You are currently viewing बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष उपाय

बोर्ड परीक्षा-शिक्षण आणि ज्योतिष उपाय – BORD EXAMS – EDUCATION & JYOTISH UPAY

खाली काही ज्योतिष शास्त्रातील उपाय देत आहे ते आपण आपल्या मुलांकडून करवून घ्यावेत. जर आपल्याला ह्यावर विश्वास असेल तरच ते करावेत ज्याने मुलांचे शिक्षण चांगले होण्यास मदत होईल. पण याचा असा अर्थ होत नाही कि ज्यांना अभ्यासात चांगले गुण मिळतात ते हा उपाय करतच असतील. पण ज्यांच्या पत्रिकेत शिक्षणाबद्दल अडचणी असतील त्यांच्या साठी हा उपाय खूप चांगला असू शकतो.

उपाय विद्यार्थ्यांसाठी

कोणत्याही विद्यार्थी दशेत मुलांना अभ्यासाची/शिक्षणाची आवड असणे हे फार महत्वाचे असते. ती निर्माण करण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे बुद्धीचा दाता श्री गणेश आणि त्याबरोबर सरस्वती उपासना. हि उपासना केल्यामुळे मुलांमध्ये विद्यार्थी दशेत फार चांगले अनुभव मिळतात त्यांच्या वागणुकीत फरक पडतो आणि विद्यार्थी दशेतील किंवा त्या वयातील पत्रिकेत इतर काही वाईट योग असतील तर ते सुद्धा निवळण्यास मदत होते.

  • श्री गणेश उपासनेत — सकाळच्या अंघोळी नंतर श्री गणेशाला दुर्वा घालून ॐ गं गणपतये नमः चा जप रोज ५ मिनिटे तरी करावा (ह्यात कोणतेही नियम नाहीत)
  • ह्यात सरस्वती वंदना किंवा एखादा सरस्वती मंत्र किंवा सरस्वती द्वादश मंत्र सकाळी किंवा सायंकाळी करावा.

वरील दोन नियम सतत मुलांकडून करून घेतल्याने त्यांच्या विद्यार्थी दशेत खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील ह्यात अजिबात शंका नाही.

हेही वाचा :- सरस्वती योग

सरस्वती वंदना

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥

सरस्वती मंत्र

ॐ ऐं ह्रीं श्रीं वाग्देव्यै सरस्वत्यै नमः ।

सरस्वती द्वादश नामावली

प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती।
तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसवाहिनी।।

पंचमं जगतीख्याता षष्ठं वागीश्वरी तथा।
कौमारी सप्तमं प्रोक्ता अष्ठमं ब्रह्मचारिणी।।

नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी।
एकादशं चंद्कांति द्वादशं भुवनेश्वरी।।

ब्राह्या: द्वादश नामानि त्रिसंध्यं य: पठेन्तर:।
जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मारूपा सरस्वती।।

जो कोणी ह्या नामावलीचे त्रिसंध्या पठण करेल त्याच्या जिव्हेवर सरस्वती चा सदा वास असेल.

मुलांकडून करून घेण्यासाठी ह्यात पालकांनी जरूर थोडी जबरजस्ती करण्यास हरकत नाही. नाही तरी इतर धर्माची मुलं आपल्या धार्मिक गोष्टी ज्या नियमाने करताना दिसतात तशी कोणतीही जबरजस्ती आपण त्यात त्यांना करायला सांगत नाही. पण मुळात हेच कदाचित त्यांना नंतर संस्कार आणि जबाबदाऱ्या समजण्यासाठी फार त्रास होताना दिसतो हे पाहण्यात आले आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply