You are currently viewing गुरुपुष्यामृत योग आणि ह्या वर्षी येणारे योग

काय आहे गुरुपुष्यामृत योग?

२७ नक्षत्रांपैकी एक नक्षत्र पुष्य नक्षत्र असते ते प्रत्येक २७ दिवसाने येते म्हणजे प्रत्येक महिन्यात एकदा तरी येतेच. पण ज्या दिवशी गुरुवार असेल आणि सूर्योदयाला हे नक्षत्र सुरु असेल त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो.

गुरुपुष्यामृत महत्व

पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. (पुष्य नक्षत्र मराठी माहिती)

कोणत्याही मंत्राची सुरुवात, आधी खंड झालेल्या मंत्र साधना पुन्हा सुरु करण्यासाठी ह्या दिवसाचा उपयोग केल्याने त्याची फलप्राप्ती होते.
कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.

गुरुपुष्यामृत उपाय

आपण ऐकले असेल कि गुरुपुष्यामृत योगात जर सोने घेतले तर ते द्विगुणित होत राहते. एका सामान्य माणसाला जर ह्या गुरुपुष्यामृताचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याने ह्या योगावर कमीत कमी तरी सोने घ्यावेच निदान ५०० रुपयाचे तरी.

आणि असे २१ गुरुपुष्यामृत ला घेत राहावे. २१ गुरुपुष्यामृत झाले तर आपल्याकडे जेव्हढे सोने जमा झालेले असेल त्याची पहिल्या बोटात अंगठी करून घालावी. आणि गुरुपुष्यामृताला ती धारण करावी जर असे करण्यात आपण सक्सेस झालात तर आपल्याला गुरु ग्रहाची कृपा होऊन आपल्या जीवनात कधीही ह्या ग्रहापासून त्रास होणार नाही.

ज्या मुलामुलींची लग्नाची वये झाली असतील त्यांनी आपल्या लग्नात दागिने बनविण्यासाठी ह्याच योगावर थोडे थोडे सोने जमा करत राहावे. ज्याने विवाह सुखात आपणास त्याची चांगली प्रचिती येईल. हा प्रयोग मी करून झालो आहे. निदान ७/८ वर्षे आधी हे करण्यास सुरवात करावी. जेव्हा आपण आपल्या कामधंद्याची सुरुवात कराल.

ज्यांना संसारात खूप त्रास होत आहेत ज्यांची कामे नीट होत नाहीत. कोणत्याही कामात सतत अडचणी येत आहेत त्यांनी आपल्या कुलदेवतेची आणि महालक्ष्मी ची उपासना ह्या दिवशी करावी. आणि वरील प्रयोग सुद्धा करावा.

ज्यांना शनी ची साडेसाती असेल ज्यांना शनी ची अडीचकी असेल त्यांनी खालील प्रयोग ह्या दिवशी जरूर करावा. थोडी चांदी ह्या दिवशी खरेदी करावी आणि त्याला सिंदूर लावावे आणि देव्हाऱ्यात ठेवावे.

घरातील आजारपण दूर करण्यासाठी किंवा अडलेली कामे होण्यासाठी ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य गरिबांना वाटप करावे.

गुरुपुष्यामृत ला विवाहास वर्ज्य दिवस मानला आहे म्ह्णून ह्या दिवशी विवाह करू नये.

गुरुपुष्यामृत योग 2023 | २०२३ चे पुढील गुरुपुष्यामृत योग

  • गुरुवार, ३० मार्च सकाळी १०:५९ ते ३१ मार्च सकाळी ६:३० पर्यंत.
  • गुरुवार, २७ एप्रिल सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०९ पर्यंत.
  • गुरुवार, २५ मे सकाळी ५:५८ ते सायंकाळी ५:५४ पर्यंत.
  • गुरुवार, 28 ऑक्टोबर ९:४१ ते ३०:३७
  • गुरुवार, २९ डिसेंबर दुपारी १:०५ ते सायंकाळी ७:०६ पर्यंत.

धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply