You are currently viewing होळी उपाय भाग २ I Holi Upay

होळी च्या दिवशी करणारे इतर उपाय वेगवेगळ्या समस्येवर

  • घरातील पती पत्नी वाद विवाद असतील तर ह्या दिवशी सिंदूर च्या डब्बीत दोन गोमती चक्र ठेवा आणि तिजोरीत ठेऊन द्या कायम.
  • विवाह होण्यासाठी ह्या दिवशी सकाळी एका खाऊच्या पानावर हळदी ची गाठ + एक सुपारी शिव पिंडीवर (एकदम टॉप ला नको जरा खाली वर्तुळावर) ठेवा आणि प्रार्थना करा, ह्या वर्षी विवाह होण्याची इच्छा सांगा.
  • वर्षभर दुर्घटने पासून बचाव करण्यासाठी ५ काळी गुंजा होळी पेटताना उजव्या मुठीत घेऊन ५ परिक्रमा करा आणि होळीकडे पाठ करून आपल्या डोक्यावरून मागे होळीत पडेल असे टाका वर्षभर सेफ व्हाल.
  • घरातील काही बाधा किंवा निगेटिव्हिटी वाटत असेल तर होळीत थोडी आग घरी आणून ती तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात अग्न्येय कोणी (पूर्व दक्षिण ) ठेवा तेथे एक राईच्या तेलाचा दिवा लावा सकाळी दुसऱ्या दिवशी ती राख उचला दिवा उचला आणि होळीत टाकून या आजा, घरात कोणी आजारी असल्यावर खालील उपाय जरूर करा जमतील ते.
  • होळी च्या रात्री एक माळ तुळशी च्या माळेवर करा पुढील मंत्र. मंत्र- ऊं नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्ये संस्थिताय मम शरीरं अमृतं कुरु कुरु स्वाहा. दुसऱ्या व्यक्तीसाठी करायचा असेल तर जिथे मम् लिहिले आहे तिथे त्याचे नाव घ्या
  • आजारी व्यक्तीने करावे. एक खाऊ पान + एक गुलाब फुल + २/४ बत्ताशे स्वतावरून ३१ वेळा ओवाळून जिथे ३/४ रस्ते असतील तेथे ठेऊन या ( दुसर्याने त्या व्यक्ती साठी केले तरी चालते)
  • होळी ची राख आणून त्यात काळे तीळ + जाडे मीठ मिक्स करून ठेवा आणि जर घरातील लादी पुसताना किंवा अंघोळीच्या पाण्यात आजारी व्यक्तीसाठी टाकाल तर चांगले अनुभव येतील.
  • गायीच्या शेणीवर होळीतील थोडी आग आणून ठेवा आणि त्यावर नारळाचे तुकडे शेकवून जर आजारी व्यक्तीला थोडे खाण्यासाठी दिलेत तर बरीच निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते.
  • वाईट नजर घालविण्यासाठी, एक मुट्टी काळे तीळ + ६ काळामिरी + ६ लवंग +१ कपूर + एका मुठीत घेऊन त्या व्यक्ती किंवा लहान मुलावरून ७ वेळा ओवाळून होळीत टाकून आले तर चांगले परिणाम दिसतील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी
  • परिवारात जर कोणी असाध्य रोगी असेल तर २ लवंग तुपात बुडवा २ पानावर ठेवा ह्याला काळ्या धाग्याने बांधा हे उजव्या मुठीत ठेवा ४ गोमती चक्र डाव्या मुठीत घ्या आणि होळीच्या ११/५ प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा झाल्यावर पान होळीत टाका गोमती चक्र घरी घेऊन या आणि आजारी व्यक्ती च्या बेङ ला चारी पायाला लाल कपड्यात बांधून ठेवा. जर जमिनीवर झोपत असेल तर उशीखाली ठेवा एकत्र लाल कपड्यात बांधून.

होळीचे उपाय भाग १

https://shreedattagurujyotish.com/holi-upay-part-1/

श्री दत्तगुरु ज्योतिष

देवेंद्र कुणकेरकर

9821817768

धन्यवाद…..!

Leave a Reply