जाणून घ्या गया च्या श्राद्धाचे चे महत्व
बिहार च्या दक्षिणेकडील एक पर्यटन स्थळ म्हणून गया चे महत्व आहेच पण त्यापेक्षा इथे पितरांचे श्राद्ध कर्म करण्याचे स्थळ म्हणून पूर्ण जगभरात हे स्थळ प्रसिद्ध आहे. गया बिहारच्या राजधानी पटना पासून १०४ किलोमीटर दूर आहे. गया हे गया रेल्वे स्थानकापासून २ किलोमीटर वरच दूर आहे.
गया च्या ४५ जागी पिंड दान आणि ८ जागी श्राद्ध होते. फल्गु नदीच्या किनारी असलेले येथील विष्णुपद मंदिर पिंडदान साठी फार मह्त्वाचे आहे. अशी मान्यता आहे कि गया हा एक असुर होता आणि त्याच्या वधाच्या वेळी विष्णू चे इथे पद चिन्ह उमटले आहे. इंदोर च्या महाराणी अहिल्याबाई ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
पुराणानुसार इथे गयासूर नावाचा एक राक्षस होता त्याने तपस्या करून ब्रह्म देवांकडून वरदान मागून घेतले होते कि जो कोणी त्याला स्पर्श करेल किंवा त्याचे दर्शन जरी घेईल त्याला त्याच्या मृत्यू नंतर यमलोकी प्रस्थान करावे लागणार नाही मग त्याने कितीही पाप केले असले तरी तो यमलोकी न जाता थेट विष्णुलोकी प्रस्थान करेल.
तेव्हापासून सर्व जनमानस हि पापी होऊ लागली कोणतीही भीती त्यांना वाटत नव्हती किती हि पापे केली तरी ते विष्णूलोकी जाऊ शकत होते हि चिंता यमाला सतावू लागली आणि ह्या चिंतेबद्दल त्यांनी आपले विचार ब्रह्मा विष्णू महेश ह्याच्याकडे मांडले.
ह्यांनंतर ब्रह्माजी गया राक्षसाकडे जाऊन त्याला विनंती केली कि तू खूप पवित्र असल्यामुळे तुझ्या देहावर सर्व देवगण बसून एक यज्ञ करतील ते जनकल्याणार्थ असेल.
गया ने ह्या विनंतीला मान्यता दिली आणि योजनेप्रमाणे गयाच्या शरीरावर विष्णू आपली मोठी गदा घेऊन सर्व देवांना घेऊन बसले. त्याच्या शरीरावर एक मोठी शिळा सुद्धा ठेवण्यात आली ह्याला प्रेत शिळा म्हणून ओळखले जाते.
गयाच्या ह्या समर्पणाने विष्णू ने त्याला वरदान दिले कि इथली भूमी ह्यापुढे तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि इथे जो कोणी आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म करेल त्याच्या मागील ७ गोत्र १२१ पिढ्याचा उद्धार होईल.
तेव्हापासून इथे पिंड दान करण्याची रीती सुरु झाली. येथे श्राद्ध कर्म केल्याने त्या पिंडाला मुक्ती मिळते आणि श्राद्ध कर्त्याला सुद्धा त्याचे पुण्य प्राप्त होते.
तेव्हा पासून आजही जगभरातून लोक आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म येथे करून जातात. हे असे एकमेव स्थळ आहे जिथे पितरांना मुक्ती मिळते त्यांच्या नावाने पिंड दान करून.
सुखलेल्या फल्गु नदी ची कहाणी
गया च्या पूर्वेला फल्गु नदी आहे. ह्या नदीकिनारी आजही गया पिंड दान वर्षभर होत असते. खास पितृपंधरवाड्यात ह्याचे खास महत्व असते.
