You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : कर्क राशी/कर्क लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ कर्क राशी/कर्क लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ कर्क राशीकर्क लग्न

वरील कुंडली हि कर्क राशीची चंद्र कुंडली आहे आणि कर्क राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली कर्क राशी किंवा लग्न कुंडली कर्क असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

कर्क राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा अष्टम स्थानात येत आहे. हे स्थान आपल्या कष्ठाचे आहे. सर्व प्रकाचे छोटे मोठे अचानक समोर येणारे अपघात इथून पहिले जातात. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम असेल तो वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या अष्टम स्थानी आपल्या समस्यांवर आपले रक्षण जरूर करेल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या पत्रिकेत षष्ठ (सहाव्या) स्थानी येते जेव्हा ह्या स्थानाचा स्वामी अष्ठम स्थानी जातो आहे तेव्हा आपल्या सर्विसेस मधे त्रास होण्याचा संभव नाकारकता येत नाही. पण तरीसुद्धा हा योग राजयोग आहे पैसा मिळेल. आजारपण असेल तर तब्येतीकडे लक्ष ठेवावे लागेल.
१२ नंबरची मीन राशी भाग्य स्थानी आहे. त्याचा स्वामी अष्टमात भ्रमण करत आहे म्हणून ह्या कालावधीत लक थोडे कमी साथ देईल. काही नवीन करताना जास्त कष्ट होतील.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : मिथुन राशी/मिथुन लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले धन स्थान आहे तसेच हे कुटुंब स्थान सुद्धा आहे. ह्यावर गुरु ची दृष्टी चांगली फळे देईल. धार्मिक, कर्मकांड, ज्योतिषी, शिक्षकी पेशात किंवा गुरु संबंधिताला कोणत्याही सेवा जर आपण देत असाल तर आपल्याला ह्या काळात उत्तम पैसा मिळेल. कुटुंबात मंगलकार्ये घडतील. कोणत्याही संकटांपासून गुरु आपले रक्षण करेल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान आपल्या कुंडलीचे व्यय स्थान आहे. आपण ह्या १४४ दिवसात गुंतवणूक भरपूर करावी असा सल्ला दिला जातो. त्यासाठी १० डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ हा काळ अति महत्वाचा आहे कारण ह्या काळी बुध गुरु च्या धनु राशीत असेल आणि गुरु कुंभेत असेल दोन्ही ग्रह हे बाराव्या स्थानी पाहून राजयोग निर्माण करतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपले हे स्थान प्रॉपर्टीज, मातृ सुख, आणि स्वतःची सगळी सुखे ह्याचे आहे. गुरु ह्या स्थानावर आपली दृष्टी टाकून आपल्याला वरील विषयी चांगले फळ देईल. घर जागा जमीन जुमला ह्या विषयी आता हात घालण्यास काही हरकत नाही.मातृ स्थानाचे चांगले फळ मिळेल.

काळजीचे काही मुद्दे

कर्क लग्न आणि कर्क राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल. गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या लहान भावंडांचे येते आणि पराक्रमाचे ते स्थान आहे ह्यात आपल्याला थोडे कष्ट दिसतील.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या सप्तम स्थानी येत आहे. वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीसाठी विशेष काळजी घेणे.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान आपल्या व्यक्तिमत्वाचे आहे त्यात आपले वेळापत्रक गडबडीने होऊ शकेल.अचानक धावपळ आपल्याला करावी लागेल काळजी घ्या. कर्क राशीच्या लग्न आणि राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जास्त मेहनत करावी लागेल. १३ एप्रिल २०२२ पर्यंत.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण कर्क राशीसाठी आणि लग्नासाठी उत्तम आहे कारण मंगळाची दोन स्थान ५/१० ऍक्टिव्हेट होणार आहेत जर आपण स्वतःचे व्यवसाय करत असाल तर हा उत्तम काळ आहे. पण ह्यात पैसा कमी मिळेल. जॉब मध्ये त्रास दिसतो. त्याने आपल्या सर्व सर्व्हिसेस साठी काळजी दिसेल.

मंगळ ५ डिसेंबर पर्यंत तुला राशीत असेल आणि गुरु तेथून मंगळावर आपली ९वी दृष्टी टाकत आहे. हीच वेळ अति उत्तम असेल प्रॉपर्टीज मध्ये निर्णय घेण्याचे. जमीन जुमला गाडी ह्या काळात घेऊ शकाल.
५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत आपल्या पाचव्या स्थानी जात आहे म्हणून गुरु ५व्या स्थानाचे फळ जास्त देईल त्यात आपण जर संतान चे कोणतेही निर्णय घेत असाल तर उत्तम पण त्या बद्दल ची जी आधी कष्ट झाली असतील त्यावर मत करूनच निर्णय घ्या.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. कर्क राशीच्या लग्न आणि राशी कुंडलीत सध्या राहू हा अकराव्या / लाभ स्थानावरून भ्रमण करत असेल वरील कालावधीत आपल्याला वेगवेळ्या प्रकारचे लाभ होतील.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी चांगला नाही कारण गुरु स्वतः अष्टमात आहे. इतर राशी आणि लग्नाच्या कुंडलीत मी सर्वांसाठी चांगले लिहिले आहे पण अष्टमातील हा गुरु आपल्याला एखादा धक्का देऊन मीन राशीत जाऊ शकेल. म्हणून या समयी आपणास गुरु चे दान जास्तीत जास्त करावे असा सल्ला दिला जातो.

धन्यवाद…..!

Leave a Reply