You are currently viewing सिंह राशी / सिंह लग्न शनी चे मीन राशीतील भ्रमण | Shani Transit 2025
Shani Transit 2025 sinha rashi sinha langa

Shani Transit 2025 sinha rashi sinha langa- शनी मीन राशीत दिनांक २९/३/२०२५ पासून ते २३/२/२०२८ पर्यंत असताना सिंह राशीला शनीची अडीचकी सुरु असेल. येथे हि अडीच वर्षे कसे जातील आणि त्यात आपणास कोणत्या विषयासाठी धावपळ असेल हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • हे शनीचे भ्रमण सुरु असताना गुरु च्या अवस्था सुद्धा महत्वाच्या असतील
  • १४/५/२०२५ पर्यंत गुरु वृषभेत असेल
  • १४/५/२०२५ पासून ते २/६/२०२६ पर्यंत गुरु मिथुन राशीत असेल
  • २/६/२०२६ पासून २६/६/२०२७ पर्यंत गुरु कर्क राशीत असेल
  • २६/६/२०२७ पासून २४/४/२०२८ पर्यंत गुरु सिंह राशीत असेल

तसेच राहू १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत शनी बरोबरच असणार आहे
नंतर राहू १८/५/२०२५ पासून ५/१२/२०२६ पर्यंत कुंभ राशीत मागे जाईल
५/१२/२०२६ पासून २३/६/२०२८ पर्यंत राहू मकर राशीत असेल

आता ह्याला अनुसरून शनी चे मीन राशीतील सिंह राशीला मिळणारे विषय मांडू

शनी २९/३/२०२५ पासून आपल्या सिंह राशीला किंवा सिंह लग्नाच्या पत्रिकेत अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. हा काळ २३/२/२०२८ पर्यंत असेल. कुंडलीचे ही स्थान म्यूत्यू स्थान म्हणून ओळखले जात। ह्याच स्थानातून व्यक्तीच्या सहन न होणाऱ्या पीडा कष्ट पहिले जातात. अचानक होणाऱ्या घटना ह्याच स्थानातून चेक केल्या जातात. पत्रिकेचे गुप्त स्थान आणि इंद्रियाचे गुप्त स्थान हेच असते. म्हणून शनी इथे सिंह राशीच्या व्यक्तीसाठी वरील विषय घेऊन येणार आहे असे समजावे. त्यासाठी ह्या अडिचकीच्या काळात एकदम जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. त्याचा विरह किंवा त्या रिलेशन पासून होणारे त्रास सुद्धा होण्याचा संभव होत आहे.

ह्याच अष्टम स्थानात २९/३/२०२५ ते १८/५/२०२५ पर्यंत शनी राहू बरोबर असणार आहे वरील स्थानातील काही विषय डोकेदुखी बनत असतील तर अजिबात घाई करू नका थांबा १८/५/२०२५ पर्यंत थांबून नंतर निर्णय घ्या.

ज्योतिष नियमा प्रमाणे शनी एखाद्या स्थानातून भ्रमण करीत असताना तो आपल्या त्या स्थानापासून ३ ऱ्या स्थानावर ७ व्या स्थानावर आणि १० व्या स्थानावर दृष्टी टाकीत असतो. शनीच्या ह्याच दृष्ट्या आपणास त्रासदायक होऊ शकतील पण ते ते स्थानातील विषय जर आपण व्यवस्थित हाताळले तर २३/२/२०२८ पर्यंत त्यात आपणास शनी काहीतरी उत्तम सोलुशन देऊन जाईल हे कायम स्वरूपात असेल कारण माझ्या मते शनीच्या ज्या ज्या स्थानावर दृट्या येतात त्या स्थानातील विषयाला शनी आपणास आपल्या मागील कर्माची फळे चांगली किंवा वाईट देत असतो आणि त्याची फळे तो आपल्याला भोगवुन पुढे क्लिअर करीत असतो.