वाल्मिकी रामायणातील एका कथेनुसार जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता वनात होते आणि त्यांना श्री रामाचे पिता राजा दशरथ यांच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा फल्गु नदीवर श्राद्ध करण्यासाठी श्री राम लक्ष्मण आणि सीता ह्या फल्गु नदीवर आले. श्राद्ध कर्माचे साहित्य घेण्याआठी राम लक्ष्मण हे गेले असता सीता नदी किनारी उभी होती इतक्यात एक आकाशवाणी झाली कि हीच पिंड दानाची शुभ वेळ आहे तेव्हा लगेच पिंडदान करून घे. त्यामुळे सीतेला काळजी वाटू लागली कि अजून राम लक्ष्मण आले नसताना कसे करायचे एकटीने पिंड दान.
पण अपरान्ह मुहूर्त निघत चालला होता आणि त्यावेळी सीतेने पिंड दान करण्याचा निर्णय घेतला. तिने फल्गू नदी, वटवृक्ष, केतकी चे फूल आणि गायीला साक्षी मानून पिंड दान केले.
सर्व कार्य झाल्यानंतर राम आणि लक्ष्मण तेथे आले. आपल्याला उशीर झाल्यामुळे आणि मुहूर्त निघत होता त्यामुळे मी आपल्या वडिलांचे पिंड दान केले आहे असे तिने प्रभुना सांगितले. पण ह्यावर राम लक्ष्मणाचा विश्वास बसेना त्यांनी सीतेला विचारले कि तू कोणाला साक्षी ठेवून हे कर्म केलेस तेव्हा तिने फल्गु नदी, वट वृक्ष, केतकी, आणि गायीचे नाव घेतले तेव्हा वट वृक्ष सोडून तिघांनी ते मान्य केलेच नाही कि असे आमच्यासमोर घडले आहे. त्यामुळे रागात फल्गु नदीला सीतेने सुखवून टाकले आजही फल्गु नदी जमिनीखालूनच वाहते वर वर ती सुखीच दिसते
गायीला श्राप दिला कि तू नेहमी उकिरडे खाशील , केतकी च्या फुलाला देवाच्या पूजेतून काढून टाकले आणि वटवृक्षाला वरदान दिले कि तुझे अस्तित्व शेवटपर्यंत हे कायम अबाधित असेल. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतिव्रता स्त्रिया तुझी पूजा करतील.
श्री रामाने त्यानंतर आपल्या पित्याचे स्मरण केले आणि राजा दशरथ ने रामाला हे पिंडदान सीतेने केले आहे आणि मी त्याचा स्वीकार केला आहे असे सांगितले. तेव्हापासून हि फल्गु नदी वर श्राद्ध करताना तेथे खड्डा करून लोक पाणी काढतात आणि तेथे पिंड दान श्राद्ध कर्म केले जाते.
असे हे गया चे महत्व पुराण कथेतील असले तरी तेथील श्राद्ध कर्मवरील श्रद्धा अजूनही वाढतच आहे तेव्हा सर्वानी आपल्या कुटुंबासाठी एकदा गया ला जरूर भेट द्यावी असे माझे मत आहे. खास पितृपक्षात.
पण ह्या वर्षी २०२० मधे कोरोना महामारीत तेथील सरकारने श्राद्धकर्म मेळा हा बंद केला आहे ह्याची नोंद घ्यावी.
धन्यवाद….!
chan information ahe, delya badal dhanyvad👍
nice information 👍👌👌
This is very nice information 👍
खूप छान माहिती
आपण माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे. लेख वाचताना कुठेच कंटाळा आला नाही. काही वर्षापूर्वी आमच्या मजल्यावरील लहान मुलांनी दशरथाचे पिंडदान हे नाटक मजल्यावरच केले होते. माझ्या मुलाने त्यात रामाची भूमिका केली होती.
https://www.youtube.com/watch?v=pUY3-26hbBc
आपल्या लेखाने माझ्या ज्ञानात अजून भर पडली, त्यात बद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद…..