महाशिवरात्री : गुरुवार, दिनांक ११ मार्च २०२१

महत्व महाशिवरात्रीचे

प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यात जी शिवरात्रि येते तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते.
उत्तर प्रांतात हि फाल्गुन महिन्यात गणली जाते.

महाशिवरात्री (MAHASHIVRATRI) ह्याचा अर्थ मोठी शिवाची रात्र, शिवाची ध्यान मन लावून शिवाच्या सान्निध्यात लिन होण्याची रात्र असा मला समजलेला अर्थ लावण्यात काही हरकत नाही.

 • श्रुष्टि च्या प्रारंभी ह्याच रात्री महादेव शिव ब्रह्मा पासून रुद्र च्या रूपात अवतरित झाले होते.
 • सांसारिक माणसे ह्या शिवरात्रीला शिव आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याने जोडतात.
 • योगी माणसे ह्या शिवरात्रीला शिवाने बरीच वर्षे तपस्या केल्यानंतर ते कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस मानून ह्या दिवशी विशेष साधना प्रयोग करतात.
 • एका मान्यतेनुसार ह्याच दिवशी भोलेनाथ शिव आपल्या ६४ शिवलिंगी रूपात प्रकट झाले त्यातले फक्त आपण १२ शिवलिंगाचे दर्शन करू शकतो. बाकी अजून त्याचा शोध लागलेला नाही.

वरील सर्व मान्यतेनुसार वेगवेगळ्या प्रांतात त्या त्या मान्यतेनुसार शिवाची उपासना महाशिवरात्रीला करण्याची पद्धती आहे.

शिव :- मला समजलेला आणि मनातील शिव

मुहूर्त शिवरात्रीचा २०२१ (SHIVRATRI MUHURT 11 MARCH 2021)

शिवरात्री हि चतुर्दशी तिथीला मानणायची परंपरा आहे.

दिनांक ११ मार्च २०२१ ला दुपारी २:४१ पासून चतुर्दशी तिथीची सुरुवात होते. १२ मार्च पर्यंत दुपारी ३:०४ पर्यंत असेल.

हिंदू कॅलेंडर प्रमाणे सूर्योदयापासून दिवस आणि वार सुरु होते आणि दुसऱ्या सूर्योदयापर्यंत तो एक पूर्ण दिवस मानला जातो.

दिनांक ११ मार्च ला जरी शिवरात्री असली तरी दुपार नंतर मुहूर्त येत आहेत. त्यात रात्रीचे मुहूर्त हे दिनांक १२ मार्च ०० पासून असतील पण ती तारीख हिंदू पंचांगाप्रमाणे ११ च असेल. ( ११ तारखेच्या मध्यरात्रीपासून ०० जेव्हा येते तेव्हा इंग्रजी तारखेत १२ मार्च असेल)

सर्वात शुभ मुहूर्त हा शिवरात्रीचा निशिता काल मानतात तो ११ च्या मध्यरात्री १२:२४ पासून ते १:१२ पर्यंतचा असेल. हा ४८ मिनिटाचा अवधी शिव पूजन आणि साधने साठी उत्तम मानला गेला आहे. जरी हे शक्य नसेल तरी ह्या वेळी शिव आराधनेत लीन होऊन त्याचे मंत्र जाप करण्याचा सल्ला दिला जातो. ह्यावेळी शिवाच्या सर्वात जवळ जाण्याची संधी प्राप्त असते.

 • रात्री प्रथम प्रहर पूजा – संध्याकाळी ०६:४७ ते रात्री ९:४८
 • रात्री द्वितीय प्रहर पूजा – रात्री ०९:४८ ते मध्यरात्री १२:४८ (दिनांक १२ सुरु झाली असेल)
 • रात्री तृतीय प्रहर पूजा – रात्री १२:४८ ते ३:४९ पहाटेपर्यंत (दिनांक १२ सुरु असेल)
 • रात्री चतुर्थ प्रहर पूजा – पहाटे ३:४९ पासून ६:४९ पर्यंत (दिनांक १२ सुरु असेल)

उपवास सोडणे — १२ मार्च सकाळी ६:४९ पासून ३:०२ पर्यंत.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

 1. Jayashree Nalawade chiplun

  Very good information 👍☺️

Leave a Reply