Table of Contents
ज्योतिष उपाय करावेत का?
पत्रिका एक तास समजून सांगितल्यानंतर समोरील व्यक्ती एक नक्की विचारतो किंवा मध्ये मध्ये तो बोलत असतो ” ह्याला उपाय ”? ह्यावर माझे मत असे असते कि एखाद्याला उपायच करावे लागणार नाहीत जर त्याच्या पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे तो वागत असेल आपल्या ऍक्टिव्हिटी करत असेल.
त्यात त्या त्या वेळेला तुम्ही केलेले कर्म हे तुमच्या ग्रहांना सूट झाले तर तुम्ही कोणतेही उपाय करण्याची गरज नसते. मात्र ह्यासाठी आपल्याला समस्या येण्याच्या अगोदर त्या ग्रहांना समजून घेणे आवश्यक असते. कि कोणत्या समस्यांना आपण तोंड देणार आहोत आपल्या आयुष्यात.
आणि एखाद्याला ज्योतिषाकडे न जाऊन सुद्धा जेव्हा स्मूथ जीवन जगता येते ह्याचा अर्थ असा लावावा कि एकतर त्याच्या मागील पुण्याई काम करत आहेत किंवा त्याला पूर्वजांचा आशीर्वाद आहे किंवा तो त्याच्या पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे आपली ऍक्टिव्हिटी करत आहे जी त्याच्या ग्रहांना सध्या आवडीची आहे.
वरील विवेचनातून एक लक्षात येते कि ज्योतिष उपाय करावे लागत नाहीत पण जर आपल्या पत्रिकेच्या उलट आपण काही तरी करत असू किंवा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद नसतील म्हणून (पितृदोष वगैरे) किंवा आपल्या स्वतःच्या मागील जन्मी राहिलेले भोग किंवा चुका सुधारण्यासाठी उपाय करावेत म्हणजे झालेल्या त्रासाला कमी करता येते.
उपाय काय काम करतात?
ज्योतिष शास्त्रात असा कोणताही उपाय नाही जो तुम्हाला ग्यारंटी देऊ शकेल कि त्याने तुमची समस्या चुटकीसरशी दूर होईल. उपाय करावेत कारण सध्या जे तुमच्याकडे प्रश्न आहेत त्यात तुम्ही सरळ उभे राहू शकाल त्या गोष्टींचा सामना करू शकाल एव्ह्ड्यासाठीच त्याचा उपयोग होतो बाकी काही नाही.
ज्योतिष शास्त्रात पत्रिका पाहून कोणते उपाय दिले जातात?
- स्तोत्र वाचणे उपाय
- विशिष्ट दानाचे उपाय
- व्रत उपवास करण्याचे उपाय
- खडे घालण्याचे उपाय
- अगदीच लाल ‘किताब उपायांमध्ये पाण्यात वाहण्याचे किंवा जमिनीत काही वस्तू बरेच दिवस दाबण्याचे सुद्धा उपाय दिले जातात.
जे जे आज आपल्या समोर समाजात मोठ्या श्रीमंत व्यक्ती किंवा सफल झालेल्या व्यक्ती असतात त्यांनी ज्योतिष शास्त्राचे उपाय करून मोठे झालेले नसतात. योगायोगाने त्यांच्या पत्रिकेत असणाऱ्या ग्रहांप्रमाणे ते ऍक्टिव्हिटी करतात आणि मोठे होतात.
आता हा योगायोग म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि मागील जन्माचे पुण्य ज्या विषयात असेल त्या विषयात आपणाला ह्या जन्मी सुख नक्की लाभते. अन ज्या विषयात हे सुख लागत नाही तेव्हा समजायचे कि हा आशीर्वाद आणि पुण्य आपल्याला मिळालेले नाही. किंवा त्यात केलेले कर्म हे आपण ह्या जन्मी भोगण्यास आलो आहोत.
ज्योतिष उपाय केव्हापासून करावेत?
माझ्या विचारांप्रमाणे हे उपाय नसून संस्कार मानायला हरकत नाही. जर एखाद्या व्यक्तींनी ज्या धर्मात जन्म घेतला असेल त्या धर्माचे पूर्ण पालन करणे म्हणजेच हा संस्कार असतो. मग असा व्यक्ती वयाच्या १२ वर्षांपासून जर हे पालन करत असेल तर त्याला कोणतेही पुढे ज्योतिष उपाय करावे लागणार नाहीत. ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वयाच्या १२ पासून काही स्तोत्रे मंत्रजाप करणे आवश्यक असते किंवा एखादी गुरुवाणी वाचणे सुद्धा उत्तम असते.
ह्यासाठी वेगवेगळ्या धर्मात त्याचे नियम दिलेले आहेत आणि हिंदू धर्म सोडून इतर धर्म त्याचे पालन ९०% करतो फक्त हे पालन आपल्या धर्मांत २०-२५% एव्हढेच दिसते बाकी हिंदू ह्या भानगडीत पडत नाहीत.
इतर धर्मामध्ये जसे त्यांच्या धर्मग्रंथांचे वाचन केले जाते तशी कोणतीही सोय आपल्या धर्मात नाही गीता पठण करण्याची.किंवा इतर स्तोत्रे वाचण्याची म्हणून आपण ज्योतिष उपायांत नंतर अडकत जातो असे माझे मत आहे.
वरील टायटलचे उत्तर असे आहे कि ज्योतिषशास्त्राचे उपाय म्हणजेच संस्कार हे वयाच्या १२ पासूनच केले पाहिजेत.
वेगवेगळ्या टार्गेट साठी ज्योतिष उपाय कोणते आणि कसे करावेत?
- कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी जर ते टार्गेट ४/५ वर्षाचे असेल तर सरळ स्तोत्रे वाचावीत. कारण असे टार्गेट पूर्ण होण्यासाठी पत्रिकेची ताकद हळू हळू वाढवावी लागते. ह्यात लग्न स्थान, पंचम स्थान, आणि भाग्यस्थानाच्या देवतांची स्तोत्रे आणि चालणारी महादशा देवतेची उपासना उत्तम फळे देतात.
- कोणतीही इच्छा जर १/२ वर्षै पूर्ण करण्यास लागत असेल तर १/५/९ स्थानांच्या देवतेची स्तोत्रे किंवा उपवास करून आणि त्याबरोबर महादशेत चालणाऱ्या अंतर्दशा स्वामींची स्तोत्रे किंवा उपासना करण्यास हरकत नसते.
- कोणतीही इच्छा जर ६ महिन्यात पूर्ण करण्यासारखी असेल तर अशा वेळी आपल्या पत्रिकेतील इच्छा स्थान जे आहे त्याची उपासना केली तर ती इच्छा पूर्ण होते.
ज्योतिष पाहून दान उपाय केव्हा करावेत?
व्यक्ती जेव्हा खूप त्रासात असतो तेव्हा त्याच्या पत्रिकेतील ३/६/८/१२ हि स्थाने जास्त ऍक्टिव्हेट असतात म्हणून अशा पीडा स्थानच्या स्वामींची दाने जरूर करावीत. किंवा जी महादशा अंतर्दशा विदशा सुरु आहे ह्यापैकी जे ६/८/१२ शी कनेक्टड आहे त्याचे दान नक्की करावे.
ज्योतिष खडे केव्हा घालावेत आणि केव्हा घालू नयेत?
बरेच ज्योतिषी त्यांच्याकडे गेल्याबरोबर लगेच पहिल्याच भेटीला आपल्याकडील खडा देताना दिसतात. केव्हा केव्हा हा उपाय सूट होऊन जातो आणि नंतर तो खडा आपल्याला लकी आहे असे समजून लोक १२/१२ वर्षे एखादा खडा घालूनच फिरत असतात. हे चुकीचेच आहे. त्यात बऱ्याच लोकांना मी गुरूचा खडा घालताना पाहिला आहे. (ह्यावर पुढे पोस्ट मध्ये अतिविस्ताराने लिहेन.)
नेहमी व्यक्तीने आपल्या पत्रिकेतील सर्वात जो चांगला ग्रह आहे जो चांगला परिणाम देणारा आहे त्याचे रत्न/खडे वापरावेत. नीच किंवा ३/६/८/१२ मधील ग्रहांचे रत्न वापरू नयेत. जर वापरायचे असतील तर योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.
ह्याबद्दल विशेष नोट –जर तुम्ही अगदीच अडचणीत असाल आणि त्या अडचणींना सामना करण्यासाठी जर खडे/रत्न विकत घेत असाल तर असे कधीच होणार नाही कि त्याने आपणास चांगले रिझल्ट लगेच मिळतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा खूप चांगल्या परिस्थिती मध्ये असाल अशा वेळी आपली पत्रिका जरूर दाखवून योग्य ज्योतिषांकडून रत्न सुचवून घ्यावे आणि ते कुठपर्यंत घालावे ह्याचे योग्य मार्गदर्शन सुद्धा घ्यावे.
पुढे आपल्या ह्या वेब वर सर्व ग्रहांचे उपाय मी देणार आहे ज्याने तो ग्रह आपल्या पत्रिकेत कमजोर अवस्थेत असेल तर मजबूत होण्यास मदत होईल.
कॉमन ज्योतिष आणि धार्मिक उपाय
डोळे झाकून खालील उपाय करण्यास हरकत नाही ज्यांना पत्रिका न दाखविता सुद्धा आपले कोणतेही टार्गेट पूर्ण करायचे असेल.
१) रोज किंवा रविवारी सूर्याला अर्ध्य देणे.
२) रोज किंवा सोमवारी शिव पिंडीवर जलाभिषेक करणे
३) रोज किंवा मंगळवारी गणेशाला दुर्वा वाहणे आणि गणेश मंत्र म्हणणे
४) रोज किंवा एकादशी पूर्णिमा प्रत्येक गुरुवार विष्णू सहस्त्रनाम वाचणे
५) प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी चे श्री सूक्त वाचणे
६) प्रत्येक बुधवारी गायीला हिरवा चारा किंवा मूग गूळ घालणे आणि अथर्वशीर्षाचे वाचन करणे.
७) प्रत्येक शनिवारी पिंपळाची सेवा करणे त्याला जल घालणे आणि तिथे एक दिवा लावणे.
आपल्याकडे जी जी व्रते आहेत ती सुद्धा वर्षभर असतात अशा वेळी सर्वात उत्तम एकादशी पूर्णिमा नवरात्री आणि महाशिवरात्री ची मुख्य व्रते आहेत.
दाने हि शनिवार आणि अमावस्या दिवशी राहू आणि शनी ची करत राहावीत.
रत्न घालताना आधी जास्तीत जास्त उपरत्न वापरून पहांवे नंतर जास्त खर्च करावा असे माझे मत आहे कारण उपरत्न आणि महागडी रत्ने ह्यात काहीच फरक नाही.
धन्यवाद…..!
khup chan mahiti sangitili sir
thanxs