You are currently viewing शनी कुंभ राशी भ्रमण – जान २०२३ ते मार्च २०२५ | कर्क राशी अडीचकी (शनी लहान पनौती)

कर्क राशी अडीचकी (शनी लहान पनौती) | Shani Transit for Cancer

नियम

जेव्हा एखाद्या राशीपासून शनी ४थ्या राशीत भ्रमण करीत असतो तेव्हा त्या राशीला शनीची लहान पनौती किंवा शनीची अडीचकी किंवा ढैय्या लागली असे म्हणतात. आपली राशी जर कर्क असेल तर वरील नियम आपणास लागू पडेल. आणि जर आपले लग्न कर्क असेल आणि राशी दुसरी कोणतीही असेल तर मात्र आपणास लहान पनौती नसली तरी शनीचे भ्रमण हे आपल्याला खाली दिलेले वाचण्यास हरकत नाही.

कर्क राशी अडीचकी (शनी लहान पनौती)

जेव्हा शनी कुंभ राशीत असेल जान २०२३ ते मार्च २०२५ पर्यन्त तेव्हा गुरु राहू आणि केतू हे कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे शनी चे फळ प्रत्येक राशीला मिळण्याचा संभव असेल.

कर्क राशीला किंवा लग्नाला गुरु राहू केतू यांची गोचरी दिली आहे. त्यावरून शनी आपल्याला कसे फळ देईल हे सुद्धा समजण्यास मदत होईल.

  • गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत नवम स्थानी.
  • गुरु मेष राशीत १/५/२०२४ पर्यंत असेल.– कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत दशम स्थानी.
  • गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल. — कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत लाभ (एकादश) स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ पर्यंत मेष राशीत असेल — कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत दशम स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ पर्यंत तुला राशीत — कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत चतुर्थ स्थानी.
  • राहू ३०/१०/२०२३ ते १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत — कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत नवम स्थानी.
  • केतू ३०/१०/२०२३ ते १८/८/२०२५ पर्यंत कन्या राशीत — कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत त्रितिय स्थानी.

आपली राशी किंवा आपले लग्न कर्क असेल तर १७/१/२०२३ च्या आधी ८४ दिवसात आपण ते पाहिलेच असेल कि आपल्या बद्दल ज्या ज्या घटना होत आहेत त्या आपल्या इच्छेविरुद्ध होत आहेत. मानसिक ताण वाढत आहे. पण हे आपल्या जन्माच्या शनीवर सुद्धा अवलंबून असेल.

येथे आपणास दिनांक १७/१/२०२३ ते २९/३/२०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असताना काय फळ देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न असेल.
येथे फक्त विषय मांडले जातील.

वर दिलेल्या कुंडलीत जी आपली लग्न कुंडली किंवा राशी कुंडली आहे ती पहा शनी आपल्या अष्टम स्थानात येत आहे. जेव्हा शनी सारखा शिस्तप्रिय न्यायप्रिय आणि ग्रह आपल्या लग्नस्थानापासून किंवा राशीपासून आठवा येत असतो तेव्हा हे अपघाताचे, मृत्युदायक यातनांचे, अचानक येणाऱ्या पिडांचे, नवीन संशोधनाचे, पैंत्रिक संपत्तीचे, किंवा क्लेम पासून मिळणाऱ्या धानाचे असल्यामुळे आपल्या समोर हे विषय नक्की येतात. ह्यातील काहीशा घटना ह्या आपल्याबद्दल होऊ शकतील.

शनी कर्क राशी किंवा लग्न कुंडलीला चांगली फळे देताना थोडी कंजुषी करतो आणि वाईट फळे देताना तो मागे पुढे पाहत नाही. करेल कारण चंद्राची राशी हि त्यास जास्त सूट होत नाही. कारण ती जलतत्वाची फास्ट मुव्हमेंट राशी आहे. आणि शनीला कोणत्याही जलद गोष्टी मुळात आवडत नसतात. तो स्वतः मंद गतीने चालतो.

शनी च्या दृष्टी

जन्म स्थानाच्या वेळी आपल्या पत्रिकेत शनी जेथे बसला असेल तेथे तो चांगली फळे देतो आणि त्या संबंधित घटना आपल्याकडून करवून घेतो.

