कोणतेही महालक्ष्मी पूजन हे स्थिर लग्न निशित काळ प्रदोष काळ सुरु असताना केले तर त्याचे जास्त चांगले फळ मिळते.
दिवाळीचे महालक्ष्मी पूजन हे खास ज्या दिवशी स्वाती नक्षत्र असेल त्यात वृषभ लग्न मुहूर्त घेतात.
लग्न ह्याचा अर्थ सूर्य लगत ची राशी पूर्व दिशेला उदित होणारी राशी. १२ राशींपैकी ४ राशी ह्या चर असतात, ४ द्विस्वभाव आणि ४ स्थिर राशी असतात.
स्थिर राशी — ऋषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ.
दिनांक १४ नोव्हेंबर ला वृषभ लग्न हे सायंकाळी ५:५८ ते ७:५८ पर्यंत आहे त्यामुळे हा सायंकाळचा लक्ष्मी पूजन मुहूर्त मानावा. तसा सामान्यतः ५:५८ ते ८:३० पर्यंत हा मुहूर्त आहे.
ज्यांना मंत्र सिद्ध करायचा असेल किंवा ज्या व्यापाऱ्यांना घरी येऊन जर घरातील लक्ष्मी पूजन करायचे असेल तर पुन्हा एक मुहूर्त खूप उत्तम असेल तो रात्री ११:५८ ते १२:४९ पर्यंत हा निशिथ काल सुद्धा आहे.
सिंह लग्न रात्री १२:२४ ते २:३० पर्यंत ह्यात सुद्धा महालक्ष्मी चे पूजन मंत्र स्तोत्र साधना करू शकता.
अमावस्या तिथि प्रारम्भ : नोव्हेंबर १४ २०२० २:१८ ते १५ नोव्हेंबर सकाळी १०:३७ पर्यंत असेल.
धन्यवाद…..!