आपण शिक्षण घेऊन नुकतेच मार्केट मध्ये करिअर करायला आलेलो असतो.

आणि २२ ते ३२ ह्या वयात तो मंगळ त्याला चांगले धैर्य हिम्मत देऊन पॉलिश करत असतो अशा वेळी जर तुम्ही विवाह करून बसलात तर हाच मंगळ चिडचिड करेल त्याचा ट्रॅक कुठेतरी मिस होत आहे असे वाटेल आणि तो अनमॅच्युरिटी दाखवेल कोणतेही रिलेशन तो जपण्यासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल सुखासाठी तो तुम्हाला कधीही साथ देत नाही.

अशा सर्व जोडप्याना मग पर्सनल सुखाचे त्रास होत असताना मी पाहिले आहेत निदान वयाच्या ३२ पर्यंत तरी.

हे विधान केव्हा खोटे ठरेल जेव्हा दोघांचेहि करिअर झाले असेल. हा मंगळ पर्सनल सुखासाठी कधीच चांगला नसतो वयाच्या ३२ पर्यंत तरी. म्हणजे काय तर अशा सर्व जोडप्याना आपल्या लग्नानंतरची एक तरी सुखाची व्याख्या क्लिअर करता येत नाही. त्यात शारीरिक सुख , संतान इशू , हेल्थ इशू , प्रॉपर्टीज इशू , रिलेशन इशू असे एक तरी इशू एव्हढे जबरदस्त असतात कि त्यात व्यक्ती हैराण होतो. मग वयाच्या ३८ पर्यंत हे असू शकते.

विवाह करताना मंगळ कसा चेक करावा

हा विषय जरा किचकट वाटला तर सरळ एखाद्या निष्णात ज्योतिषाकडे सल्ला घेऊ शकता आपण.

आपण मांगलिक आहात हे एकदा फिक्स झाले तर काही ज्योतिषी म्हणतील कि आपला मंगळ हा सौम्य आहे. ह्यावर माझे मत कि हि एक माचीस ची कांडी आहे त्याची मशाल होऊन कधी घात होईल हे सांगता येत नाही. म्हणून ह्या भानगडीत पडू नये कोणी कि आमचा मंगळ हा सौम्य आहे.

  • आपण मांगलिक आहात तर समोरील पार्टनर च्या पत्रिकेत जिथे जिथे मंगळ वरील पत्रिकेत दाखविला असेल तर तो सुद्दा मांगलिक असेल तर उत्तम. इतर काही मुद्दे चेक करून विवाह करू शकता.
  • आपण मांगलिक असाल आणि समोरचा व्यक्ती हा मांगलिक नाही तेव्हा आपल्या पत्रिकेत जिथे मंगळ आहे तिथे त्याच्या पत्रिकेत त्याच ठिकाणी रवी, राहू , केतू , शनी तरी असावा.
  • आपला मंगळ जिथे लिहिला आहे तिथेच जर समोरील व्यक्तीच्या पत्रिकेत त्याच ठिकाणी मंगळ लिहिला असेल तर उत्तम.
  • आपण मांगलिक असाल आणि समोरील पत्रिका मांगलिक नसेल तर ग्रह मैत्री, अष्टकूट ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून विवाह करण्यास हरकत नसते.
  • आपला मंगळ ज्या स्थानी आहे त्या स्थानाचा स्वामी जर मजबूत अवस्थेत असेल तर आपण मांगलिक होण्याचा फायदा आपल्याला जरूर मिळेल.
  • आपला मंगळ मेष वृश्चिक मकर राशीचा असेल म्हणजे १/८/१० बरोबर लिहिला असेल तरीही आपण मांगलिक असण्याचे फायदे आपल्याला जरूर मिळतील त्यात करिअर मध्ये जास्त प्रमाणात असतील.
  • सिंह लग्न आणि कर्क लग्नाला सुद्धा मांगलिक होण्याचे फायदे पाहीले गेले आहेत. कारण केंद्र आणि त्रिकोण चे स्वामी होऊन ते योगकारक होतात.
  • मुलींच्या पत्रिकेत गुरु केंद्रात असेल (पहिल्या , चौथ्या, सातव्या , दहाव्या) स्थानी असेल तर अशा मुलींना मांगलिक दोष परिहार सांगितला आहे.

बऱ्याच वेगवेगळ्या नियमांनी मंगळ पाहून विवाह करण्याची संमती योग्य ज्योतिषांकडून मिळवावी जर आपण वयाच्या ३० च्या आधी किंवा करिअर न होता विवाह करत असाल तर. कारण विवाह झाल्यावर एक दोन वर्षातच वाईट अनुभव लगेच पाहायला मिळतात.

