You are currently viewing मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

अध्यात्माचा प्रतीक ग्रह गुरु आहे. शुक्र जसा दानवांचा शिक्षक मार्गदर्शक आहे तसा गुरु देवांचा टीचर आहे. १२ पृथ्वी मिळून जेव्हढा आकार असेल तेव्हढा मोठा हा ग्रह मानला जातो.

गुरु हा एका राशीत साधारण १ वर्षे ते १३ महिने असतो आणि गुरूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला साधारण १२ वर्षे लागतात. गुरु चा पिवळ्या रंगावर प्रभाव आहे. म्हणून गुरु चे रत्न हे पिवळसर पुखराज मानतात. गुरु ग्रहाकडे अति सात्विक पणा आहे.

तुमच्या आनंदात सहभागी नसतो गुरु तुमच्या अध्यात्मासाठी मदत करतो तो. गुरु हा एक ब्राह्मण असल्याने जसा ब्राह्मण आपल्या कार्यक्रमासाठी येतो आणि त्याची दक्षिणा घेऊन जातो. मग तो आपल्या पुढील कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तेथे तुमचा गुरु नसतो त्यामुळे गुरु तुमच्या एंज्योमेन्ट चा साक्षी नाही.

गुरु हा विवाहाचा कारक आहे मात्र गुरु मुळे विवाह होत नाही तुमच्या वैवाहिक जीवनात गुरु चा रोल असतो असे माझे मत आहे पुरुषांच्या पत्रिकेत शुक्र हा विवाह करतो आणि स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळा मुळे विवाह होतो.

गुरु च्या दोन राशी एक धनु जी अग्नी तत्वाची राशी आहे आणि दुसरी मीन जी जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे ह्या दोन राशीवर गुरु चा प्रभाव असतो.

गुरु कर्क राशीत उच्चीचा असतो आणि मकर राशीत गुरु नीच असतो ( जिथे पत्रिकेत ४ नंबर बरोबर गुरु लिहिला असेल तर तुमचा गुरु हा उच्च राशीत आहे आणि तो जर १० नंबर बरोबर लिहिला असेल तर तो नीच राशीत आहे.)

गुरु आणि शाळा

जेव्हा तुम्ही ज्योतिष पाहायला जात असाल तर त्या ज्योतिषाला नक्की विचारा कि तुमचा गुरु तुमची शाळा कुठे आणि कशी करेल.

ह्याचा अर्थ जसे आपण शाळेत असतो तेथील नियम पाळतो तेथील अभ्यास करतो तेथे दिला जाणारा गृहपाठ आपण व्यवस्थित करतो आणि ह्याप्रमाणे जर आपण वागलो नाही तर आपण नापास सुद्धा होतो. तसाच गुरु तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानी असतो त्या स्थानाची तो शाळा करतो.

अजून एक अर्थ मी येथे बिनधास्त देतो कि गुरु ज्या स्थानी असेल त्या स्थानाची हानी करतो. कारण कोणतेही गुरु चे सात्विक नियम हे आपण ह्या युगात मानत नाही त्यामुळे गुरु येथे तुमची शाळा केल्याशिवाय राहत नाही.

गुरु ग्रहाच्या दृष्ट्या

गुरु पत्रिकेत जिथे असतो तेथून जर घड्याळाच्या उलट्या दिशेने मोजून तो ५ व्या ७ व्या आणि ९ व्या घरावर दृष्टी टाकतो. गुरु च्या ह्या दृष्ट्या शुभ मानल्या जातात. त्या घरापासून जर काही त्रास असतील तर तो त्यात आपले रक्षण करतो.

त्या घरात जर काही अशुभ ग्रह असतील तरी सुद्धा त्या ग्रहांपासून मिळणारे कष्ट हे अति त्रासदायक होत नाहीत पण हे पाहताना गुरु च्या डिग्री त्या ग्रहांपेक्षा जास्त असाव्यात किंवा जिथे गुरु स्वतः बसला आहे तेथे तो मजबूत अवस्थेत असावा.

गुरु आणि संतान सुख

दाम्पत्य सुखात सर्वात मोठा विषय संतान विषय असतो. त्यामुळे हा विषय गुरु कडून पहिला जातो. गुरु ग्रहावरूनच आणि पत्रिकेच्या ५ व्या स्थानाची ताकद पाहूनच तुमच्या संतान सुखाची कल्पना देता येते.

तुम्हाला संतान होईल कि नाही, केव्हा होईल, ती कशी असेल, तिचे पूर्ण सुख तुम्हाला कसे लाभेल, इथपासून ते तुम्ही असे पर्यंत आणि त्या संतान ला संतान होईपर्यंतची सर्व काही गुरु वरूनच पहिले जाते.

गुरु हा एक प्रपंच

गुरु म्हणजे एक प्रपंचच निर्माण करतो. असे ह्यासाठी असते कि जिथे गुरु पत्रिकेत असेल तेथील तो प्रपंच निर्माण करतो. तुमची तेथे शाळा केल्यानंतर तो तुम्हाला त्याचा प्रपंच करून देतो. ह्याचा अर्थ फार मोठा होतो वेगवेगळ्या स्थानात तो वेगवेगळा प्रपंच देतो.

गुरु आणि रोग

गुरु चा आकार हा सर्वात मोठा असल्यामुळे सर्वात प्रथम शरीर मोठे होण्याचा कोणताही आजार, वजन वाढण्याचा कोणताही प्रकार आणि शारीवरील कोणतीही एखादी सूज, गाठ हे गुरुवरुनच पाहतात. शरीरातील पोट आणि पाय ह्यावर सुद्धा गुरु चा प्रभाव असतो.

गुरु हा कर्क राशीत उच्चीचा होतो म्हणून जर त्याला कॅन्सर ची राशी आवडत असेल तर मानवाला होणार कर्क रोग सुद्धा गुरु वरूनच पाहतात. माझ्या मते अति शुभ गुरु सुद्धा पत्रिकेत घातक असतो. जर तो १/६/८/१२ ह्या स्थानात असेल तर.

गुरु आणि गुरु चे रत्न पुखराज

पुखराज हे गुरु चे रत्न सर्वच ज्योतिषी गुरुचे पहिले बोट तर्जनी (इंडेक्स फिंगर) मधे घालायला सांगतात. पण त्यासाठी गुरु हा पत्रिकेत चांगला असेल तरच तो पुखराज चांगले फळ देईल ते सुद्धा तो गोचरीने आणि महादशेने सुद्धा उत्तम असावा लागतो. ह्यावर अधिक प्रकाश एखादा निष्णात रत्न ज्योतिषीच टाकू शकतो.

अति महत्वाचे : बऱ्याच लोकांना पुखराज एकदा घातला कि तो सोन्यात बनविला आहे आणि तो अति किमती आहे म्हणून वर्षानुवर्षे बोटात घालून ठेवायची सवय असते पण माझ्या मते पत्रिकेत गोचरीने गुरु जर पत्रिकेत ६/८/१२ वरून जात असेल किंवा तुमची महादशा गुरु च्या विरुद्ध फळ देणारी असेल तर मात्र १२ वर्षभर घालत असलेला गुरूचा खडा हा १२ वर्षात एका वर्षासाठी जेव्हा वरील स्थानातून जात असेल तेव्हा तो चांगले फळ देणार नाही. तेव्हा ह्यापुढे कोणताही ग्रह कधी घालावा आणि कधी काढून ठेवावा ह्याचे गणित असल्याशिवाय वर्षानुवर्षे खडे वापरू नयेत.

गुरु चे लक्ष

समाजात असणारे शिक्षक, ज्योतिषी, ब्राह्मण, शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या धार्मिक संस्था, प्रवचने आणि प्रवचनकार, धार्मिक स्थळे, जिथे जिथे ज्ञानाचा प्रसार होत असतो तिथे तिथे गुरु चे लक्ष जरूर असते. त्याचा प्रभाव तेथे जास्त असल्यामुळे तेथील सर्व चुकीच्या ऍक्टिव्हिटीज पाहून गुरु हा तेथून निघून जातो.

आणि म्हणून वरील सर्व प्रकारांत गुरु नसला आणि शुक्र राहू (ग्ल्यामर आणि चीटिंग स्पर्धा ) ची ऍक्टिव्हिटी वाढली कि समाजात त्यांचे नाव खराब होतेच.

म्हणून तुम्ही मागे कोणतेही संत जर जेल मधे गेले असे पहिले असतील तर त्यास एकच कारण कि त्यांची शुक्राला (ग्ल्यामर) ला प्रोत्साहन दिले त्यांनी राहू ची (चीटिंग आणि स्पर्धा) जवळ केले. म्हणून तेथून गुरु निघून गेला.

म्हणून माझे सर्वाना एकच सांगणे असेल कि जर तुम्ही वरील क्षेत्रात असाल तर जरा सांभाळून गुरु हा ग्रह पैसा देणारा नव्हे. त्यामुळे अशा वरील इंडिकेट केलेल्या सर्व प्रकारच्या करिअर मधे तुम्ही असाल तर गुरु ची वजाबाकी होईल असे कोणतेही कृत्य करू नका.

शनी जेव्हा गुरु जवळ येईल किंवा गुरु शनी जवळ जाईल तेव्हा तेव्हा (म्हणजे गुरु शनीच्या राशीत किंवा शनी गुरूच्या राशीत येईल किंवा समोरासमोर असतील) तेव्हा तेव्हा गुरु ला त्याचे फळ मिळालेले दिसेल. बिचारा गुरु तुमच्या चुकांची सजा भोगेल मग मात्र तो तुम्हाला सोडणार नाही. ह्याचे ज्वलंत उदाहरण कोरोना महामारी.

गुरु धनु राशीत नोव्हेंबर २०१९ पासून होता तेव्हा शनी सुद्धा धनु राशीत जानेवारी २०२० पर्यंत होता. दोघे एकाच राशीत होते. आता गुरु धनु राशी सोडून २० नोव्हेंबर २०२० ला शनी च्या मकर राशीत येत आहे. म्हणजे पुन्हा दोघे एकत्रच असतील पुढे वर्षभर.

गुरु आणि पैसा

गुरु ग्रह हा पैशाचा कारक नाही. गुरु आपल्या दैनंदिन गरजेचा कारक आहे. गुरु चांगला असेल तर जेव्हढी गरज आपल्याला असेल पैशाची तेव्हढीच देईल. बरेच ज्योतिषी गुरुवरुन पैसा पाहत असतील पण गुरु हे ज्ञान आहे आणि ज्या व्यक्तीचा गुरु चांगला त्याचे ज्ञान उत्तम. म्हणून व्यक्ती पैशाचा उपभोग कसा करेल, किंवा पैसा कमविण्यासाठी त्याचे ज्ञान कसे असेल इथपर्यंतच कळू शकेल. त्याशिवाय गुरु जास्त ह्यात फळे देणार नाही असे माझे मत आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply