You are currently viewing चंद्र मंगळ योग : एक लक्ष्मी योग

चंद्र मंगळ योग एक लक्ष्मी योग

चंद्र मंगळ योग- चंद्र आणि मंगळ आपल्या पत्रिकेत एकत्र लिहिले असतील तर खाली दिलेला लेख आपल्यासाठी असेल.

जर चंद्र मंगळ हे दोन्ही ग्रह सुस्थितीत असेल तर व्यक्ती समाजात रुबाबाने वागतो. त्याचा रुतबा असतो. मानसन्मान मिळतो आणि प्रसिद्ध होतो. पैसे भरपूर कामवितो आणि आपल्या बुद्धीने वाक्चातुर्याने सर्वाना मुठीत ठेवणारा असतो. परिवारात आर्थिक सुधार होतात. वाहन चालविणे, फिरणे , प्रवास करणे आवडते. वयाच्या २८ नंतर प्रगती होते. गरीब घराण्यात हि युती असेल तरी श्रीमंत योग होतो.

चंद्र बिघडला असेल तर हा योग त्रासदायक होतो स्त्री आणि दारू ने पैसे कामवितो किंवा त्याचे चरित्र हीन होते. ह्यात आईबरोबर पटत नाही किंवा आई चे स्वास्थ खराब असते. असा व्यक्ती कुणाला ऐकत नाही स्वतःच्या मर्जीने वागतो आणि फार चुका करतो. भांडणे करतो रिलेशन मध्ये जास्त जमवून घेत नाही किंवा कुणाला तरी फसवित असतो.

चंद्र मंगळ शुभ योग

 • चंद्र मंगळ द्वितीय, नवम दशम, लाभ स्थानात असेल तर हि युती उच्च कोटीची होते. ह्या स्थानात जर २/१०/११ म्हणजे ऋषभ मकर कुंभ राशी असेल तर चांगला लक्ष्मी योग होतो.
 • चंद्र मंगळ कारक होत असतील तर हि युती शुभ असेल. म्हणजे ४/५/८/९/१२ लग्न असेल तर चंद्र मंगळ युती शुभ फळे देते.
 • चंद्र मंगळाच्या डिग्री मध्ये कमीत कमी अंतर असेल उदाहरण म्हणजे चंद्र १० आणि मंगळ १५ डिग्री वर असेल तर अंतर ५ डिग्री चे असेल तर हि युती शुभ मानली गेली आहे
 • चंद्र मंगळ युती केंद्राचे मालक होऊन जर त्रिकोण स्थानी होत असेल तर अति शुभ फळे मिळतात. किंवा त्रिकोण चे मालक होऊन त्रिकोणातच युती होत असेल तर करोडपती योग होतो. हे फक्त ४ कर्क ८ वृश्चिक १२ मीन लग्नातच संभव आहे.
 • चंद्र आणि मंगळ ज्या ज्या भावाचे स्वामी असतील त्या भावाची सुद्धा चांगली फळे मिळतात.

चंद्र मंगळ अशुभ योग

 • चंद्र मंगळ जर ४ कर्क राशीत असेल तर चंद्राची डिग्री मंगळापेक्षा कमी नसावी तसे असेल तर अशुभ नाहीतर शुभ.
 • चंद्र मंगळ ८ वृश्चिक राशीत असेल तर मंगळाची डिग्री चंद्रापेक्षा कमी नसावी तसे असेल तर अशुभ नाहीतर शुभ.
 • चंद्र मंगळ मारक असतील तर हि युती अशुभ होते
 • चंद्र मंगळाच्या डिग्री मध्ये जर जास्त अंतर असेल उदाहरण म्हणजे चंद्र ५ डिग्री आणि मंगळ २८ डिग्री असेल तर हे अंतर बरेच होते ह्याने ह्या युतीची शुभ फळे कमी होतात.
 • चंद्र मंगळ युती तृतीय स्थानी षष्ठ स्थानी अष्टम आणि द्वादश स्थानी असेल तर ह्याची फळे अशुभ मिळतात.
 • २/३/१०/११ लग्न असेल चंद्र मंगळ युतीची फळे खास मिळत नाहीत.
 • चंद्र मंगळ युती ३/६/८/१२ भावात असेल आणि केंद्रात चंद्र मंगळ राशी असेल ४ किंवा १/८ तर ह्या युतीची फळे अशुभ असतील.

चंद्र मंगळ अशुभ योगाचे उपाय

मातृ सेवा आईचे ऐकणे, महालक्ष्मी अनुष्ठान जप, वैभव लक्ष्मी व्रत, महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त चे पाठ करणे उत्तम आणि लक्ष्मी रविवार सोमवार मंगळवार गौ सेवा करणे हितावह ठरेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply