नवरात्रीतील कन्यापूजनाचे महत्व
नवरात्रीत आपण ज्योत जी जागृत करतो ते एक जिवंत स्वरूपाची पूजा असते आणि त्याच श्रद्धेने लहान मुलींना सुद्धा देवीचे जिवंत रूप मानून त्यांना पुजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्या घरात मुलींना बोलावून त्यांना गोड धोड खाऊ घालून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना खुश केल्याने आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरावर कुटुंबावर देवीची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
दोन ते नऊ वर्षापर्यंत मुलींना बोलावू शकता. (तसे ११ वर्ष पर्यंतच्या मुली सुद्धा घेऊ शकता)
हेही वाचा :- नवरात्रीत देवीचे स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य
त्यात प्रत्येक वयातील मुलींचे एक एक वेगळे स्वरूप खालील प्रमाणे दिले आहे.
- दोन वर्षाच्या मुलींना कुमारी म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने जीवनात दरिद्रता येत नाही.
- तीन वर्षाच्या मुलींना त्रिमूर्ती म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने संपूर्ण परिवाराचे कल्याण होते.
- चार वर्षाच्या मुलींना कल्याणी म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने घरात सुख लाभते.
- पाच वर्षाच्या मुलींना रोहिणी म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने रोग मुक्ती होते.
- सहा वर्षाच्या मुलींना विद्या म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने विद्या बुद्धी चे वरदान प्राप्त होते.
- सात वर्षाच्या मुलींना चंडिका म्हणून संबोधले जाते त्याचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते.
- आठ वर्षाच्या मुलींना शाम्भवी म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने आपल्यात आकर्षण आणि क्षमता वाढते. आणि आपल्याला प्रसिद्धी मिळते.
- नव वर्षाच्या मुलींना दुर्गा म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने कोणत्याही कष्टदायक कामात सफलता मिळते. आणि सर्व कामे सफल होतात.
- दहा वर्षाच्या मुलींना सुभद्रा म्हणून संबोधले जाते त्यांचे पूजन केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात.
धन्यवाद…..!