You are currently viewing दुर्गा सप्तशती पाठ विधी

श्री मार्केंडेय ऋषींनी लिहिलेले श्री दुर्गा सप्तशती पाठात ७०० श्लोक आहेत. नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन. दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते.

दुर्गा सप्तशती पठणासाठी कोणत्या पुस्तकाचा आधार घ्यावा

श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी कोणतेही पुस्तक घेऊ शकता. संस्कृत, मराठी किंवा तुम्हाला ज्या भाषेत प्रभुत्व आहे ते पुस्तक वाचनास घ्यावे. सर्वात उत्तम श्री वेदवाणी प्रकाशन चे श्री दुर्गा सप्तशती पाठ आहे. त्यात संस्कृत अणि मराठी दोन्ही दिले आहे.

श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय केव्हा किती वाचावेत

  • पहिल्या दिवशी एक अध्याय पहिला
  • दुसऱ्या दिवशी दोन अध्याय दुसरा आणि तिसरा
  • तिसऱ्या दिवशी एक अध्याय चौथा
  • चौथ्या दिवशी चार अध्याय पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा
  • पाचव्या दिवशी दोन अध्याय नववा आणि दहावा
  • सहाव्या दिवशी एक अध्याय अकरावा
  • सातव्या दिवशी दोन अध्याय बारावा आणि तेरावा

ह्या क्रमाने त्या त्या दिवशी चे अध्याय करून घ्यावेत नवरात्रीत.

काही जण ३ दिवसात हे पूर्ण करतात प्रथम-मध्यम-उत्तम असे तीन खंड तीन दिवसात पूर्ण करून सांगता करतात. पण ह्याचा पूर्ण सराव असेल तरच करण्यास घ्यावे असे माझे मत आहे. उगाच प्रयत्न करून बघू असे मनात आणू नये.

श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्याची विधी

स्नानादी कर्म करून पूर्वेला मुख करावे. बसायला कोणतेही आसन घ्यावे. आधी आचमन करून घ्यावे हे रोज करावे वाचायच्या सर्वात प्रथम बसल्याबरोबर (पोस्ट ३ मध्ये हा विधी पाहावा)

नंतर संकल्प करून घ्यावा हे पहिल्याच दिवशी करावे रोज नको (पोस्ट ३ मध्ये हा विधी पाहावा)
श्री गणेशाचे मनोमन आवाहन करावे किंवा एखादे स्तोत्र म्हणावे.

नंतर शापोद्वार मंत्र म्हणावा काही जण शापोद्धारसाठी ——‘ ॐ ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्रीं चण्डिके देवी शापनाशानुग्रहं कुरु स्वःहा।। ह्या मंत्राचा ७ वेळा जप करतात. किंवा रुद्रयामलतंत्रात विशेष शापोद्धारसाठी विधी दिला आहे.

ह्यास पाठ सुरु होण्यापूर्वीच म्हणावा नंतर म्हणू नये. (ह्याची पूर्ण माहिती पोस्ट ५ मध्ये दिली आहे स्तोत्रासकट) जे सोपे जमेल ते शापोद्वार मंत्रासाठी उपयोगात आणावे सर्वात प्रथम.

नंतर उत्कीलनासाठी —‘ॐ श्रीं क्लीं ह्रीं सप्तशति चण्डिके उत्कीलनं कुरु कुरु स्वाहा।। ह्या मंत्राचा २१ वेळा आधी अणि पाठ झाल्यावर २१ वेळा पुन्हा म्हणावे सर्वात शेवटी करून उठावे. ज्यांना न्यास वाचण्यास जमत असतील त्यांनी ते वाचून घ्यावेत तसे करू शकतात.

पण जमत नसेल तर डायरेक्ट आधी देवी कवच आणि अर्गला स्त्रोत्र नंतर १०८ वेळा नवार्ण मंत्र म्हणून रोजच्या त्या दिवशीच्या पाठाना सुरुवात करावी.

आणि पाठ संपल्यावर पुन्हा उत्कीलन मंत्र २१ वेळा म्हणून उठावे. शेवटच्या दिवशी रोजचा नैवेद्य दाखवून हवन करून घ्यावा.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. आशिष

    दुर्गा सप्त शक्ती पाठ करण्यासाठी काय करावे लागते

Leave a Reply