You are currently viewing ऍबॉर्शन करणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाचा विषय: उपाय संक्रांतीचा

आपण एक स्त्री असून कधी ऍबॉर्शन केले आहे का ? किंवा परिस्थिती तशी निर्माण झाली आहे का ?
आपल्या मुलांच्या पत्रिकेत त्यामुळे तिसऱ्या स्थानी (राहू केतू मंगळ रवी शनी) ह्या पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह आले आहेत का?
तर खालील विषय आपल्या साठी आहे.

गेल्या १४ वर्षाच्या ज्योतिष सरावात जेव्हा कोणत्याही वैवाहिक सुखाबद्दल ज्या ज्या पत्रिका आल्या त्यांना हाच प्रश्न मी विचारला आणि त्यात ८०% लोकांनी त्याचे उत्तर हो दिले कि हो आमच्या आधी किंवा नंतर चे एक भावंडं ऍबॉर्ट (गर्भपात) करण्यात आले आहे.

अशा सर्व पत्रिका मला वैवाहिक सुखात ६०% च्या खाली दिसल्या. काही जणांना त्यात मुलं होताना त्रास दिसला काही जणांना आरोग्याचा त्रास दिसून वैवाहिक सुख कमी होताना दिसले. काही मुलामुलींचे लग्न होताना त्रास दिसला. वगैरे वगैरे..

ह्यासाठी सर्व महिलांनी जर ह्या आधी अशी चूक जाणून बुजून किंवा न जाणतेपणी केली असेल किंवा परीस्थीने करावे लागले असेल तर संक्रांतीचा एक उपाय आपल्याला ह्या वाईट कर्माचे वाईट फळ मिळण्यापासून दूर ठेवेल. हा उपाय ३ किंवा ५ वर्षे सतत करावा.

उपाय- भोग कमी करण्यासाठी

अशा सर्व महिलांनी संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करावे आणि सूर्य मकर राशीत जाताच ८:१५ नंतर काही न खाता पिता अर्धा किलो किंवा १ किलो ज्वारी घ्यावी आणि ती कुकर ला लावून २ शिट्या करून नरम करावी.

एका परातीत काढून थंड केल्यावर त्यावर घेतलेल्या ज्वारीच्या पाव हिस्सा काळे तीळ आणि गूळ टाकावा आणि हे घेऊन जिथे गाय उपलब्ध असेल तेथे जाऊन तिला खायला द्यावे. आणि नंतर पाणी सुद्धा पाजावे. त्यानंतर येताना गरिबांना तीळ गुळाचे वाटप करावे काही वस्त्रे सुद्धा आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावीत शक्य असल्यास.

घरी आल्यावर प्रथम आहार म्हणून काळे तीळ आणि गूळ मुखात घ्यावा. असे ३/५ वर्षे केल्याने गर्भपाताचा दोष मिटण्यास मदत होते.

धन्यवाद…..!

Leave a Reply