You are currently viewing काय काय करू शकता पितृ पक्षात

काय काय करू शकता पितृ पक्षात:-

जर तुम्ही घाई गडबडीत असाल आणि पितृपक्षात तुमच्याकडे पितरांसाठी श्राद्ध कर्म करण्यास वेळ नसेल तर खालील माहिती पोस्ट आपल्यासाठी आहे.

ह्या पितृपक्षातल्या प्रत्यके दिवशी आपण पितरांची आठवण केलीच पाहिजे कारण पूर्ण वर्षभर तसे काही होत नाही आपल्याने. ह्यात दान तर्पण श्राद्ध वाडी (नवेद्य) ह्याला विशेष महत्व असते.

हे आपण कोणत्यातरी एका दिवशी करून मोकळे होतो पण जर ह्या पंधरवड्यात घरातील मुख्य माणसाने खालील नियम जास्तीत जास्त पळाले तर त्याचा पितरांकडून आशीर्वाद मिळण्यासाठी उपयोग होईल.

पुढील १५ दिवस सूर्य नारायणाला जल देणे.

सकाळी अंघोळीनंतर घरात दक्षिण दिशेला मुख करून खाली बसून समोर एक ताट मांडून एक चिमटी काळे तीळ + कुश (एक दोन काड्या) उजव्या हातावर ठेऊन त्यावर दुसऱ्या हाताने पाणी सोडावे त्या ताटात आणि आपल्या पितरांकडून मोनोमन त्याची क्षमा याचना करावी ( हा संपूर्ण तर्पण विधी भाग ३ मध्ये देण्यात आला आहे हे रोजचे करत असाल तर आहे)

रोज गायीला सकाळची पहिली चपाती नियमित देणे ह्या पक्षात. ऑफिस ला किंवा बाहेर जाताना गरिबांना अन्न दान करणे , किंवा काही खाण्याच्या वस्तू देणे.

रात्री चे जेवण घेताना आधी एका छोट्या कागदावर अथवा पानावर आपल्या ताटातील एक एक चिमटी अन्न काढून ते घराबाहेर किंवा खिडकीकडे ठेवावे. (तुळशी कडे ठेऊ नये)

ह्या दिवसात आपण दुपारच्या वेळी जेवणा अगोदर एक गायीची शेणी घ्यावी त्यावर एक चपाती (मीठ न घालता बनवलेली) ठेवावी नंतर शेणी चारी बाजूने कापराने पेटवून त्यावर एक एक चिमटी गूळ + चार पाच थेम्ब तूप घालावे.

गूळ आणि तुपाची ५ वेळा आहुती द्यावी. (म्हणजे त्या अग्नीवर सोडावे). ह्या प्रयोगाने दुपारच्या वेळी आपल्या पितरांना आहुती द्वारे अन्न पुरविण्याचा हा उत्तम विधी आहे.

संध्याकाळी किंवा रात्री घराच्या बाहेर रोज राई च्या तेलाचा दिवा लावावा. असाच एक दिवा आपल्या घरातील साऊथ वेस्ट च्या कोपऱ्यात ठेवावा आणि त्यात काळे तीळ + ४/५ दाणे अक्खे काळे उडीद टाकावेत. (दिवा १० मिनिटे असला तरी चालेल) ज्यांचे घर साऊथ दिशेला आहे (घरातून बाहेर पडण्याची दिशा दक्षिण असेल) अशा सर्वानी बाहेर ह्या दिवसात दिवा लावलाच पाहिजे असे माझे मत आहे. कारण तुम्ही ज्या दिशेला राहता ती दिशा सरळ पितरांचीच आहे. (ती दिशा तुमच्यासाठी वाईट कि चांगली ह्यात मी येथे काहीही नमूद करत नाही)

रात्री जेव्हा आपण अंथरुणात जाल तेव्हा आपल्या पितरांना आठवण करावी आणि ॐ पितृ देवाय नमः बोलून झोपावे.

ह्या पंधरा दिवसात भागवत गीता जेव्हढी वाचून काढता येईल तेव्हढी वाचावी (निदान एक पण किंवा काही श्लोक तरी वाचावेत दक्षिणेला मुख करून)

ह्या पंधरावाड्यात घरातील वातावरण असे असावे कि आपले पितर हे आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे एकदम सात्विक असावे सर्वानी.
आणि शुद्ध आचरण ठेवावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply