You are currently viewing अधिक मास अश्विन पूर्णिमा : १ ऑक्टोबर २०२०

पूर्णिमा मुहूर्त

  • पूर्णिमा प्रारंभ : बुधवार रात्री गुरुवार १ ऑक्टोबर २०२० रात्री ००:२५ पासून
  • पूर्णिमा समाप्ती : शुक्रवार रात्री २:३४.

अश्विन पूर्णिमा महत्व

अधिक मासात येणारी हि पूर्णिमा श्री हरीला समर्पित असते. त्यात ह्या वेळी हि पूर्णिमा गुरुवारी येत असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा असल्याने हि फार शुभत्व घेऊन आलेली पूर्णिमा असेल. पुरषोत्तम मासातील हि पूर्णिमा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ह्या दिवशी काय काय करू शकता त्याचे विवेचन सादर करत आहे.

ह्या दिवशी शक्य होत असलेले खालील उपाय लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी असतील.

  • पूर्णिमेच्या रात्री एकदम पहाटे चांदण्याच्या प्रकाशात अंघोळ केल्याने जन्म जन्मांतराचे पाप नाहीसे होतात.
  • सकाळी सूर्याला जल देऊन सूर्यनारायणाचा आशीर्वाद घ्यावा घरातील पूजा अर्चा करून घ्यावी.
  • जर आपण व्रत करत असाल तर काही विशिष्ट हेतू साठी हातात जल घेऊन त्यावर तुळशीपत्र ठेवून आपले नाव, गोत्र, आईवडिलांचे नाव घेऊन नारायणाला आपला हेतू सांगून हे मी व्रत करत आहे असा संकल्प करावा. आणि पाणी सोडावे.
  • उपवास करत असलात तर एक वेळ जेवण करू शकता.
  • श्री कृष्ण चा जप मनोमन करत राहावा दिवसभर.
  • ह्यादिवशी सत्यनारायण कथा पूजन करणे शुभ असते.
  • ह्या दिवशी पिंपळाला रात्री एक तुपाचा दिवा लावल्याने महालक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो. आणि तेथे सफेद गोड वस्तू सुद्धा अर्पण करावी.
  • लक्ष्मी प्राप्ती , धनासंबंधित इच्छा पूर्ण होण्यासाठी ह्या दिवशी ११ सफेद किंवा पिवळ्या कवड्या घेऊन त्यावर केसर आणि गंगाजल मिक्स करून लेप करावा आणि एका ताटात समोर ठेऊन एक तुपाचा दिवा लावून घरातील महालक्ष्मी ला अर्पण करावे. आणि जमल्यास लक्ष्मी बीज मंत्र चा जप करावा. ।।ॐ श्रीं श्रियें नमः ।। एक माळा ५/११/२१/५१ माळा जमेल तेव्हढे करणे. मंत्र जप कमळगट्टा किंवा स्फटिक माळा ह्यावर उत्तम. दुसऱ्या दिवशी त्या कवड्या आपल्या दुकानाच्या घराच्या तिजोरीत ठेवल्याने धनासंबंधी शुभ परिणाम दिसतील.

ह्या दिवशी चंद्राचे उपाय केल्याने मानसिक शांती मिळते हे उपाय जाणून घेण्यासाठी मागील लेखाचे वाचन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अधिक जाणून घ्यावे.

पौर्णिमेचे – चंद्र स्ट्रॉंग करण्याचे उपाय

https://shreedattagurujyotish.com/pournima-remedies/

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. पांडुरंग विठ्ठल लाड

    धन्यवाद

Leave a Reply