You are currently viewing अधिक मास विशेष- भाग ३

काय करावे ज्याने अधिक मास चे पूर्ण फळ मिळेल.

ह्या अधिक मासात जप, दान, तप, कथा श्रवण, तीर्थ स्थळी स्नान , आणि भगवंतापुढे दीप दान केल्याने अनंतगुणाचे फळ मिळते. ह्या महिन्यात जास्तीत जास्त कृष्ण , विष्णू किंवा विठ्ठलाची उपासना करावी. जशी जमेल तशी रोज करावी.

सूर्योदयापूर्वी उठावे. रोज विष्णू सहस्त्रनाम एकदा पठण करावे. जमेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री.

ॐ विष्णवे नमः
ॐ क्लिं कृष्णाय नमः

हे जप तुळशीच्या माळेवर करावेत. पूर्व दिशेला मुख करून पिवळे किंवा सफेद वस्त्र घालून जप करावा.

नित्य पूजेत रोज कृष्ण किंवा विष्णू किंवा विठ्ठलाला तुळशीपत्र जरूर अर्पण करावे. ह्या दिवसात जास्तीत जास्त मानसिक जप ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः सुद्धा करू शकता. जे विठ्ठल भक्त आहेत त्यांनी जरूर विठ्ठल विठ्ठल हा जप करत राहावा.

अधिक मास- दान

रोज काही ना काही दान करावे. त्यात वस्त्र आणि आर्थिक दान किंवा श्रीमत भागवत कथा चे दान ह्यांचे अधिक महत्व आहे. दीप दान करावे जसे देवळात एक दिवा ठेवावा रोज किंवा तीर्थ क्षेत्री दीप दान करावे किंवा अगदीच जमले नाही तर घरातच एक दिवा रोज देवापुढे लावावा.

एका शुद्ध तुपाचे मालपोळे कासेच्या भांड्यात ब्राह्मणाला दान करण्याची प्रथा आहे ह्याने श्री हरीची कृपा प्राप्त होते. काही तिथी अनुसार सुद्धा दानांचा पुराणांत उल्लेख मिळतो तो असा.

 • प्रतिपदेला चांदीच्या पात्रात तुपाचे दान
 • द्वितीयेला कासेच्या पात्रात सोन्याचे दान
 • त्रितीयेला चण्याच्या डाळीचे दान
 • चतुर्थीला खारीकचे किंवा गूळ दान
 • पंचमीला गूळ आणि तूर डाळ
 • षष्टीला अष्टगंधाचे किंवा चंदनाचे दान
 • सप्तमी ला आणि अष्ठमीला रक्त चंदनाचे दान
 • नवमीला केसर चे दान
 • दशमी ला कस्तुरी दान
 • एकादशी ला गोरोचन दान
 • द्वादशी शंख दान (दक्षिणावर्त अति उत्तम)
 • त्रयोदशी घंटी दान
 • चतुर्दशी मोती दान
 • पूर्णिमा माणिक दान

हि सर्व दाने जे जे जमतील ते आपल्या सामर्थ्यनुसार करावीत. हे दान आपल्या गुरुजींना, आपल्याला मार्गदर्शन करणारे देवळातील ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरिबाला असावे. हि दाने १५ दिवसाची आहेत शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षात करून पुण्य मिळवावे असे सांगितले आहे.

काही ठिकाणी अनारसे , शंकरपाळी , करंज्या चे वाण देण्याची प्रथा आहे. ह्या प्रथेत आपल्या जावयाला आणि मुलीला त्यांना विष्णू लक्ष्मी चे रूप मानून हे वाण देतात. आपणास हे जमत नसेल तर आपण कोणत्याही विष्णू लक्ष्मी किंवा राधा कृष्ण किंवा विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात ह्या महिन्यात एकदा तरी जाऊन एक तुपाचा दिवा आणि काही गोड पदार्थ ठेऊ शकता. त्यात बेसन लाडू , रव्याचे लाडू किंवा आपल्याला जे जमत असेल ते नेऊन समोर ठेऊन प्रार्थना करावी.

श्रवण

ह्या पूर्ण महिन्यात भागवत श्रवण , कृष्ण कथा , विष्णू कथा , अधिक मास कथा ह्यांचे फक्त श्रवण(ऐकल्याने) केल्याने सुद्धा अधिक मासाचे पुण्य फळ प्राप्त होते असा शास्त्रात उल्लेख आहे. तेव्हा जिथे अशा व्यवस्था असतील तेथे जाण्याची प्रथा होती आधीच्या काळात पण सध्या च्या कोरोना भीतीमुळे हे श्रवण घरातच करावे . बरेच व्हिडीओ ह्यात असतील ते सर्च करून ऐकावेत सकाळी किंवा तिन्ही सांजेला जमेल तसे.

तीर्थ यात्रा

ह्या महिन्यात तीर्थ यात्रा केल्याने त्याचे फळ अनंत गुणाने मिळते आणि ह्या मासाचे पुण्य पदरात पडते असा सुद्धा शास्त्रात उल्लेख मिळतो. पण कोणतेही नवीन तीर्थक्षेत्री जाऊ नये जिथे तुम्ही आधि गेला होतात अशाच तीर्थ क्षेत्री कार्यक्रम आखावा असा सुद्धा उल्लेख वाचनात आला आहे.

काय करू नये अधिक मासात

देवांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा ह्या अधिक मासी करू नये. नवीन गृहप्रवेश , लग्न, साखरपुडा ह्या मासात वर्जित मानला आहे.

अधिक मासाची जास्तीत जास्त माहिती मी आपल्याला दिली आहे असे मला वाटते. कृपया आपण हि माहिती आपल्या ओळखीच्या सर्कल मध्ये सेंड करून धार्मिक पुण्य मिळवावे असे मला वाटते.

ह्या अधिक मासात श्री कृष्ण श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री हरी अशा कोणत्याही विष्णुरुपी भगवंताचे आशीर्वाद आपल्याला मिळोत हीच मनोमन सदिच्छा.

जप तप दान श्रवण तीर्थ यात्रा ह्यात अधिकाधिक राहून ह्या महिन्याचे पुण्य जमा करा जे पुढे आपल्याला कधीही उपयोगात येईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply