काय आहे होरा?
दिवसाचे २४ तास त्यातील ज्या एका तासावर ज्या ग्रहाचा प्रभाव जास्त असतो त्या ग्रहाचा होरा सुरु आहे असे म्हणतात. (होरा ज्ञान)
कसा पाहावा होरा?
जो वार सुरु असेल त्या ग्रहाचा पहिला होरा सूर्योदयापासून एक तास सुरु असतो नंतर त्यामागे प्रत्येक ७ ग्रहांचा होरा क्रमाने येत असतो.(Hora)
खालील प्रमाणे होरा चा क्रम असतो. समजा रविवार असेल तर पहिला होरा रवी/शुक्र/बुध/चंद्र/शनी/गुरु/मंगळ असे क्रमाने येतील आणि त्यानंतर पुन्हा ८ व्या तासाला रवी पासून सुरु होईल हाच क्रम आणि हाच क्रम दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत सुरु राहील.
जर सोमवार असेल तर पहिला होरा चंद्राचा घ्यावा आणि नंतर शनी गुरु मंगळ रवी असे पुढे पुढे १ तासाचे मोजावे.
महत्वाच्या कामासाठी होरा चा कसा उपयोग करावा?
प्रत्येक होरा हा खालील प्रमाणे सामान्य फळ दाखवितो
- रवी — बलवान
- शुक्र — लाभदायी
- बुध — तीव्र
- चंद्र — नम्र
- शनी — मंद
- गुरु –फलदायक
- मंगळ — आक्रमक
जर एखादे महत्वाचे काम आपल्याला होरा पाहून करायचेच असेल तर प्रथम ज्या दिवसाचा होरा सुरु असेल त्याची निवड करावी
पण शक्यतो रवी शुक्र गुरु चंद्र हे होरे सामान्यतः चांगले फळ देतात म्हणून ह्याच होऱ्या चा उपयोग उत्तम असतो आणि हेच होरे आपल्याला ते काम पूर्णत्वाकडे नेण्यास शुभ असतात.
म्हणून शनी मंगळ आणि बुध चे होरे सुरु असताना महत्वाचे काम टाळावे असे माझे मत आहे.
अजून सुक्ष्म पाहण्यासाठी आपल्या पत्रिकेत जो लग्नेश (पत्रिकेचे पहिले स्थान आणि त्याचा मालक) असेल त्याचा सुद्धा होरा आपण निवडू शकतो.
पण माझ्या मते आपल्या पत्रिकेत अष्टमात असलेला ग्रह किंवा तेथे असणारी राशी चा होरा घेऊ नये थोडा त्रास होण्याचा संभव असेल असे माझे मत आहे.
आपल्या पत्रिकेत लाभ स्थानात जी राशी असेल त्याचा सुद्धा होरा आपल्याला उपयोगी पडू शकतो.
उदाहरण —
समजा आज खूप महत्वाचे काम करायचे आहे आणि सोमवार आहे तर पहिला होरा चंद्राचा असेल आणि त्यानंतर ८ व्या तासाला सुद्धा चंद्राचा होरा येईल. नंतर १५ व्या तासाला सुद्धा चंद्राचा होरा येईल आणि नंतर २२ व्या तासाला पुन्हा चंद्राचाच होरा असेल. ह्याची गणना सूर्योदयापासून च्या वेळेपासून करावी हे महत्वाचे.
जर सोमवारी चंद्राच्या होऱ्यात महत्वाचे काम केले तर शुभता मिळण्यास हरकत नाही.
होरा सहज कसा प्राप्त करावा?
आजचा होरा पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर आपल्या मोबाईल वर करून रोजचा होरा चार्ट सहज प्राप्त करू शकता.
www.astrosage.com हे अप्लिकेशन आपल्या मोबाईल वार डाउनलोड करू शकता. त्यात दैनिक पंचांग मध्ये होरा रोजचा दाखविला जातो.
https://www.drikpanchang.com ह्या लिंक वर सुद्धा आपल्याला हव्या असणाऱ्या होरा चेक करू शकता.
किंवा गूगल मध्ये TODAY HORA असे जरी टाईप केले तरी होरा सहजपणे मिळतो.
अजून एक — प्रत्येक व्यक्तीला ७ ग्रहांच्या होऱ्या पैकी असा एक होरा आयुष्यभर मदत करत असतो तो महिनाभर प्रॅक्टिस ने सहज शोधता येईल. ह्यासाठी रोज जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी असाल किंवा कोणतेही एखादे महत्वाचे काम सहज होईल त्यावेळी असणारा होरा लिहून ठेवा. काही कालांतराने असे कळेल कि तोच तोच होरा सुरु असताना आपण खूप आनंदित असता किंवा आपली कामे होत असतात.
ह्याउलट जर पाहायचे असेल तरी सुद्धा शोधू शकता कि कोणता होरा आपल्यासाठी वाईट आहे.
धन्यवाद…..!