You are currently viewing पितृपक्ष भाग ३ – तर्पण

तर्पण

नित्य श्राद्धकर्म करताना बऱ्याच अडचणी असतात म्हणून तर्पण हे रोज पितरांना करावेच असा उल्लेख शास्त्रात आहे. पण ह्या पंधरवड्यात तर्पण हे करावेच पितरांच्या नावाने . ह्याने
पितर संतुष्ट होतात आणि त्यांना गती प्राप्त होते. हे होत असताना ते तर्पण करणाऱ्याला आशीर्वाद देतात ज्याने तर्पण करणाऱ्याच्या आयुष्यात धन , मान सन्मान , आरोग्य , यश, कीर्ती प्राप्त होते.

गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे.(पहिले बोट आणि मधले बोट आणि अंगठा दुमडून घ्यावा आणि अंजुळीने अनामिका व करंगळी ने पाणी सोडावे).

गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे. (मध्यमा, अनामिका, करंगळी दुमडून अंजुळीने तर्जनी (पहिले बोट)+ अंगठ्यावरून पाणी सोडावे).

सामुद्रिक हस्तशास्त्रात अंगठ्याजवळ पितृ देवता असतात.

देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन व पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.

पितरांना तीळ प्रिय आहेत म्हणून ह्या पितृपक्षात तर्पण करताना तिळाचा उपयोग करतात.

एक सोपा पितृपक्षात रोज करता येणारा तर्पण विधी

पूर्व मुख होऊन बसायला आसन घेऊन प्रथम गणेशाचे स्मरण करून मनोमन पितरांसाठी तर्पण करत आहोत असा संकल्प करणे. नंतर ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः असे तीन वेळा पाणी उजव्या हातावर घेऊन पिणे आणि चौथ्या वेळी ॐ गोविंदाय नमः म्हणून पाणी एका छोट्या प्लेट मधे सोडणे ह्याला आचमन शुद्धीकरण म्हणतात.
दर्भाचे पवित्री धारण करावे (हयात दर्भाची अंगठी बनवून अनामिका मधे घालावी).

आता दक्षिण मुख बसावे.
नंतर उजव्या हाती पाणी घ्यावे आणि संकल्प करावा खलील मंत्र म्हणावा.
मी (नाव घेणे) श्री गणेशाला वंदन करून ब्रह्म विष्णू महेश आणि आमची कुलदेवता (नाव घेणे) हिची आठवण करून , माझे गोत्र (नाव घेणे) इथे माझ्या पितरांच्या नावाने त्यांच्या मुक्तीसाठी तर्पण करत आहे. असे म्हणून ”भगवत प्रसेनथम पित्रेनाम तर्पणम करिष्ये” हा मंत्र म्हणून हातातील पाणी एका छोट्या प्लेट मध्ये सोडावे.

एका मोठ्या लोटीत किंवा भांड्यात पाणी घेणे त्यात गंगाजल मिसळणे, त्या भांड्यातील पाण्यात काळे तीळ जव अखंडित तांदूळ , सफ़ेद फुलांच्या पाकळ्या त्यात टाकून दर्भाच्या काडीने फिरवून एकजीव करावे.
दार्भाची (कुश) काडी तळ हाती ठेऊन ४ हि बोटे दुमडून अंगठ्यावर थोडी बाहेर पकडावी आणि तर्पणास सुरुवात करावी.
पाणी सोडण्यासाठी खाली मोठी परात किंवा एखादे मोठे ताट ठेवावे त्यावर उजव्या हातावर पाणी सोडत तीळ तर्पण करावे.
जे जे मृत पावले आहेत त्यांची नावे घेऊन वरून ३/३ वेळा पाणी सोडावे. पाणी सोडताना पुरुष पितरांचे नाव घ्यावे आणि तस्मेय स्वधा नमः म्हणावे. पाणीसोडताना स्त्री पितरांचे नाव घ्यावे आणि तस्सेय स्वधा नमः म्हणावे. शेवटी सर्व कुळातील सर्व पितरांना ३ वेळा तर्पण करावे.

उदाहरणार्थ : माझे वडील (नाव घेणे) त्यांच्या मुक्तीसाठी येथे तीळ तर्पण करत आहे असे म्हणून तस्मेय स्वधा नमः असे म्हणून ३ वेळा पाणी तळहातावरून अंगठ्या च्या दिशेने परातीत सोडावे .
ह्यात आजोबा पणजोबा आजी पणजी अजून माहित असलेल्या घराण्यातील मृत पावलेल्यात व्यक्ती, तुमच्या घरातील प्राणी सुद्धा जे आधी मृत पावले असतील ह्या सर्वांच्या नावाने तर्पण करावे.

तर्पण झाल्यावर एका वाटीत तीळ नेवैद्य म्हणून घेऊन त्यांच्या भोवती पाणी सोडावे
सर्व पितरांना नमस्कार करावा.

आता हे सर्व साहित्य पाणी दर्भ वगैरे पिंपळाच्या झाडाखाली नेऊन सोडावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply