You are currently viewing गुरु चंद्र युती आणि दृष्टी १००% परिणाम विवाह आणि वनवास

गुरु चंद्र युती आणि दृष्टी १००% परिणाम विवाह आणि वनवास

वरील लग्न कुंडलीत गुरु चंद्र एकत्र लिहिले आहेत. ते इथे मी सर्व स्थानात लिहून दाखविले आहेत. किंवा आपल्या पत्रिकेत जिथे जिथे गुरु लिहिला आहे त्या गुरूवर बोट ठेऊन तेथून चंद्र जिथे असेल तिथपर्यंत मोजा म्हणजे जर गुरु पासून चंद्र ५ व्या ७ व्या आणि ९ व्या स्थानी लिहिलेला असेल किंवा कोणत्याही एकाच स्थानी गुरु चंद्र लिहिला असेल तर खाली दिलेला लेख आणि वर दिलेला विवाह आणि वनवास हा विषय आपल्याला लागू पडेल.

इथे गुरु चंद्र युती जास्त परिणाम कारक समजा गुरुची चंद्रावर दृष्टी त्यापेक्षा कमी परिणाम देणारी असेल.

हा वनवास कलियुगाचा असल्यामुळे अर्थात तो आर्थिक बाबींचा, आपल्या इतर सुखांचा होऊ शकतो. जंगलातला इथे वनवास कोणी समजू नये.

प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेत हि युती होती आणि लग्न झाल्याबरोबर राजपाठ सोडावा लागून वनवास भोगावा लागला हाच संदर्भ मी बऱ्याच पत्रिकेला लावला आणि तसेच फळ मला पत्रिकेत दिसले सुद्धा म्हणून हा उहापोह मांडत आहे. विषय गंभीर आहे जाणून घ्या.

ह्याच युतीला बरेच ज्योतिषी गजकेसरी योग म्हणतात. म्हणजे हत्तीवरून साखर वाटण्याचा योग. ह्या गजकेसरी ला मी छेद देतच नाही पण अभ्यासांती असे लक्षात आले कि हे आपण कुमार अवस्थेत असताना जास्त दिसते उदाहरण म्हणजे लग्ना अगोदर हे व्यक्तीला चांगले ज्ञान देईल, किंवा चांगल्या चांगल्या सुविधा सुद्धा देईल, सर्व गोष्टी आपोआप मिळतील सुद्धा ज्या ज्या गरजेच्या असतील. पण एकदा लग्न झाले कि १४ वर्षे वनवास नक्की.

१४ वर्षे हे गणित इथे थोडे कमी होऊ शकते कारण तो व्यक्ती किती जगेल ह्यावर सुद्धा अवलंबून असेल. १०० वर्षे व्यक्तीसाठी १४ वर्षे असे गणित केले तर जर आपण ७० वर्षे जगत असू तर हा विषय लग्नानंतर साधारण १२ वर्षे असू शकतो.

ह्यावरून आपण लग्नानंतर किती जगणार आहोत हे सुद्धा गणित काढता येईल. (फक्त ह्या युती असणाऱ्या पत्रिकेत) जसे वनवास जर १० वर्षात संपला तर साधारण ६० वर्षे जर वनवास ८ वर्षात संपला तर साधारण ५० वर्षे आणि जर वनवास १२ वर्षे राहिला तर ७० च्या वर आयुष्यमान समजण्यात येऊ शकेल.

आता वनवास ची व्याख्या देतो

गुरु चंद्र पत्रिकेत कुठेही लिहिला असेल एकत्र कोणत्याही राशीत असेल तर आपल्याला लग्न झाल्यावर एक प्रकारची धावपळ सुरु होते.

कुणाला घर बदलावे लागते (कारणे काहीही असू शकतात ह्यात). कुणाला पैशाचे खूप व्यवहार समोर येतात. कुणाला आरोग्यापासून धावपळ होते. तर कुणाला घरात काही उलटसुलट घटना होत असतात त्या साठी जबाबदारी येते. कुणाला संतान चे विषय सुटत नाहीत.

हे विषय नक्की काय असतील हे एक निष्णात ज्योतिषीच दोघांची पत्रिका पाहून सांगू शकेल.

आणि ह्यातून व्यक्ती निदान १२ वर्षे तरी बाहेर पडताना दिसत नाही कारण आपल्या जगण्याचा एव्हरेज आत्ताचा ७० वर्षे असेल तर.

ह्यात पैशासंबंधित बऱ्याच पत्रिकेत त्रास दिसले आहेत. अशा लोकांच्या पत्रिकेत चेक केले असता आधी राजा सारखे राहत होते पण लग्नानंतर लाईट चे बिल किंवा क्रेडिट कार्ड चे बिल सुद्धा भरण्यासाठी ड्यू डेट च्या तारखेकडे लक्ष असते.

चांगल्या गोष्टी

वरील कोणत्याही जबाबदारीत नक्की तो प्रोसेस पूर्ण होतो म्हणजे आपली नाचक्की ह्यात नक्की होत नाही.अशा व्यक्तींकडे पैसे संपतात तेव्हा येतात. पण पैसे असताना बऱ्याच खर्चाने सामोरे जावे लागते.

सल्ला

अशा व्यक्तींनी लग्न झाल्याबरोबर स्वतः खिसे रिकामी ठेवावे आणि रोज पत्नी किंवा आई कडून मागून घ्यावे. ह्या योगाला लग्नानंतर चा भिकारी योग म्हटला तरी आपण रोज मागून खाणे हेच होते.

आता आपल्याला पटणार नसलेल्या गोष्टी

हि युती ज्यांच्या पत्रिकेत असेल त्यांच्या मातांना बराच त्रास झालेला पहिला गेला आहे. त्यांनी त्याच्या संसारात आपल्या सुशिक्षितेचा आपल्या संस्काराचा फार उपयोग करून सर्वाना सांभाळून जीवन जगले असेल अशाच मातांना हा योग त्यांच्या मुलांच्या पत्रिकेत आला तर त्यांना हा वनवास पहिला गेला आहे.

आणि अशा मुलांच्या पत्रिकेत गुरु चंद्र आहे पण वरील काहीच झाले नसेल तर अशा व्यक्तींच्या मातांनी ( क्षमा असावी हा अभ्यास आपण करून निर्णय घ्यावा) कि त्या मातांनी आपल्या जाबदाऱ्या पूर्ण केलेल्या नसतात. कदाचित त्या स्वार्थी होऊन सेल्फिश जीवन जगतात.

किंवा काही पत्रिकेत मातांचे दोन विवाह सुद्धा पहाण्यात आले आहे. हा विषय नाजूक वाटला तरी तो अभ्यासाने पहिला गेला आहे. इथे कुणाच्याही मातृत्वाला दोष देण्याचा विषय नाही क्षमा असावी. फक्त इथे ग्रहांचा अभ्यास मांडला आहे खोटा असेल तर सोडून द्या. कोणतीही शंका आपल्या मातृत्वाबद्दल बाळगू नका. पुन्हा क्षमस्व.

चलित कुंडलीत गुरु चंद्र जर वेगवेगळ्या स्थानात लिहिले असतील तर वरील योग हा थोडा कमी परिणाम देऊ शकतो.

नोट — हि युती आपल्याला आपल्या पत्रिकेत दिसली तर लग्नाच्या अगोदरच करिअर करून घ्या. काही जणांना नंतर करिअर करताना पैसे कामविताना त्रास दिसला आहे. किंवा खुप कर्ज दिसले तेव्हा लग्ना अगोदर आपली पत्रिका हि गुरु चंद्र युती आहे म्हणून योग्य ज्योतिषांकडे दाखवा.

धन्यवाद…..!

Leave a Reply