मांगलिक असेल तर समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे विधान करणे चुकीचे आहे. ह्याला मी सहमत नाही. कारण ह्यात विधवा योग विधुर योग जबाबदार असतात. त्यात मंगळ काही करत नाही असे माझे मत आहे. दोन्ही नॉन मांगलिक पत्रिका सुद्धा विधवा विधुर होतात त्याला हे उत्तर.

मंगळ आणि मंगळाच्या विवाह स्थानावर दृष्ट्या

(मंगळ जिथे असेल तिथून तो ४थी ८वी आणि ७ वि दृष्टी टाकतो) ह्या दृष्ट्या विच्छेदात्मक असतात.

कोणत्याही स्थितीत मंगळाची दृष्टी हि विच्छेदात्मक सांगितली आहे. आणि मंगळ जिथे असेल तिथे लढाई सांगितली आहे.

  • जर आपला मंगळ पहिल्या स्थानात असेल तर त्याची ७ वि दृष्टी हि विवाह स्थानावर येते (मंगळापासून ७ मोजा) त्या सामोरील स्थान हे तुमच्या पार्टनर चे असल्याने आपल्या समोरचे स्थान हे आपल्या शत्रू चे असते म्हणून पार्टनर बरोबर वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • जर आपला मंगळ चौथ्या स्थानी असेल तर त्याची ४ थी दृष्टी हि विवाह स्थानावर येते.
  • जर आपला मंगळ १२ व्या स्थानी असेल तर त्याची ८ वि दृष्टी विवाह स्थानावर येते.
  • जर आपला मंगळ ७ व्या स्थानी असेल तर तो विवाह स्थानात असेल म्हणून जबाबदाऱ्या वाढतील.
  • जर आपला मंगळ ८ व्या स्थानात असेल तर विवाह स्थानाचे ते कुटुंब आणि धन स्थान आहे म्हणून हे २ विषय बद्दल इथे त्रास पाहण्यात आलेला आहे. (अर्थात लग्नानंतर)

मंगळ असल्याची चिंता कधीच का करू नये

समाजात जे जे डिफेन्स व्यक्ती आज काम करत आहेत उदा. पोलीस , तिन्ही सैन्यदले , कोणत्याही सिक्युरिटीज , मोठ्या मोठ्या संस्थेचे अधिकारी, सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती ह्या मंगळामुळेच निर्माण झाल्या आहेत. म्हणून आपण जर आपली ऊर्जा हि समाजासाठी कोणत्याही पद्धतीने लावली तर मंगळ आपल्याला कधीच त्रास देणार नाही.

उदाहरण — देवेंद्र कुणकेरकर — श्री दत्तगुरु ज्योतिष. मी सुद्धा मांगलिक आहे.

समाजाच्या सुखासाठी जो जो मेहनत करेल त्याचा मंगळ दिवसेंदिवस स्ट्रॉंग होईल आणि मग त्याची सर्व पर्सनल सुखे वाढत जातील असे माझे मत आहे. पर्सनल सुखाची कधीही काळजी त्याला कधीच पडणार नाही.

उपाय

आता शेवटी उपाय — जे तुम्हाला हवेच असतात.

  • तुम्ही मांगलिक आहात तर रोज हनुमान चालीसा पाठ हा सर्वात उत्तम उपाय. किंवा हे जमत नसेल तर कोठेही हनुमान स्तोत्र पाठ करा.
  • प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे दर्शन घ्या . स्त्रियांनी एक लाल फूल प्रत्येक मंगळवारी हनुमंताला चरणी वहा.
  • मंगळ यंत्र पूजा, गणेशाला दुर्वा लाल फूल वाहणे, संकष्टी व्रत करणे, सिध्दीविनायक उपासना मंगळवारी करणे, लाल वस्तूंचे दान करणे.

हे बेसिक उपाय मंगळाचे आहेत.

सल्ला

तुमच्या घरात जर मंगळाचा मुलगा मुलगी (मेष वृश्चिक राशीचा) किंवा मांगलिक मुलगा मुलगी जरी असेल आणि त्याचे वय १८ च्या खाली असेल तर मैदानी खेळ त्याला जरूर द्या त्याच्या इतर ऍक्टिव्हिटीज चा तुम्हाला त्रास होणार नाही.

अशा ५ वर्षाच्या मांगलिक आणि मंगळाच्या राशींच्या मुलांना मी लाल मातीत खेळायला न्या असा सल्ला देतो. तिथे हि मुले मंगळाची ऊर्जा खर्च करतील आणि ह्यांना ४ भिंतीत डांबून ठेवले तर नक्की ते बेड वरून काचेच्या टेबल वर घरातच उडी मारणारे दिसतील.

ती ऊर्जा त्यांना कुठेतरी खर्च करायची असतेच. आणि तो दिवस असेल मंगळवार दुपारी १२ ते ३ मधला.

धन्यवाद…..!

Leave a Reply