आपल्या पत्रिकेत शनी ची ३ री दृटी हि जिथे २ नंबर ची वृषभ राशी लिहिली आहे तिथे आहे. हे स्थान आपल्या प्रोफेशन चे करिअर चे आणि आपल्या स्टेटस चे आहे ह्या विषयाला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या करिअर मध्ये जास्त मेहनत करावी लागेल हे नक्की. जर कार्यरत असाल तर निर्णय सावकाश घ्या. ऑफिस मधील अधिकाऱ्यांचा काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्या.

आपल्या पत्रिकेत शनीची ७ वी दृष्टी हि कुंडलीच्या दुसऱ्या स्थानावर येत आहे जिथे ६ नंबर पहा कन्या राशी आहे. १८/५/२०२५ पर्यंत तिथे केतू असल्यामुळे त्वरित काही फळे अनुभवास येतील. हे स्थान आपल्या कुटुंबाचे आणि पैशाचे असते. आपल्या तोंडातील अवयव आणि आपल्या वाणीचे सुद्धा हे स्थान असेल. शनी सारखा ग्रह ह्या स्थानावर त्याची दृष्टी असताना कुटुंबातील प्रखर विषय आणि खास त्यातील आर्थिक विषय हे आपल्याला ऍक्टिव्हेट होऊ शकतील. त्यामुळे पैसा हा विषय असताना कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागेल त्यात वेगवेगळे चॅलेंज असतील ह्यात शंका नाही. ह्याच कालावधीत आपण आपल्या वाणी वर कंट्रोल ठेवणं अति उत्तम असेल तसेच तोंडातील अवयवांची काळजी घ्यावी लागेल. दाता संबंधित तर्क्रारी समोर येऊ शकतील.

शनी ची १० वी दृष्टी आपल्या पत्रिकेच्या पाचव्या/पंचम स्थानावर येत आहे. जिथे शनी ची धनु राशी ९ नंबर पहा. कुंडलीचे पाचवे स्थान हे रिटर्न गिफ्ट चे आहे, आपल्या संततीच्या सुखाचे आहे, प्रेमाचे आहे, तसेच ते आपल्या बौद्धिक कौशल्याचे आहे. मुलाबाळांचे विषय असतील तर त्यास व्यवस्थित हाताळण्याचा हाच कालावधी असेल. जॉब करत असाल तर जास्तीत जास्त रजेवर राहत नाहीत ना ह्यावर लक्ष द्या. बिझिनेस करत असाल तर आपल्या आयडिया ह्या व्यवस्थित लागतील ह्याकडे लक्ष द्या. आपण महिला असाल आणि जर ह्याच कालावधी संतान उत्पत्तीचा असेल तर ९ महिन्याचा प्रोसेस व्यवस्थित हाताळता येत आहे का लक्ष द्या.

आपणास आणि आपल्या परिवारास शनीच्या मीन राशीतील हि अडीचकी व्यवस्थित जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना.

शनी ची हि वरील फळे फक्त जनरल आहेत तंतोतंत समजण्यासाठी आपल्या जन्म पत्रिकेचा शनी पहावा लागतो तो जन्माचा शनी कोणत्या स्थानात आहे. आपणास महादशा कोणती आहे. अष्टक वर्गात शनी किती गुण देत आहे. ह्यावरूनच एखादा ज्योतिषी आपणास आपल्याच कुंडलीचे निदान सांगू शकेल.

आता काही उपाय देतो.

आपली राशी सिंह आहे आणि शनी ह्या राशीला ज्योतिष शास्त्राप्रमाणे शत्रू मानतो म्हणून आपण प्रत्येक रविवारी सूर्याला जल अर्पण करा. वृद्धांची सेवा करा. ह्या कालावधीत रविवारी मीठ सूर्यास्तापर्यंत खाऊ नका जेव्हा खुप पीडा असेल. काळे वस्त्र अजिबात घालू नका.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९

Leave a Reply