You are currently viewing पितृपक्ष विशेष भाग – १

पितृपक्ष- काय आहे श्राद्ध ?

पितृपक्ष- हिंदू धर्मातील वैदिक परंपरेनुसार अनेक रीती रिवाज , व्रत-सण आणि परंपरा आहेत. मानव जातीत गर्भधारण पासून मृत्यू नंतरहि अनेक संस्कार येथे केले जातात. अंत्येष्टी हा सर्वात शेवटचा संस्कार मानला जातो. पण अंत्येष्टी नंतर सुद्धा काही कर्मे करण्याची जबाबदारी त्या मृतक च्या संतान कडे मुलाबाळांकडे असते. त्यातलेच एक श्राद्ध कर्म. तसे तर प्रत्येक अमावस्या तिथी ला श्राद्ध कर्म केले जाऊ शकते पण भाद्रपद महिन्यात पूर्णिमा पासून अमावस्या पर्यंत पितरांसाठी जी जी कर्मे श्रद्धेने करतात त्या पर्वाला श्राद्ध म्हणतात.

थोडक्यात म्हणजे पितरांसाठी श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध

का करावे श्राद्ध ?

पौराणिक ग्रंथानुसार देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्या पूर्वजांची पूजा करावी. पितरांच्या प्रसन्नतेने देवता सुद्धा प्रसन्न होतात. हेच कारण आहे कि भारतीय संस्कृतीत जीवित असताना मोठ्यांना मान सन्मान दिला जातो आणि त्यांच्या मृत्योपरांत त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते.
ह्यात अजूनहि दुसरी मान्यता अशी कि जर विधीनुसार पितरांना वेळोवेळी तर्पण न केल्याने त्याच्या आत्म्याला शांती लाभत नाही आणि ते म्र्युत्युलोकात भटकत असतात. ज्योतिष शास्त्रात ह्या प्रकारचा पितृदोष फार मत्वाचा मानला जातो.

प्रत्येक मनुष्यावर खालील तिन्ही ऋण असतात आणि हे ऋण फेडण्यासाठी माणसाचा जन्म होत असतो असे शास्त्र पुराणांतून उल्लेख आहे.

  1. पितृ ऋण
  2. देव ऋण
  3. ऋषि ऋण
  • पितृ ऋण : संतान ला जन्म दिल्यानंतर ह्यातून मुक्ती होते कारण नंतर संतान चे कर्तव्य असते आपल्या पितरांना मुक्ती देण्याचे.
  • देव ऋण : ह्यात आपण यज्ञ, पूजा इत्यादि ने हे ऋण फेडत असतो.
  • ऋषि ऋण : ह्यात ऋषींना तर्पण केल्याने ह्यातून मुक्त होता येते.

पितृपक्षात पितरांच्या नावे श्राद्ध कर्म केल्याने पितृ ऋण उतरवता येते.

संपूर्ण विश्वातील जनमानसात सर्व जाती धर्मातील लोकांत मृत्यू पश्चात व्यक्ती देह ठेवल्यानंतर सुद्धा त्याचा आत्मा हा तसाच राहतो आणि त्याचा नाश होत नाही असेच मानले गेलेले आहे.

पितरांना सुद्धा मनुष्य प्रमाणे सुख दुःख मोह ममता भूख तहान इत्यादी अनुभव येतात. पितृ योनीतल्या पितरांसाठी श्राद्ध कर्म श्रद्धेचा भाव ठेवला नाही तर ते पितर नाराज होतात.

सामान्यतः पितरांकडे अलौकिक शक्ती असते ते आपल्या घराण्यातील व्यक्तींच्या आयुष्यातील सुख समृद्धी साठी चिंतीत असतात. आणि त्यात जर आपण धार्मिक कर्मे करत नसू तर त्यांना निर्बलता प्राप्त होते. पितृलोकातून वैकुंठ प्रवासाकडे जी गती त्यांना लागते ती पूर्ण करता येत नाही. अशात ते दुखी होतात आणि मग अशा घराण्यात दोष लागत असतात.

म्हणून आपल्या पितरांना हि गती मिळावी म्हणून प्रेत्येकाने ह्या पंधरवड्यात जे जे घराण्यातील मृत व्यक्ती असतील त्यांच्या नावे पिंडदान करावे. तर्पण करावे ह्यालाच श्राद्ध घालणे म्हणतात.

धन्यवाद…..!

Leave a Reply