जन्म स्थानाच्या वेळी शनी ज्या राशीत असतो त्या राशीपासून ३ ऱ्या, ७ व्या आणि १० व्या स्थानावर आपली दृष्टी टाकतो. ह्या शनी च्या तिन्ही दृष्ट्या चांगल्या मानल्या गेलेल्या नाहीत. त्या त्या स्थानापासूनच्या विषयी व्यक्ती थोडा हैराण असतो आपल्या जीवनात. किंवा त्या स्थानातील चांगल्या परिणामांसाठी व्यक्ती सतत मेहनत करीत असतो. हे कोणत्या कोणत्या स्थानावर त्याची दृष्टी पडली आहे ह्यावर अवलंबून असते.

मात्र शनी जेव्हा एखाद्या स्थानावर मर्यादित कालावधीत गोचरीने भ्रमण करतो तेव्हा त्याची दृष्टी ज्या ज्या स्थानावर येत असते तेथून तो त्या व्यक्तीला उजेडात आणतो त्या स्थानाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्या २.५ वर्षाच्या कालावधीत तो त्या त्या गोष्टी त्याच्याकडून करवून घेतो. आणि तो जेथे बसलेला असतो त्या विषयी चे विषय सुद्धा व्यक्तीला त्याच्या प्रगतीसाठी मदत करतात.

शनी ची ३ री दृष्टी

कर्क राशी आणि कर्क लग्न कुंडली साठी शनी अष्टम स्थानातून भ्रमण करीत आहे आणि तेथून तो आपली तिसरी दृष्टी हि आपल्या दशम स्थानावर देत आहे जिथे १ नंबर लिहिले आहे. तेथे मंगळाची मेष राशी येते आणि सध्या तेथे ३०/१०/२०२३ पर्यंत राहू सुद्धा तिथेच आहे.

करिअर मध्ये आपल्याला तो अग्रेसिव्ह ठेवेल बढती बदली दिसते पण थोडी काळजी घ्या कारण एप्रिल २०२३ पर्यंत गुरु मीन राशीत असेल तेव्हा तो राहू आणि शनी च्या मध्ये १२ नंबर मध्ये पापकर्तरी योगात असेल. त्यामुळे करिअरचे मोठे निर्णय कदाचित त्रासदायक ठरतील. पण आपण काहीतरी अधिक इन्कम होण्यासाठी धावपळ कराल त्यात एप्रिल नंतर यश मिळेल.

शनी ची सातवी दृष्टी

हि जिथे ५ सिंह राशी आहे तिथे येत आहे. आपल्या कुटुंब (दुसऱ्या) स्थानावर येणारी हि दृष्टी आपल्याकडे कुटुंबासाठी पैसा खर्च करणारी आहे किंवा कुटुंबाची मोठी जबादारी आपल्यावर पडेल. कुटुंबापासून लांब असणाऱ्या व्यक्तींना जास्त त्रास होणार नाही मात्र एकत्र कुटुंबात कलह दिसेल. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी हा सल्ला.

ह्या शनीच्या भ्रमणात २०२३ आणि २०२४ मधील ह्या दोन्ही वर्षी १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ला होतील कारण तेथे रवी सिंह राशीत असेल. त्याच्यावर शनी ची दृष्टी येईल.

आणि १६ सप्टेंबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ हा कालावधी सुद्धा आपल्याला पैसा आणि कुटुंब हा विषय काळजीचा किंवा मोठ्या घटनांचा दिसू शकेल कारण रवी कन्या राशीत असेल आणि शनी पासून तो ८ व्या राशीत असेल . तेव्हा इथे कोणतेही मोठे निर्णय घेऊ नये. हे दोन्ही वर्षासाठी असेल २०२३ आणि २०२४.

शनी ची १० वी दृष्टी

आपल्या पत्रिकेत पंचीम स्थानी जिथे ८ मंगळाची वृश्चिक राशी आहे त्यावर शनी ची १० वी दृष्टी आहे. हे आपल्या संतान सुखाचे, आपल्या स्किल चे , बुद्धीचे , प्रेमाचे, स्थान आहे तसेच ते हेल्थ रिकव्हरी चे स्थान आहे त्यामुळे जर आधी काही आजारपण असेल त्यात हेल्थ साठी आपण चांगले प्रयत्न कराल आणि त्यात यश मिळेल.

पाचवे स्थान हे संतानसुखाचे आहे ज्या कर्क राशीच्या स्त्रियांना बाळ होताना आतापर्यंत मेडिकल काही इशू होते त्यांनी ह्यात आता प्रयत्न करून पाहण्यास हरकत नाही. जे जे विद्यार्थी दशेतील कर्क राशीतील मुलं असतील त्यांना हा कालावधी खूप नियमात राहून काढावा लागेल कोणताही टाईमपास आपल्याला परवडणारा नाही. ज्यांच्याकडे प्रेम हा विषय असेल त्यांनी जरा सावधान त्यांना चांगला परिणाम नाही ह्यात.

गुरु २२/४/२०२३ पर्यंत मीन राशीत.– कर्क लग्न किंवा राशी कुंडलीत नवम स्थानी गुरु असताना वरील विद्यार्थ्यांसाठी आणि संतान सुखाबद्दल दिलेले विवेचन होण्याची खात्री दिसेल. किंवा मंगळ वृश्चिक राशीत असताना १६/११/२०२३ ते २८/१२/२०२३ ह्यात असे होण्याचा संभव नाकारता येत नाही

गुरु वृषभ राशी १/५/२०२४ ते १४/५/२०२५ पर्यंत असेल — हा कालावधी आपणास थोडा सुखाचा जाऊ शकेल ह्यात शंका नाही.ह्याचे कारण भाग्येश आणि रोगेश ९ नंबर आणि १२ नंबरचा मालक गुरु हा लाभ स्थानी असेल. इथे विद्यार्थाना दिलासा मिळेल. आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचे फळ चांगले दिसेल. संतान सुख किंवा नवीन भाग्योदयाच्या वाटा मोकळ्या होतील. असे म्हणतात कि शनी जाता जाता काहीतरी आपली चांगली व्यवस्था करून जातो.

तो हा कालावधी असेल ह्यात जे आपल्याला मिळेल ते आयुष्यभरासाठी लक्षात राहते असे माझे मत आहे. आठवून पहा नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१४ च्या घटना. शेवटी ३/४ महिन्यात काय काय घडले होते बाकी हा काळ थोडा कठीणच होता असेल. पण जर तेव्हा आपले वय १२ वर्षाच्या पुढे पाहिजे तर हे नक्की समजेल.

उपाय कर्क राशी किंवा कर्क लग्नाचा

ह्या पूर्ण शनीच्या भ्रमणात हनुमान चालीसा रोज वाचणे, दुर्गा चालीसा किंवा स्तोत्राचे पठण करणे, मंगळवारी किंवा रोज गणेशाला दुर्वा घालणे आणि आपल्या राशिस्वामी साठी शिव उपासना करत राहावी त्यात ॐ सोम सोमय नमः रोज १०८ वेळा म्हणावे सकाळी किंवा संध्याकाळी हे आपल्या राशिस्वामीला मजबूत बनविण्याचे कार्य करेल. शनी साठी हनुमंताच्या मंदिरात प्रत्येक शनिवारी रुई ची माळ घालून तेथे तेल आणि काळे उडीद वाहणे ह्याने बऱ्याच प्रमाणात कर्क राशीला त्यांचा हा कालावधी व्यवस्थित जाईल ह्यात शंका नाही.

शनी कुंभ राशी प्रवेश नक्षत्र कालगणना

वरील लिंक वर जर आपण शनी च्या प्रत्येक नक्षत्राचा कालावधी पाहिलात तर त्यात ज्या ज्या वेळी शनी वक्री असेल त्या त्या वेळी आपल्याला वर दिलेली फळे हि अचानक आपल्या समोर असतील. ती चांगली किंवा वाईट हे आपल्या जन्माच्या शनीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. साधारण गणित करायचे झाल्यास एव्हढेच आपण पाहू शकता जर आपल्या पत्रिकेत शनी वक्री असेल आणि इथे भ्रमण काळातील शनी वक्री असताना तो आपल्याला चांगली फळे नक्कीच देतील.

वरील लिंक मध्ये दिलेल्या नक्षत्र भ्रमणाचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील ह्यासाठी आपण नक्कीच एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून सल्ला घ्या हि विनंती. कारण इथे प्रत्येक नक्षत्राबद्दलचे विवेचन सर्वांसाठी सारखे नसेल.

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८

Leave a Reply