You are currently viewing मुलांच्या बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष कनेक्शन

मुलांच्या बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष कनेक्शनEDUCATION PART BOARD EXAMS BY JYOTISH RULES

फेब्रुवारी, मार्च महिना आला कि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल एक विशेष काळजी वाटू लागते. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला जास्तीत जास्त % मिळावेत अशीच आशा असते. हे त्यांचे बरोबरच आहे असे मला सुद्धा वाटतेच कारण ते सध्या गरजेचे सुद्धा तेव्हढेच असते. ह्यावर प्रत्येकाचे दुमत असू शकेल आपापल्या परीने. पण सध्या जो विषय मी मांडतो आहे तो आपल्या मुलांच्या पत्रिकेतील आहे.

  • पत्रिका पाहून लगेच सांगता येते कि त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असणारा कल कसा आहे.
  • तुमचा पाल्य अभ्यास हा आवडीने करतो का ?
  • स्पर्धा परीक्षेत त्याला किती यश मिळेल ?
  • अभ्यास करताना कोणत्या कोणत्या अडचणींचा त्याला सामना करावा लागेल ? (जसे आरोग्य, घरातील परिस्थिती, त्याचे कॅरॅक्टर, आजूबाजूचे सर्कल आणि इतर समस्या)
  • शिक्षण पूर्ण होईल का?
  • शिक्षण कसे पूर्ण करता येईल?
  • शिक्षण पूर्ण करताना घरापासून लांब जावे कि जन्मस्थानी यश मिळेल?
  • शिक्षणात बरेच असे प्रश्न कुंडलीवरून पाहता येतात. आणि काही विषय पाहून त्यावर मार्गदर्शन करता येते.

हेही वाचा :- बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष उपाय

कुंडलीतले चतुर्थ स्थान — 4TH HOUSE

पत्रिकेतील ४थे स्थान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलची सर्व उत्तरे देतो.
४थ्या स्थानातील राशी
४थ्या स्थानातील ग्रह
४थ्या स्थानावरील इतर ग्रहांची दृष्टी
४थ्या स्थानातील राशीचा मालक हा कुणाबरोबर आणि कोणत्या स्थानी लिहिला आहे.
ह्या आणि इतर नियमाने त्या स्थानाची ताकद कळते. आणि विद्या घेण्याची पात्रता सुद्धा समजते.

बुध / गुरु आणि शुक्र आणि शिक्षण

वरील हे तिन्ही ग्रह सुद्धा शिक्षणाच्या विषयात अधिक पात्र ठरतात. ह्या तिन्ही ग्रहांची स्थिती पाहून विषयाबद्दल अधिक जाणता येते. हे ग्रह पत्रिकेत कसे आहेत कुठे आहेत आणि ते कोणत्या स्थितीत ह्या विषयी परिणाम देऊ शकतील ह्यावर त्या पत्रिकेचा शिक्षणाचा बेस तयार होतो.

कुंडलीचे ५ वे आणि ९ वे स्थान आणि शिक्षण

पत्रिकेचे ५ वे स्थान हे ज्ञान स्थानाचे आणि ९ वे स्थान हे भाग्य स्थानाचे असल्यामुळे ह्या स्थानाचा सुद्धा अभ्यास करणे एखाद्या ज्योतिषाला महत्वाचे असते. कारण शेवटी शिक्षणासाठी ज्ञान आणि भाग्य हे कामी येत असतेच.

कुंडलीचे पहिले स्थान आणि शिक्षण

पहिल्या स्थानावरून त्या एखाद्या विषयाबद्दल ची ऍक्शन आणि विषयाबद्दल ची आवड आणि निगेटिव्हिटी पॉसिटीव्हिटी ओळखता येते.

कुंडलीचे ६ वे स्थान आणि स्पर्था शिक्षण

ह्या स्थानावरून कॉम्पिटिशन च्या क्षेत्रात किती मजल मारता येईल हे ओळखता येते तेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा ह्याचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.

कुंडलीचे ३ रे स्थान आणि शिक्षणातील अडचणी ग्याप

ह्या स्थानावरून शिक्षणातील अडचणी आणि एखादे वर्ष फुकट जाण्याचे योग पहिले जातात. किंवा अभ्यासातील आवड सुद्धा कशी आहे हे पहिले जाते.

कुंडली सध्याची महादशा आणि शिक्षण

कुंडलीत सध्या जी महादशा सुरु आहे ती चालू शिक्षणासाठी कशी आहे हे पाहणे सुद्धा खूप महत्वाचे असते. कारण कितीही पत्रिकेत शिक्षणाचे योग असले तरी सुरु असणारी महादशा स्वामी चा सपोर्ट त्याला मिळत आहे कि नाही हे जाणून नंतरच शेवटचा परिणाम जनता येतो.

तेव्हा वरील सर्व विषयावर अधिकाधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न असेल ह्यापुढे तेव्हा आपण आपल्या पाल्याची पत्रिका दिलेल्या पोस्ट वाचून सहज जणू शकाल आणि त्यावर उपाय सुद्धा करू शकाल.

धन्यवाद…..!

Leave a Reply